गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 937

महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी सामंजस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आज केलेला  सामजंस्य करार  महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन वाढीसाठी मॉरिशस प्रजासत्ताकचे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी मॉरिशसच्या पर्यटन मंत्रालयचे दुष्यंतकुमार बकोटवार, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.महाजन म्हणाले, महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये झालेला सामंजस्य करार हा पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.दोन्ही प्रदेशातील पर्यटन-संबंधित उद्योग वाढवण्याच्या उद्देशाने पर्यटन क्षेत्रातील क्षमता वाढविणे,परस्पर भेटी, बैठका आणि  सुसंवाद दृढ करणे,आपल्या क्षेत्रातील अनुभव, कौशल्य आणि सर्वोत्तम यशोगाथांची माहिती देणे यावर भर देण्यात येईल.सागरी पर्यटन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन  देणे, नैसर्गिक वारशाचे संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर हा करार दोन्ही प्रदेशातील संस्कृतीची ओळख करून देणारा ठरेल, असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेचे उद्घाटन

???????????????????????????????

मुंबई, दि. ७ : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या व्यापार तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या तसेच वर्ल्ड बिझनेस कॉन्क्लेव्हच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.  राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या मार्गदर्शकांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी परिषदेचे अध्यक्ष  डॉ गौरव गुप्ता, सल्लागार पिनल वानखेडे, महाराष्ट्र शाखेच्या संस्थापक ऐश्वर्या वानखेडे, उपाध्यक्ष विक्रांत चंदवाडकर, डॉ संदीप मारवा, डॉ कल्पना सरोज व कौन्सिलचे पदाधिकारी उपस्थित होते.

कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने विविध देशांच्या दूतावासाच्या सहकार्याने राज्यात गुंतवणूक व व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

००००

???????????????????????????????

Governor Bais launches Maharashtra Chapter of Global Trade and Technology Council of India

 

Mumbai Dated 7 : Maharashtra Governor Ramesh Bais launched the Maharashtra Chapter of the Global Trade and Technology Council of India at Raj Bhavan Mumbai. The Governor unveiled the posters of the Maharashtra Chapter of the Council and the World Business Conclave being organised by the Council.

A few well wishers of the Council were felicitated on the occasion.

Founder President of the Council Dr. Gaurav Gupta, Advisor Pienaal Wankhadey, President of Maharashtra Branch Aishwarya Wankhadey – Sachdeva, Vice President Vikrant Chandwadkar, Dr. Sandeep Marwa, Dr. Kalpana Saroj and office bearers of the Council were present.

The Council aims to promote trade and investment in the state by collaborating with embassies of various countries in India.

0000

 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना आढावा बैठक

मुंबई दि ७ :- राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. राज्याची सिंचन क्षमता वाढण्याच्या दृष्टीने या योजना महत्वपूर्ण असून यासाठी निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. कामे पूर्ण करण्यासंदर्भात जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री  श्री.फडणवीस यांनी दिले.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत 10 प्रकल्प पूर्ण झाले असून 17 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत तर बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प पूर्ण झाले असून 45 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे सर्व प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

——000—–

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘धरणांच्या देशा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

मुंबई दि ७ :- ‘धरणांच्या देशा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धरणांसंदर्भातील कॉफी टेबल बुकची संकल्पना अतिशय अभिनव आणि उपयुक्त असून या निमित्ताने जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांच्या इतिहासाचे जतन होणार आहे. अभ्यासकांसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरेल असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव दीपक कपूर म्हणाले, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येतात. देशातील एकूण मोठ्या धरणांपैकी सुमारे ४० टक्के धरणे महाराष्ट्रात असून सह्याद्री पर्वताच्या कुशीत तसेच सखल भागात पाणी उपलब्धता विचारात घेऊन ही धरणे बांधण्यात आली आहेत.

