गुरूवार, मे 1, 2025
Home Blog Page 479

लिएंडर पेस यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 6 : भारताचे प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये विजय अमृतराज यांच्यासह स्थान प्राप्त केल्याबद्दल लिएंडर पेस यांचे अभिनंदन केले.

Leander Paes meets Governor Radhakrishnan

Mumbai 6 : Ace tennis player and Olympic medalist Leander Paes met Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai.

The Governor complimented Paes for getting inducted into the International Tennis Hall of Fame alongwith Vijay Amritraj.

0000

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

मुंबई दि. ६:  सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी  महाडीबीटी पोर्टलवर दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्जकरण्यासाठी  मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने  राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी  mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

अर्ज करणेबाबतची कार्यवाही

अर्ज करणे साठी वेबसाईट

https://mahadbt.maharashtra.gov.in

लाभार्थी (शेतकरी ) “युजर आयडी व पासवर्ड” टाकणे

“अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे

“कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे

“मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे

“तपशील” बाबीवर क्लिक करून –

“मनुष्यचलित औजारे घटक निवड”

“यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे”

“बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे

जतन करणे

 

पारधी समाजाच्या विविध योजनांसाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, ‍‍दि.६ :  मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रासह  २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन २०२४-२०२५ करिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध झाले आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई कस्तुरबा क्रॉस रोड न. २, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र. 2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावेत, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

000

शैलजा पाटील / वि.स.अ

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. ५: पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे (क्लस्टर) प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी नद्यांची प्रवाहक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासह नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत,  आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  प्रत्येक जीव आपल्याकरीता महत्त्वाचा असून तो वाचविणे आपले कर्तव्य आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण झाले पाहिजे, कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांना सेवा-सुविधा दिली पाहिजे. पूरपरिस्थितीमध्ये मनुष्यहानी, वित्तहानी टाळण्याकरीता नदीचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे काम करावे. नद्यांमधील भराव काढणे, बांधकाम आणि इमारत तोडफोडीचा राडारोडा काढणे आदी उपाय तातडीने करावे. याकरीता पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जलसंपदा विभाग, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवावी.

प्रत्येक गावात पावसाचे प्रमाण, प्रवाहात येणारे पाणी समजण्यासाठी स्वयंचलीत हवामान केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावा. पुराने बाधित होणाऱ्या क्षेत्रात तात्काळ सूचना देणारी प्रणाली (अर्ली वॉर्निंग सिस्टीम) तात्काळ कार्यान्वित करावी. या सर्व कामाकरीता निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही ते म्हणाले.

नदी सुधार प्रकल्पाचे काम करताना नदीतील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. आवश्यक तेथे सीमाभिंती बांधताना त्याबाबत तांत्रिक बाबींचा विचार करावा. नद्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’सारखी प्रभावी योजना राबवावी.

पुराचा धोका कायस्वरुपी कमी करण्याकरीता शासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येईल. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता निळ्या पूररेषेचे सर्वेक्षण करण्यात येईल. सर्वेक्षण झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. पूरबाधित घराचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डीसीआर) तयार करण्यात येईल, घराच्या पुर्नविकासाकरीता आवश्यकतेनुसार कायद्यात व नियमातही बदल करण्यात येईल.

प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रस्तरावर जाऊन काम केल्यास नागरिकांचे अनुभव, प्रश्न, अडचणी समजण्यासह उपाययोजना करणे शक्य होते. नागरिकांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यानुसार कपडे, अंथरुण, पांघरुन, किट, शिधा तातडीने पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी शासनाचा निधी, जिल्हा नियोजन समिती तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी आदीतून विशेष मदत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री.शिंदे म्हणाले.

पुरामुळे येणाऱ्या पाण्यातून साथीचे रोग पसरतात. साथीचे रोग पसरू नयेत म्हणून आरोग्य विभागाकडून चांगल्या प्रकारे उपाययोजना सुरू आहेत. पुरामुळे वाहनांच्या नुकसानीबाबत विमा कंपन्यांशी बैठक घेऊन वाहनमालकांना नुकसानभरपाई देण्याबाबत सूचना कराव्यात, असेही ते म्हणाले.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, नद्यांच्या पाणी वहनक्षमता, खोली व रुंदी, धरणातील येवा, नियंत्रित व अनियंत्रित पाण्याचा साठा, पाण्याचा विसर्ग, धरण आणि धरणाच्या खालच्या व वरील बाजूस येणारे पाणी आदी बाबींचा विचार करुन नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्याची गरज आहे. पूरनियंत्रणाकरीता पुढील ५० वर्षाचा विचार करुन एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यावरही नदीच्या पाणी प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, असे नियोजन करावे. याबाबत जिल्हास्तरीय यंत्रणेने विस्तृत माहिती घेवून आराखडा तयार करावा.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पूरग्रस्त भागातील नागरिकांना मान्सूनपूर्व सूचना देणारी प्रणाली तात्काळ अद्ययावत करावी. पुरामुळे नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना विशेष मदत करण्याबाबत विचार व्हावा. त्यांना जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

यावेळी आमदार आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ यांनी विविध सूचना केल्या.

डॉ. पुलकुंडवार यांनी पूरस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यामुळे नुकसानीची तीव्रता कमी झाल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पुराच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच आगामी काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सज्ज असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी धरणातून सोडण्यात विसर्ग सोडण्याच्या कार्यपद्धतीची तसेच पूरनियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या आवश्यक त्या उपाययोजनांची माहिती दिली. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शेखर सिंह यांनी नागरिकांचे तात्पुरत्या शिबीरात स्थलांतर, त्यांना पुरविण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली.

अमितेश कुमार, विनय कुमार चौबे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खड्डे भरणे, वाहतूक नियंत्रण व पूरपरिस्थीतीत नागरिकांचे स्थलांतरण आदीबाबत माहिती दिली.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

०००

ग्रंथालय संचालनालयाचे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कार घोषित

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत सन 2022-23 या वर्षीचे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिले जाणारे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे, यासाठी तसेच ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. याअंतर्गत सन 2022-23  या वर्षासाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.

(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

शहरी विभाग

१)  हिंद नगर वाचनालय व ग्रंथालय, रहिमतपूर ता. कोरेगाव, जि. सातारा ( पुरस्काराची रक्कम रु. १ लाख)

२) विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, नांदुरा, श्री. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, बुलढाणा रोड, नांदुरा जि. बुलढाणा (पुरस्काराची रक्कम रु. ७५ हजार)

ग्रामीण विभाग :

(अ)  १) शहीद भगतसिंग वाचनालय, कुऱ्हा, मु.पो. कुऱ्हा ता. तिवसा जि. अमरावती (पुरस्काराची रक्कम १ लाख रु.)

(आ)     संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, भिडी ता. देवळी जि. वर्धा (७५ हजार रु.)

(इ)       कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालय, बोरी, ता. जिंतूर जि. परभणी (५० हजार रुपये)

(ई)       कै. रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालय, बिरोबा मंदिराजवळ, कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर ( २५ हजार रु.)

(ब) डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. ५० हजार प्रत्येकी)

राज्यस्तरीय पुरस्कार

१) राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

श्री. विनायक दत्तात्रय गोखले, अनंत आनंद को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आनंद पार्क, ठाणे (प) मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे

२) राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)

श्री. सुरेश बळीराम जोशी, ग्रंथपाल, विजय वाचनालय, ता. तुळजापूर जि. धाराशिव

डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती – श्री. विनोद बाळकृष्ण मुंदे, श्री. सरस्वती सार्वजनिक वाचनालय, राजना पो. काजना ता. नांदगाव खंडे, जि. अमरावती

२) छत्रपती संभाजीनगर – श्री. युवराज मोहनराव जाधव, लोकमान्य सार्वजनिक वाचनालय, शिवणी (खुर्द), पो. शिवणी (बु.). ता.जि. लातूर

३) नागपूर – श्री. धनराज देवीलाल रहांगडाले, श्री. शारदा वाचनालय, गोंदिया जि. गोंदिया

४) नाशिक – श्री. गोपीचंद जगन्नाथ पगारे, मातृभूमी प्रबोधन समिती संचलित महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, जेल रोड, नाशिक जि. नाशिक

५) पुणे – श्रीमती ज्योत्स्ना चंद्रशेखर कोल्हटकर, श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, भवानी पेठ, सातारा जि. सातारा

६) मुंबई – श्री. अनंत आपाजी वैद्य, रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

डॉ. एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती – श्रीमती ज्योती रामदास सरदार (धबाले), ग्रंथपाल, साने गुरुजी वाचनालय, जठार पेठ, अकोला, जि. अकोला

२) छत्रपती संभाजीनगर – श्री. गणेश रामभाऊ शेंडगे, ग्रंथपाल, ए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालय, ता. जि. बीड

३) नागपूर – श्री. नंदू दामोदर बनसोड, ग्रंथपाल, दादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालय, महाल, ता.जि. नागपूर

४) नाशिक – श्री. अमोल संभाजी इथापे, ग्रंथपाल अहमदनगर जिल्हा वाचनालय, चितळे रोड, अहमदनगर जि. अहमदनगर

५) पुणे – श्री. भगवान पांडुरंग शेवडे, ग्रंथपाल श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मांगले, ता.शिराळा, जि. सांगली

६) मुंबई – श्रीमती मंजिरी अनिल वैद्य, ग्रंथपाल, श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालय, विलेपार्ले (पूर्व) मुंबई.

००००

नंदकुमार वाघमारे/स.सं

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना ३१ ऑगस्टनंतरही सुरू राहणार

चंद्रपूर, दि. : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी 1500/- रुपये याप्रमाणे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे 31 ऑगस्टनंतरही ही योजना सुरू राहणार आहे, त्यानुसार पात्र महिलांना 1500/- रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, चंदनसिंग चंदेल, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. राजूरकर, प्रा. अतुल देशकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे 2 लक्ष 84 हजार 923 अर्ज आले असून 2 लक्ष 11हजार 326 अर्जाची तपासणी झाली आहे. यापैकी 1 लक्ष 87 हजार 463 अर्ज मंजूर झाले असून त्रुटी पूर्ततेत 23718 अर्ज आहे. पूर्तता झाल्यावर सदर अर्ज मंजूर करण्यात येतील. तसेच दोन दिवसात संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

०००

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    पिकविम्यासंदर्भात मुंबई येथे कृषिमंत्र्यांसमवेत ऑगस्टला तातडीची बैठक

चंद्रपूर दि. : चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी आहेत. अर्थसंकल्पात राज्य शासनाने यासाठी तरतूद करुनही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. या संदर्भात तातडीने मुंबई येथे कृषिमंत्री व सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुरेश आढाव, डॉ. मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, संध्या गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पिकविम्याचे एकूण दावा रक्कम 202 कोटी 76 लाख 23 हजार 944 रुपये आहे. यात 1 लाख 51 हजार 352 शेतकऱ्यांचे क्लेम आहेत. यापैकी 86,657 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 34 हजार 910 रुपयांचे विमा रक्कम मिळाली असून या आठवड्यात म्हणजे 10 ऑगस्टपर्यंत 63 कोटी रुपये जवळपास 30 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासनाच्या वतीने उर्वरित 59 कोटीची रक्कम लवकरच देण्यात येईल. याचा लाभ जवळपास 32 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 13462 शेतकऱ्यांनी आणि काढणी पश्चत 21795 शेतकऱ्यांनी सूचना देवूनही सर्व्हे करण्यात आला नाही, हा विषय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेकरिता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र या कंपनीसंदर्भात अनेक तक्रारी असून कंपनीची कार्यप्रणाली अतिशय बेजबाबदार आहे. त्यामुळे या कंपनीला बडतर्फ करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येईल. विम्यासाठी असलेल्या उर्वरित चारही कंपन्या पंचनाम्याच्या सर्व्हेची प्रत शेतकऱ्यांना देतात. मात्र ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना विम्याची प्रत देत नाही, ही बाब गंभीर आहे. तसेच विम्याकरिता तालुक्याचे पर्जन्यमान गृहित धरण्याबाबतसुद्धा मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येईल. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळालाच पाहिजे, त्यासाठी कंपनीने त्वरित सर्व्हे करावे,  अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली.

एकाच गावातील एका शेतकऱ्याला विम्याची रक्कम दिली जाते, मात्र दुसऱ्याला दिली जात नाही. कंपनीचे एजंट सर्व्हे करायला जात नाहीत. पर्जन्यमान झाले नाही, असा सरसकट शेरा मारतात. शेतकऱ्यांच्या पिकविम्याबाबत कंपनीला कोणतेही गांभीर्य नाही. 72 तासात शेतकऱ्यांना अर्ज करायला लावतात, मात्र 2-2 महिने सर्व्हेला जात नाहीत, या बाबी नागरिकांच्या तक्रारीतून समोर आल्या आहेत. त्यामुळे या बाबींची गंभीर दखल घेऊन कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल, किंवा राज्य शासनाला सांगून बडतर्फ करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

7 ऑगस्टला मुंबईत बैठक तर 10 ऑगस्टला चंद्रपुरात बैठक

पीक विम्याची समस्या सोडविण्यासाठी 07 ऑगस्टला मुंबई येथे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेत बैठक होणार आहे. या बैठकीला ओरिएंटल कंपनीचे अधिकार उपस्थित राहणार आहेत. यासोबतच कृषी सचिव व्ही. राधा यांच्यासोबत चंद्रपूर येथे 10 ऑगस्टला बैठक होणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

०००

गरिबांना जमिनीच्या अधिकारासाठी पट्टे वाटपाची नागपुरातून मुहूर्तमेढ राेवता आली याचे समाधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. ०५ :जोपर्यंत गरिबाला त्याच्या घरासाठी, निवाऱ्यासाठी जमिनीचा अधिकार मिळणार नाही तो पर्यंत गरिब हा गरिबीतून बाहेर येऊ शकणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबध्द होऊन विकासाची बांधिलकी आम्ही जपली आहे. 1999 मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा पहिले प्राधान्य हे कामगार कॉलनी, तुकडोजी नगर येथील गरिबांना जमीनीच्या पट्ट्यांकरीता दिले. यासाठी संघर्ष केला. मुख्यमंत्री झाल्यावर सर्वात अगोदर प्राधान्याने याबाबत शासन निर्णयाद्वारे न्याय देऊन आजवर जवळपास 25 हजार गरिबांना जमिनीचे पट्टे त्यांच्या मालकीचे केले. भारतात पहिल्यांदा नागपूर येथून याची मुहूर्तमेढ झाली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गजानन नगर येथील समाज भवनामध्ये सहकार्य नगर येथील शासकीय जागेवरील 73 जमिनीचे पट्टे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संबंधित पट्टेधारकांना देण्यात आले. महसूल सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास स्थानिक मुन्ना यादव नझुलचे उपजिल्हाधिकारी श्रीराम मुंदडा, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व महिला उपस्थित होत्या.

नागपुरसह अनेक महानगरात खाजगी जमिनीवर बसलेल्या लोकांचा आणि जमीन मालकांचा प्रश्न चिंतेचा होता. 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून राहत असलेल्या लोकांच्या निवाऱ्याचाही प्रश्न सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सोडविण्याला आपण प्राधान्य दिले. याचबरोबर मूळ मालकाला जमिनीचा मोबदला मिळावा या कटिबध्दतेतून आपण धोरणात्मक निर्णय घेतला. मूळ जमीन मालकांशी चर्चा केली. त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी टीडिआर देण्यात आला. अशा खाजगी जमीन शासनाने सरकारी करुन जे गरिब राहत आले आहेत त्यांच्या नावे हे जमिनीचे पट्टे आपण बहाल केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यापूढे कुठलाही व्यक्ती पट्ट्यापासून वंचित राहणार नाही, अशाी आमची भूमिका आहे. ही कार्यवाही वास्तविक अधिक गतीने झाली असती. मधल्या काळातील दोन वर्ष याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आम्ही पुन्हा या प्रश्नाला गती देत आहोत. यात काही ठिकाणी झुडपी जंगल अशी जमिनीला नोंद आहे. या नोंदीमुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. यासाठी आपण पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेलो. त्या ठिकाणी कोर्ट कमिश्नर नियुक्त करुन घेतले. नागपुरातील रेल्वे स्थानकापासून अनेक मोठ्या इमारतीच्या जागांवर झुडपी जंगल अशी नोंद असल्याचे पुरावे कोर्ट कमिशनर यांच्या निदर्शनास आणून दिले. ही वस्तुस्थिती ठेवल्यामुळे याबाबत सकारात्मक अहवाल आपल्याला घेता आला. या चुकीच्या नोंदी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. एक मोठा न्याय लोकांना आता देता येईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याबाबत शासन स्तरावर मोजणी प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

मालकी हक्काचे पट्टे मिळून ज्यांची घरे कच्ची आहेत त्या गोरगरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहेत. अनेक लोकोपयोगी, लोककल्याणकारी सामाजिक न्यायाचे निर्णय आपण घेतले आहेत. आपल्या माता बहिणीसाठी लाडकी बहीण योजना आपण हाती घेतली आहे. यासाठी सर्व महिलांनी निकषानूसार अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी आर्थिक तरतूद आम्ही करुन ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांसाठी प्रवासात 50 टक्के सवलत, तीन गॅसचे सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय, ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यावयाचे आहे अशा मुलींसाठी 507 कोर्सेससाठी लागणारे शैक्षणिक शुल्क अर्थात फिस राज्य शासन भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांसाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण हाती घेतली असून 10 लाख युवकांना सुमारे 10 हजार रुपयांपर्यत विद्यावेतन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास प्रातिनिधीक स्वरुपात सहकार्य नगरातील सुमारे 67 लाभधारकांना जमिनीच्या पट्टे देण्यात आले. उर्वरित वाटप केले जात आहे.

०००

पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरिता नवीन धोरण तयार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. ५: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाटील इस्टेट, शिवाजीनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा, एकता नगर सिंहगड रोड, खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर,माधुरी मिसाळ, अण्णा बनसोडे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्यात येईल. पूरबाधित नागरिकांना शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. परंतु, पुराचा धोका कायस्वरुपी कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येतील. पूरबाधित घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डीसीआर) तयार करण्यात येईल. घराच्या पुर्नविकासासाठी आवश्यकतेनुसार कायद्यात व नियमातही बदल करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

जुनी सांगवी येथील पूरग्रस्तांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी सांगवी परिसरातील स्थलांतरित पूरबाधित नागरिकांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळेत भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.  शासनाकडून सर्व आवश्यक ती मदत करण्यात येत असून बाधित क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असे ते यावेळी  म्हणाले.यावेळी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्री. सिंह यांनी पूरग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

एकता नगर येथे मुख्यमंत्र्यांची भेट

सिंहगड रोडवरील एकता नगर येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच सुमारे दीड तास नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्यानंतर या भागातील गटार लाईनची दुरुस्ती, पाण्याची नवीन लाईन टाकणे आदी पायाभूत सुविधा नागरिकांना पुरवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिले. पूरबाधित भागातील विविध भागात मदत कक्ष सुरू करण्यात आले असून आरोग्य पथके आणि जवळपासची रुग्णालये सज्ज ठेवावीत, आदी सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरची त्यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

श्री. शिंदे यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

0000

कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र अग्रेसर

        भौगोलिक चिन्हांकन ही एक प्रकारची मानांकन नोंद आहे, जी भौगोलिक क्षेत्राशी निगडीत आहे. नैसर्गिकरीत्या व मानवी प्रयत्नातून उत्पादित होणाऱ्या कृषी मालाची ओळख, त्याद्वारे त्याच्या खास गुणवत्तेतील सातत्य व त्यांच्यामधील विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी भौगोलिक चिन्हांकन उपयुक्त आहे. भारतामध्ये एकूण 200 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्यापैकी महाराष्टामध्ये 38 कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त आहे. कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यात एकूण ३८ कृषी व फलोत्पादन पिके/उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पिकाच्या उत्पादकांची भौगोलिक संकेत (नोंदणी व संरक्षण) अधिनियम 1999 अंतर्गत अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी केल्यास भोगोलिक चिन्हांकनाचा लोगो लावून उत्पादनाची विक्री करता येते. पिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माची ओळख निर्माण करुन विक्री केल्यास उत्पादकास अधिकची किंमत मिळते. राज्याला लाभलेले वैशिष्ट्यपूर्ण वातावरण व नैसर्गिक जैवविविधतेमुळे नवीन कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त करण्यास प्रचंड वाव आहे. देशातील नवीन पिकास भौगोलिक मानांकन अदा करण्याची कार्यवाही चेन्नई येथील भौगोलिक मानांकन रजिस्ट्री येथून करण्यात येते.

राज्यात भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाचे अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येते. सन २०१९-२० अखेर १२३२ उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली होती. संचालक फलोत्पादन  विभागामार्फत उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याने सन २०२४ अखेर ११४२३ उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली आहे. कृषी उत्पादनाच्या देशात एकूण झालेल्या उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीमध्ये महाराष्ट्राचा ६१ % वाटा आहे. तसेच ५००० प्रस्तावांना देखील लवकरच मान्यता मिळून अधिकृत वापरकर्ता नोंदणीत मोठी वाढ होणार आहे.

अधिकृत वापरकर्ता नोंदणीने भौगोलिक क्षेत्राशी निगडित मालास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. भौगोलिक चिन्हांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात, अशा नोंदणी करत कृषी मालास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडींग होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्त्व असते तेच महत्त्व कृषिमालाच्या भौगोलिक चिन्हांकनासह असते, त्यामुळे असे नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो. भौगोलिक मानांकन प्राप्तीमुळे भारतीय कृषी निर्यातीस जागतिक बाजारपेठेत निश्चितच लाभकारक ठरणार आहे.

 

भौगोलिक मानांकन कृषी उत्पादनांचे अधिकृत वापरकर्ता सद्य:स्थिती

 

अ.क्र. जिल्‍हा पिकांचे नांव संस्‍थेचे नांव व पत्ता समाविष्‍ठ जिल्‍हे अधिकृत वापरकर्ता संख्‍या
1 पालघर डहाणू घोलवड चिकू महाराष्‍ट्र राज्‍य चिक्कू  उत्‍पादक संघ, रघुवीर सदन मु- कंक्राडी, पो- वाकी, ता-डहाणू, जिल्हा: ठाणे – ४०१६०२ पालघर 84
2 पालघर बहाडोली जांभूळ बहडोली जांभूळ उत्पडक शेतकरी गट, बहाडोली मु. बहडोली मु.पो. दहिसर, तालुका जिल्हा पालघर- 401 102 पालघर 0
3 ठाणे बदलापूर जांभूळ जांभूळ परिसंवर्धन आणि समुद्र विकास चॅरिटेबल ट्रस्ट,   राधेया अपार्टमेंट, A/3, पहिला मजला, गोळेवाडी, बदलापूर -421 503 ठाणे
4 रायगड अलिबाग पांढरा कांदा अलिबाग पांढरा कांदा उत्पादक संघ अलिबाग, तालुका: अलिबाग, जिल्हा: रायगड – 402 201 रायगड
5 सिंधुदुर्ग वेंगुर्ला काजू कोकण काजू समुह, सिंधुदुर्ग, गोपुरी आश्रम, वागदे, ता- कणकवली जिल्हा: सिंधुदुर्ग – ४१६ ६०२, सिंधुदुर्ग 119
6 सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी कोकम सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी महाकोकम संघ. मासाडे  ता. मालवन

मसाडे विराण बाजार, तालुका: मालवण, जिल्हा: सिंधुदुर्ग – 416 606

सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी 38
7 रत्‍नागिरी कोकण हापूस संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली तालुका, दापोली जि., रत्नागिरी – ४१५ ७१२, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर 1796

 

 

8 पुणे पुरंदर अंजिर महाराष्‍ट्र अंजीर उत्‍पादक संघ, पुणे

50 ए हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट पुणे ४११०१३

पुरंदर तालुका  (पुणे) 512
9 पुणे आंबेमोहर तांदुळ मुळशी तालुका आंबेमोहर संवर्धन संघ,केचरे, ता-मुळशी  जि-पुणे मुळशी  तालुका    (पुणे) 111
10 सोलापूर सोलापूर डाळिंब अखील महाराष्‍ट्र डांळिब संघ,पुणे

E-15, निसर्ग, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे- 411037

सोलापूर 1766
11 सोलापूर मंगळवेढा ज्‍वारी मालंदाडी ज्‍वारी विकास संघ,मंगळवेढा ता- मंगळवेढा जि-सोलापूर ता.- मंगळवेढा  (सोलापूर) 25
12 कोल्‍हापूर अजरा घनसाळ राईस अजरा तालुका शेतकरी विकास मंडळ, रामदेव गल्ली, आजरा जि-कोल्‍हापूर कोल्‍हापूर 243
13 कोल्‍हापूर कोल्‍हापूर गूळ कोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समिती, श्री.शाहू मार्केटयार्ड, कोल्‍हापूर ४१६००५ कोल्‍हापूर 7
14 सांगली सांगली हळद सांगली हळद क्‍लस्‍टर प्रा. लि.

१ला मजला, शिव मंडप, राम मंदिर चौक, मिरज-सांगली रोड, सांगली, ४१६ ४१६

सांगली 396
15 सांगली सांगली बेंदाणा महाराष्‍ट्र राज्‍य द्राक्ष बागायदार संघ,  द्राक्ष भवन, 117, वसंत मार्केट यार्ड, सांगली, ता- मिरज, सांगली – ४१६ सांगली १६३०
16 सातारा वाघ्‍या घेवडा जय तुळजाभवानी शेतकरी बचत गट, देऊर  ता-कोरेगाव जि-सातारा सातारा 189
17 सातारा महाबळेश्वर स्ट्रॉबेरी श्रीराम फ्रुट्स प्रक्रिया  सह. सोसायटी. महाबळेश्वर मु.पो. भिलार, ता- महाबळेश्वर जिल्हा -सातारा, सातारा 151
18 नाशिक नाशिक द्राक्ष नाशिक द्राक्ष शेतकरी सोसायटी,

नाशिक ग्रेप फार्मर्स सोसायटी, शिव प्रसाद, चौक, इंदिरा नगर, बंद: मुंबई आग्रा रोड, नाशिक – ४२२ ००९

नाशिक 329
19 नाशिक नाशिक व्हॅली वाईन राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ व नाशिक व्हॅली वाईन उत्पादक संघ नाशिक 1

 

 

20 नाशिक लासलगाव कांदा बळीराजा शेतकरी गट, नाशिक

कोटमगाव रोड, लासलगाव, निफाड तालुका, नाशिक  ४२२ ३०६

नाशिक 150
२१ जळगाव जळगाव केळी निसर्ग राजा कृषी विज्ञान केंद्र, तांदळवाडी, ता-रावेर जळगांव जळगाव ११७८
22 जळगाव जळगाव भरीत वांगी नवनिर्मिती शेतकरी मंडळ असोडा, ता-असोदा जिल्हा- जळगांव जळगाव 21
23 नंदुरबार नवापूर तुरडाळ बळीराजा कृषक  बचत गट धनरत, ता-नवापूर जिल्हा- नंदुरबार नंदुरबार 61
24 नंदुरबार नंदूरबार आमचूर अमु आखा एक से फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. चोंदवडे, ता- धडगाव, नंदुरबार – 425 414 नंदुरबार
25 नंदूरबार नंदूरबार मिरची डॉ.हेडगेवार सेवा समिती  डॉ.हेडगेवार भवन, जयवंत चौक, नंदुरबार, नंदूरबार
26 जालना जालना मोसंबी जालना जिल्‍हा मोसंबी उत्‍पादक संघ,जालना C/o प्रगत शेतकरी केंद्र, सुभाष रोड, मामा चौक, जिल्हा- जालना 431 203 जालना 1240
27 जालना जालना दगडी ज्वारी

 

जय किसान शेतकरी गट, मात्रेवाडी  ता -बदनापूर जिल्हा-जालना  431202 जालना
28 बीड बीड सिताफळ बालाघाट सिताफळ संघ, धारुर,बीड तळेगाव, तालुका- धारूर, जिल्हा- बीड – ४३११२४ बीड ००
29 छ.संभाजी  नगर मराठवाडा केसर आंबा उत्‍पादक संघ, छ.संभाजीनगर

अजय अभियांत्रिकी कंपनी परिसर, 5-14-42, अदालत रोड, औरंगाबाद – 431005

छ.संभाजीनगर बीड जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड 41
३0 लातूर पान चिंचोली चिंच पानचिंचोली  पाटाडी चिंच उत्पादक संघ पो.पानचिंचोली, तालुका- निलंगा,  जिल्हा -लातूर लातूर  

३१ लातूर बोरसुरी डाळ

 

बोरसुरी तूरडाळ उत्तपादक संघ

पो. बोरसुरी, तालुका- निलंगा, जि-लातूर

लातूर
३२ लातूर काष्टी कोथिंबीर

 

कास्ती कोटिंबीर शेतकरी उत्पादक संघ पोस्ट: आशिव, तालुका: औसा, लातूर लातूर
३३ धाराशिव कुंथलगिरी खवा भौगोलिक वैविध्य संवर्धन संघ, अंबरखाने निवास, गणेश नगर, नई आबादी, उदगीर जि-लातूर ४१३ ५१७ धाराशिव
३४ हिंगोली बसमत हळदी (हळद) मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, गट क्र. 174/1, तालुका कृषी कार्यालय, वसमत, तालुका: वसमत, जिल्हा: हिंगोली – 431 512 हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला वाशीम
३५ नागपूर भिवपुरी लाल मिरची भिवपुरी मिरची उत्पादक संघ, भिवापूर

चिखलपार, तालुका: भिवापूर जिल्हा -नागपूर ४४१२०१

नागपूर २०
३६ वर्धा वायगाव हळद वायगाव हळद उत्पादक संघ

वायगाव तालुका- समुद्रपूर, जिल्हा – वर्धा- 442101

वर्धा ६९
३७ भंडारा भंडारा चिन्नोर भात भंडारा चिन्नोर धन उत्पादक संघ

मु/पो- आसगाव, ता. पौनी, जि. भंडारा, ४४१९१०

भंडारा
३८ नागपूर नागपूर संत्रा फलोत्पादन विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला नागपूर 1246
एकूण अधिकृत वापरकर्ता संख्‍या – महाराष्ट्र  भारत – 19625 ११४२३

(६०%)

 

००००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

ताज्या बातम्या

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ३० : - महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे...

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा 

0
मुंबई, दि. ३० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये...

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, ‍‍दि. ३० : केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे...

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा 

0
मुंबई, दि. ३० : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मौलाना...

भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक ‘वेव्हज्-२०२५’ महोत्सव

0
भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावर WAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा... १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ...