रविवार, मे 4, 2025
Home Blog Page 948

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमामध्ये मुलाखत

मुंबईदि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

राज्यातील कारागृहांच्या बळकटीकरणासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.   कारागृहांमधील कैद्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे तसेच त्यांच्यातील गुन्हेगारीला प्रतिबंधासाठी कारागृह व सुधार सेवा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये बंदिवानांच्या कलागुणांना वाव देणेविशेष माफीवेतनात वाढ, असे विविध उपक्रम राबविण्यात येत असून शृंखला उपहारगृहज्येष्ठ बंदिवानांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे उपक्रम काय आहेत तसेच राज्यातील कारागृहांमध्ये या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे. याबाबत दिलखुलास’ कार्यक्रमातून श्री. गुप्ता यांनी माहिती दिली आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. 19, शुक्रवार दि. 20 आणि शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

महाआरोग्य शिबिरात १० लाखापेक्षा जास्त भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 18 : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर (जि. धाराशीव) येथे देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांचे मोफत आरोग्य तपासणी करीता महाआरोग्य शिबिराचे आयोजन तुळजापूर येथे 2728 व 29 ऑक्टोंबर 2023 रोजी करण्यात येत आहे. या शिबिरात 10 लाखांपेक्षा जास्त भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. वैद्यकिय अधिकारी आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध 25 ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेतअशी माहिती सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबीराच्या आयोजनाबाबत बैठकीचे आयोजन आज आरोग्य भवन येथे करण्यात आले होते. बैठकीला मार्गदर्शन करताना  मंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी मुंबईतील विविध रुग्णालयातील डॉक्टर आणि सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले कीतेलंगणाकर्नाटकआंध्रप्रदेशसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतील भाविक तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. अशा भविकांपर्यंत शासन पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी या ठिकाणी 25 आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत.  सामाजिक संस्था आणि खासगी रुग्णांलयातील डॉक्टरांच्या मदतीने त्यांना या आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. यावेळी गरजूंना चष्माव्हीलचेअरवॉकर अशा वस्तूही पुरविण्यात येणार आहेत.   सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बाइक ॲम्ब्युलन्सही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी आपले योगदान देण्याचे आवाहनही मंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १८ : विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि देशातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘वाय4डी’ फाउंडेशन मार्फत आयोजित इंडियाज मोमेंट कॉन्क्लेवमध्ये उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ‘वाय4डी’ फाउंडेशन’ चे अध्यक्ष प्रफुल्ल निकम, हिंदुस्तान कोको कोला बिवरेजेसचे उपाध्यक्ष हिमांशू प्रियदर्शनी, ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू पद्मश्री योगेश्वर दत्त, ‘वाय4डी’चे सह सचिव अभिषेक तिवारी, बजाज फिन्सर्व्हचे अध्यक्ष कुरुश इराणी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, देशातील युवा शक्ती अनेक मोठे बदल घेऊन येत आहे. स्टार्टअप्सध्ये ६० टक्के युवक लहान शहरातून येत आहेत. या स्टार्टअप्समुळे जनतेच्या जीवनातही बदल होत आहे. रोजगार मागण्याऐवजी रोजगार देण्यावर या युवकांचा भर आहे. देशातील सर्वात जास्त नोंदणीकृत स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहेत. या युवकांची प्रगती पाहता महाराष्ट्रला ट्रिलीअन डॉलर इकॉनॉमी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.

कौशल्याला महत्व असलेल्या युगात आपण प्रवेश केला आहे. शिक्षणापेक्षा आज कौशल्याला अधिक महत्व देण्यात येत आहे. युवकांमध्ये चांगले काम करण्याची क्षमता आहे, श्रम करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना कौशल्य मिळाल्यास त्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतील. त्यामुळे उपयोजित ज्ञानावर अधिक भर द्यावा लागेल. उद्योग आणि स्वयंसेवी संस्था यांनी युवाशक्तीला कौशल्याचे ज्ञान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगजगत कौशल्य विकासासाठी सहकार्यासाठी पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कौशल्य पोहोचावा

आपली अर्थव्यव्यवस्था कृषीप्रधान असताना ४० टक्के स्टार्टअप्स कृषी क्षेत्रातील आहेत. मात्र शेती क्षेत्रात कौशल्याची मर्यादा जाणवते. त्यामुळे या क्षेत्राला गती देण्यासाठी आधुनिकता आणून शेतकऱ्यालाही कौशल्य द्यावे लागेल. महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या माध्यमातून सुमारे १० हजार गावात कृषी उद्योग संस्था तयार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा बाजार शेतकऱ्यांच्या हातात देण्याची व्यवस्था तयार करण्यात येत आहेत. उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांची यात महत्वाची भूमिका आहे. त्यांनी शासनाच्या योजनेसोबत अशा क्षेत्रात तंत्रज्ञानाची कमतरता भरून काढावी. यातून मोठे परिवर्तन शक्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मागील १० वर्षात देशाने महत्वाची प्रगती केली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेची जगात चर्चा आहे. आर्थिक प्रगतीसाठी देशात अनेक निर्णय घेण्यात आले. प्रगतीला आवश्यक ‘वन नेशन वन टॅक्स’ सारखी व्यवस्था उभी राहिली आहे. डीजीटल व्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभी करून डिजीटल व्यवहारात अमेरिका आणि चीनलाही आपण मागे टाकले आहे. २०३० पर्यंत जगातील तीसरी मोठी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत, असेही ते म्हणाले.

भारत ही लोकशाही व्यवस्था, कायद्याचे राज्य आणि उद्योगाला अनुकूलता असल्याने अनेक उद्योग देशाकडे आकर्षित होत आहेत. एका बाजूला देशाची अशी प्रगती होत असतांना आपली जबाबदारी वाढली आहे. अशा अर्थव्यवस्थेलास अनुरूप कुशल मनुष्यबळ तयार करणे ही आपली जबाबदारी आहे. देशातील उद्योग या गोष्टीकडे लक्ष देत आहेत ही समाधानाची बाब आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, इच्छा असल्यास परिवर्तन करता येते हे आपल्या कार्यातून ‘वाय4डी’ फाउंडेशनने सिद्ध केले. २० राज्यात संस्थेचे कार्य सुरू असून ७ लाखापेक्षा अधिक लाभार्थी दिसून येत आहेत. विविध क्षेत्रात हे कार्य सुरू आहे. विशेषत्वाने उद्योगजगताच्या सहकार्याने निर्माण केलेले सकारात्मक वातावरण महत्वपूर्ण आहे, अशा शब्दात त्यांनी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले.

प्रफुल्ल निकम यांनी फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा घेत कामाची, प्रकल्पांची माहिती दिली. हिमांशू प्रियदर्शनी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी फाउंडेशन आणि कोका कोला बिवरेजेस यांच्यात गावांच्या परिवर्तनाच्या कार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. तसेच फाउंडेशन आणि एलटीआयमाईंडट्री यांच्यात युवकांच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार करण्यात आला. फाउंडेशनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.

सामाजिक विकासाच्या कामात घेतलेल्या पुढाकाराबद्दल कंपन्या आणि अशासकीय संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

000

रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25 करिता सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा यासाठी सरकारने विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ केली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये  425 रुपये प्रति क्विंटल, तर पांढरी मोहरी आणि काळ्या मोहरीसाठी 200 रुपये प्रति क्विंटल दराने वाढ मंजूर करण्यात आली आहे. गहू आणि करडईसाठी प्रत्येकी 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे. बार्ली आणि हरभऱ्यासाठी अनुक्रमे 115 रुपये प्रति क्विंटल आणि 105 रुपये प्रति क्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.

विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमती:

(Rs.per quintal)

S.No Crops MSP RMS

2014-15

MSP RMS 2023-24 MSP RMS 2024-25 Cost* of production RMS 2024-25 Increase in MSP (Absolute) Margin over cost (in per cent)
1 Wheat 1400 2125 2275 1128 150 102
2 Barley 1100 1735 1850 1158 115 60
3 Gram 3100 5335 5440 3400 105 60
4 Lentil

(Masur)

2950 6000 6425 3405 425 89
5 Rapeseed

& Mustard

3050 5450 5650 2855 200 98
6 Safflower 3000 5650 5800 3807 150 52

 

सर्वसमावेशक उत्पादन खर्चाचा संदर्भ विचारात घेऊनकामगारांची मजुरीबैल किंवा यंत्राद्वारे केलेल्या आणि इतर कामांची मजुरीभाडेतत्वावर घेलेल्या जमिनीचे भाडे तसेच बियाणेखतेसेंद्रिय खतेसिंचन शुल्क यासारख्या सामग्रीच्या वापरावर झालेला खर्चशेतीची अवजारे आणि शेत बांधणीवरील घसाराखेळत्या भांडवलावरील व्याजपंप संच इत्यादींसाठी झालेला डिझेल/वीज इ.इंधनाचा खर्चइतर किरकोळ खर्च आणि कौटुंबिक मजुरीचे मूल्य यांचा या सर्व खर्चामध्ये समावेश आहे.