धरणे आणि त्यांचे जलाशय यामुळे नवीन परिसंस्था उदयाला येतात. निसर्गरम्य परिसरामुळे ही धरणस्थळे प्रेक्षणीय स्थळे म्हणून नावारुपाला आली आहेत. या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून निवडक धरणांची छायाचित्रे तेथील अभियांत्रिकी कौशल्याचे आणि नैसर्गिक सौंदर्याचे निसर्गरम्य देखावे राज्यातील जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही श्री कपूर यांनी सांगितले.

आभार प्रदर्शन सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी केले तर  सूत्रसंचालन उप सचिव प्रविण कोल्हे यांनी केले.

—–000—–

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भूतानचे राजे यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. ७ : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक भारत भेटीवर आले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची हॉटेल ओबेरॉय येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मनीषा म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या सचिव जयश्री भोज आदींसह राज्य शासन आणि भूतानचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांना गणेश मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन राजे जिग्मे वांगचुक यांचा सत्कार केला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भूतानचे राजे जिग्मे वांगचूक यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, महाराष्ट्र आणि भूतान यांच्यात सांस्कृतिक वारसा समान आहे. दरवर्षी अजिंठा, वेरूळ येथील लेण्यांना भूतानचे पर्यटक भेट देतात, तर महाराष्ट्रातील पर्यटकांचे भूतान हे आवडीचे ठिकाण आाहे. भूतानमध्ये गुंतवणूक आर्थिक प्रकल्पांना

चालना देण्यासाठी विशेष प्रशासकीय क्षेत्र कार्यान्वित करण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्र आणि भूतान यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भूतानबरोबरच संबंध आणखी वृद्धिंगत होतील. तसेच भूतानबरोबरील परस्पर हिताचे आणि द्विपक्षीय सहकार्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार भूतानला सर्व सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

०००००

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी-माजी सदस्यांचा स्नेह मेळाव्यासह परिसंवाद

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेच्या आजी-माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे उद्या बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ राेजी सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली.

संसदीय लोकशाहीत द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधान परिषदेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. या सभागृहाने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. माँटेग्यू- चेम्सफर्ड समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियमान्वये बॉम्बे लिजिस्लेटिव्ह कौन्सिलची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी १९२१ रोजी टाऊन हॉल, मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची सभापतिपदी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी १८६२ ते १९२० या कालावधीत गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिलचे कामकाज चालत असे. सन १९२१ मध्ये नारायण चंदावकर यांच्या रुपाने प्रथमच भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधान परिषदेचा शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. मात्र, ‘कोविड १९’ महामारीमुळे त्यावेळी जाहीर कार्यक्रम आयोजित करता आला नाही. या पार्श्वभूमीवर आता हा कार्यक्रम होईल.

विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या नियोजनासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली गटनेते, सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

स्नेहमेळाव्यासह ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’, ‘आमच्या आठवणीतील विधान परिषद’ (असे सदस्य…असे प्रसंग) या विषयांवर परिसंवाद होईल. याशिवाय ‘विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विधान परिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्व आणि वैशिष्ट्ये’, ‘गेल्या १०० वर्षातील महत्वपूर्ण विधेयके, ठराव’, ‘लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवरील चर्चा’, ‘शंभर वर्षे शंभर भाषणे’ आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक, अशी पाच प्रकाशने प्रस्तावित आहेत.

०००००

 

 

वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी आता २० नोव्हेंबर रोजी

मुंबई, दि. 07 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे परिवहन संवर्गातील विविध वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी 15 नोव्हेंबर 2023 रोजी होणार होती. मात्र या दिवशी भाऊबीजनिमित्त सार्वजनिक सुटी आहे. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी आता 20 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत एअर मार्शल सुजित धारकर यांना ४ लाख रुपये मंजूर

मुंबई, दि.७ :- “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” योजनेअंतर्गत सैन्यातील १६ प्रकारच्या शौर्यपदक, सेवापदकधारकांना एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एअर मार्शल सुजित पुष्पाकर धारकर ( जि. ठाणे) यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या पत्रानुसार “परम विशिष्ट सेवापदक” हे पदक प्रदान करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार एअर मार्शल श्री. धारकर यांना रु. ४ लाख रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

 

छत्तीसगडच्या मतदार यादीत समाविष्ट मतदारांना १७ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

मुंबई, दि.७ : भारत निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या सहपत्रानुसार महाराष्ट्र शासनाद्वारे छत्तीसगड राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गोंदिया व गडचिरोली) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे छत्तीसगड राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत. अशा मतदारांना शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

मध्यप्रदेश राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे मध्य प्रदेश राज्यातील मतदारयादीमध्ये समाविष्ट असलेल्या मतदारांना शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणा राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे तेलंगणा राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मतदारांना गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय राहील. याविषयी शासनाने  अधिसूचना निर्गमित केली आहे.

0000000

राजू धोत्रे/विसंअ

आयुर्वेदाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक – दिनेश वाघमारे

मुंबई, दि. 7 : आयुर्वेदाला सुमारे ३ हजार वर्षांची परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यासाठी आयुर्वेदाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

मुंबई येथील रेसकोर्स येथे केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था आणि आयुष्य संचालनालय  एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद करीता “रन फॉर आयुर्वेद” चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, आयुष संचालक डॉ.रामण घुंगराळेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर व डॉ. आर. गोविंद रेड्डी, सहाय्यक संचालक, केंद्रीय आयुर्वेदीय अनुसंधान संस्थान उपस्थित होते.

श्री. वाघमारे म्हणाले की, ‘धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा दिवस भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने २०१६ मध्ये “आयुर्वेद दिवस” म्हणून घोषित केला आहे. या वर्षी, आयुष मंत्रालय 8 वा आयुर्वेद दिवस 2023 एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद या घोषवाक्यासह साजरा करत आहे. जी-20 च्या पारंपरिक औषधावर आणि G20 प्रेसिडेन्सीची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम्’ या घोषवाक्यासह प्रत्येक दिवशी प्रत्येकासाठी आयुर्वेद”, मानव प्राणी वनस्पती- पर्यावरण इंटरफेसवर लक्ष केंद्रीत करणे हे उद्दिष्ट आहे.

श्री.वाघमारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रन फॉर आयुर्वेदा मॅरेथॉनची सुरुवात झाली. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मंडळ, प्रभादेवी, हास्य क्लब, वरळी व इतर स्थानिक एन.जी.ओ. यांनी देखील सहभाग घेतला. युनियन बँक ऑफ इंडिया, श्री. धूतपापेश्वर लिमिटेड, चरक फार्मास्युटिकल प्रा.लि. व आर्य वैद्य फार्मसी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनास विशेष सहकार्य केले. प्रभारी सहायक निदेशक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रज्ञा कापसे, डॉ. कुलदीप चौधरी यांनी केले, तर आभार डॉ. घुंगराळेकर यांनी मानले.

००००

 

राजू धोत्रे/विसंअ/

 

 

 

ताज्या बातम्या

नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. १५: राज्यात जास्तीत जास्त नागरीकांनी नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे. पोलीस कुटुंबातील माजी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, पोलीस बॉईज...

लोकमान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा अहवाल सादर करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि. १५: पिंपरी चिंचवड व निगडी येथील लोकमान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल...

नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारणी; शासन निर्णय निर्गमित

0
सातारा दि. १५:  मौजे नायगाव ता. खंडाळा, जिल्हा सातारा येथे  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले...

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

0
मुंबई, दि. १५ : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडणूक लढवायची असल्यास, त्या व्यक्तींनी जातीचे प्रमाणपत्र...

श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधीस ‘अ वर्ग’ दर्जा

0
मुंबई, दि. १५: श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्रास विशेष बाब म्हणून तीर्थक्षेत्राचा ‘अ वर्ग’...