विपणन हंगाम 2024-25 साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एमएसपीमधील वाढ देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट इतकी निश्चित करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणेनुसार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या सरासरी उत्पादन खर्चावर अपेक्षित सर्वात जास्त 102 टक्के भाव गव्हासाठी मिळणार असून त्या खालोखाल पांढरी- काळी मोहरी या पिकांसाठी 98 टक्के,  मसुरला 89 टक्केहरभऱ्याला 60 टक्के, बार्लीला  60 टक्के तर करडईला 52 टक्के अधिक भाव  मिळणार आहे. रब्बी पिकांच्या या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतील आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल.

अन्न सुरक्षा वाढवण्यासाठीशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सरकार  तेलबियाकडधान्ये आणि श्री अन्न/भरड धान्यांच्या पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देत आहे. किंमत धोरणाव्यतिरिक्तसरकारने  आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या तसेच शेतकऱ्यांना तेलबिया आणि कडधान्ये लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी दर्जेदार बियाणे पुरवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि राष्ट्रीय तेलबिया आणि पाम तेल अभियान यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

त्याचबरोबरकिसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ देशभरातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीसरकारने किसान रिन पोर्टल (KRP), केसीसी घर घर अभियानआणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांबाबत वेळेवर योग्य निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी वेळेवर आणि अचूक हवामान माहिती प्रदान करण्यासाठी हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्ट‍िम (WINDS) सुरू केले आहेत. कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणेआर्थिक समावेशकता वाढवणेडेटाचा योग्य वापर  करणे आणि देशभरातील शेतकऱ्यांचे जीवनमान  सुधारणे हे  या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

000

प्राथमिक दूध संकलन केंद्राचा तपासणी अहवाल सादर करावा – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 18 : दूध उत्पादक शेतकऱ्यांची प्राथमिक दूध संकलन केंद्रावर फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा सहकारी दूध संस्थावैधमापन शास्त्र अधिकारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्षात वजन मापासंदर्भात पाहणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये या दृष्टीने अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले कीफॅट व एस.एन.एफ. तपासणीच्या मशीनवर तफावत आढळत असल्याने प्राथमिकस्तरावर दूध संकलन केंद्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे व अन्य साधने वापरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर दुधाचे घनफळ व वजन दोन्ही मोजमाप होऊन त्यांची नोंद शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या पावतीवर होण्यासंदर्भातही तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी सचिव सुमंत भांगेवैध मापन शास्त्रचे सह नियंत्रक विलास पवारकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटीलरूपेश पाटील यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

कोकण विभागातील जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 18 : कोकण विभागातील जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक तो निधी दिला आहे. या योजनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

कोकण विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडेकोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

 मंत्री श्री पाटील म्हणाले कीहर घर जल प्रमाणित गावे 26 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करावी. मंजूर कामांना कार्यारंभ आदेश तत्काळ देण्यात यावा. त्रयस्थ तपासणी संस्थांनी पाणीपुरवठा योजनांच्या कामाची काटेकोरपणे तपासणी करावी. तपासणी अहवाल हा दर 15 दिवसांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर करावा.

कोकण विभागातील जलजीवन अंतर्गत कामाची भौतिक प्रगतीप्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थांच्या कामाची सद्य:स्थितीनेमण्यात आलेल्या त्रयस्थ तपासणी संस्थांच्या कामाची सद्य:स्थितीजिल्हानिहाय योजनांच्या खर्चाचा तपशीलपाणीपुरवठा योजनांची सद्य:स्थिती याबाबत यावेळी चर्चा झाली.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

मुंबई, दि. १८ : राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता राज्यातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये ऑनलाइन उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी  उद्या सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.

कौशल्य विकास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या संकल्पनेनुसार ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नयेत्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्रांची संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकासउद्योग यांच्याबरोबरच महसूलग्रामविकास यांच्यासह महिला व बालविकास विभागांचा यामध्ये सहभाग असणार आहे. लोकप्रतिनिधींसह आशा व अंगणवाडी सेविका आदीं या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात सहभागी होणार आहेत. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अन्य घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/

हागणदारीमुक्त गावांचा आलेख उंचावणे गरजेचे – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 18 : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत सुरु असलेल्या कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या वर्षात वैयक्तिक शौचालय बांधकामसार्वजनिक शौचालय बांधकाम या घटकांसोबतच घनकचरा व्यवस्थापनसांडपाणी व्यवस्थापनमैला गाळ व्यवस्थापनगोबरधन प्रकल्पप्लास्टिक कचरा व्यवस्थापन या घटकांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.  या अभियानाला गतिमानता प्राप्त करुन माहे मार्च 2024 अखेरीस राज्य हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील  यांनी दिले.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अतंर्गत विविध विषयांच्या अनुषंगाने मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील आढावा बैठक  सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेराज्य पाणी व स्वच्छता मिशन अभियान संचालक तथा सहसचिव शेखर रौंदळकार्यकारी अभियंता अपूर्वा पाटीलअवर सचिव चंद्रकांत मोरे,  अवर सचिव स्मिता राणे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले कीस्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत विविध उपांगांना गतिमानता प्राप्त होण्यासाठी प्रकल्‍प संचालक जल जीवन मिशन या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरुन अभियानाचा आलेख उंचविण्यासाठी कार्यवाही करणे आवश्यक आहे. सन 2024-25 या वर्षात राज्य हागणदारीमुक्त प्लस घोषित करावयाचे असले, तरी मार्च 2024 अखेरीस राज्य हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित करावे. माहे डिसेंबर 2023 अखेरीस 50 टक्के गावे मॉडेल म्हणून घोषित करण्यात यावे.

इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्याचा मॉडेल गावे घोषित करण्याचा आलेख वाढविणे गरजेचा आहे. त्यामुळे विहित कालावधीमध्ये राज्य हागणदारीमुक्त प्लस घोषित करण्यासाठी सर्व उपांगाची कामे पूर्ण करुन केद्र शासनाच्या संकेत स्थळावर नोंदित करावीत. तसेच अभियान गतिमान करुन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीपर्यंत लोकचळवळ उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती

मुंबई, दि. 18 : शेतकरी नेते सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल उर्फ पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

श्री. पटेल हे या पूर्वीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार  म्हणून त्यांची ओळख आहे.

श्री. पटेल यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. बांबू लागवडबांबूवरील संशोधन तसेच बांबूपासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा औसा येथील त्यांचा प्रकल्प पारदर्शी आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून श्री. पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतीलअसा विश्वासही मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

शासनाच्या सहभागाने सातारा येथे शाही दसऱ्याचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.18 (जिमाका):  यंदाचा सातारचा शाही दसरा उत्सव पारंपरिक लवाजम्यासह मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. या शाही दसरा उत्सवात शासनाचाही सहभाग असणार आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होण्यासाठी सर्व विभागांनी आपआपले योगदान द्यावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या तर्फे साजरा होणाऱ्या पारंपरिक शाही दसरा सोहळ्यामध्ये यावर्षीपासून शासनाचा सहभाग असणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलीस अधीक्षक समिर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादवे घुले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सुनिल काटकर, पंकज चव्हाण ,संग्राम बर्गे, जितेंद्र खानविलकर, काका धुमाळ, विनित पाटील, आदी उपस्थित होते.

शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी प्रांताधिकारी सातारा यांना सन्मवयक म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जलमंदिर येथे पालखीमध्ये भवानी तलवार पुजनावेळी पोलीस बॅन्ड पथकाने मानवंदाना द्यावी.  मिरवणुकीमध्ये घोडे, उंट यांचाही वापर करावा. यावर बसणाऱ्यांना मावळ्यांचा पोशाख द्यावा. पालखी सोबत समारंभाच्या पोषाखातील पोलीस पथक ठेवावे. शासनातर्फे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे.

दसरा शाही मिरवणुकीला सायंकाळी 5.30 वाजता सुरुवात होईल. ही मिरवणूक जलमंदिर ते शिवतिर्थ अशी होईल. त्याचबरोबर शाही पोवाड्याचे आयोजन करावे. राजपथ मार्ग नगर परिषदेने स्वच्छ करावा. तसेच शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करावी.  मिरवणूकीच्या प्रारंभी पोलीस पायलेटींग ठेवावे. या वर्षीचा शाही दसरा सर्वांच्या सहभागाने उत्साहात साजरा करावाचा आहे त्या दृष्टी जबाबदारी दिलेल्या विभागांनी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

0000

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

0
अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व...

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख...

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

0
मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ' क्रिएट इन...

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

0
मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस...

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

0
मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी...