सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 965

विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी घेतले मुंबईतील गणरायांचे दर्शन

मुंबईदि. 27 : विविध देशांचे महावाणिज्य दूतवाणिज्य दूत तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होऊन गणरायांचे दर्शन घेतले. हा सण समाजामध्ये एकतेची भावना निर्माण करणारा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याबरोबरच पर्यटन उद्योगासाठीही चालना देणारा महोत्सव आहे. धार्मिक सीमा ओलांडून एकात्मता जागवणारासांस्कृतिक देवाण-घेवाण घडवणारा आणि आर्थिक वृद्धी साधणारा हा सण आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आज जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत वाणिज्यदूतांसाठी गणेश दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगीपर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी दूतावासातील मान्यवरांचे स्वागत करून त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सवाबद्दल माहिती दिली.

सिंगापूरदक्षिण आफ्रिकाचिलीथाईमॉरिशसजपानबेल्जियमऑस्ट्रेलियाआयर्लंडफ्रान्सयुनायटेड किंग्डमकुवैतस्पेनइटलीमेक्सिकोश्रीलंकास्वीडन आदी देशांतील सुमारे ४२ मान्यवरांनी यावेळी गणेश गल्ली तसेच वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेश मंडळांसह सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन घेतले.

गणरायांच्या दर्शनानंतर पाहुण्यांनी आंतरराष्ट्रीय गणेश फेस्टिवल २०२३ अंतर्गत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे उभारण्यात आलेल्या विशेष सांस्कृतिक केंद्रात आयोजित कला प्रदर्शनाला भेट देऊन कलावंतांनी सादर केलेल्या विविध कलांचे कौतुक केले. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित या प्रदर्शनात वाळू शिल्पमॉझेकस्क्रॉल आर्टवारली कलाहस्तकलामातीची गणेश मूर्ती बनविण्याचा अनुभव देणारे प्रशिक्षणलोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रमगणेशोत्सव काळात घर घर गणेश‘ आणि वेस्ट टू वंडर‘ संकल्पनेवर आधारित ऑनलाईन फोटोग्राफी स्पर्धा आदींची रेलचेल होती. या माध्यमातून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनालाही वाणिज्यदूतांनी भेट देऊन चित्रांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

राज्यातील पर्यटनाला चालना देणेपारंपरिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देणे तसेच गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी देऊन राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करणे या उद्देशाने पर्यटन संचालनालयाद्वारे दि.१९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मुंबईपुणेपालघर व रत्नागिरी येथे गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडित भागधारकट्रॅव्हल एजंटटूर ऑपरेटर्सप्रवासी पत्रकार व समाजमाध्यम प्रभावक यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांना परिचय सहलीच्या माध्यमातून मुंबईपुणेपालघर व रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव दर्शनाची थेट सुविधा तसेच आपल्या सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबईतील विविध देशाच्या वाणिज्य दुतावासांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून त्यांना मुंबईतील नामांकित गणेश मंडळांमार्फत थेट दर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

राज्यात १ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार

मुंबईदि. २७ : राज्यात सर्वत्र १ ऑक्टोबर  हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक निर्गमित केले आहे.

राज्यात सर्व जिल्हाधिकारीस्थानिक स्वराज्य संस्थाशासकीयनिमशासकीय कार्यालयेमहानगरपालिका व नगरपालिकानगर परिषदांमार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित करण्यात येणार आहे. या दिनानिमित ज्येष्ठ नागरिकांसाठी  विविध कार्यक्रम / उपक्रम राबविण्यात यावेत.ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्ताने सार्वजनिक पदयात्राप्रभात फेऱ्यासभाविशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कारगौरवआरोग्य शिबीरचर्चासत्र / परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींचा माहितीवृध्दांचे हक्कज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हाने घालविता यावात्यांचे जीवन सुसह्य व्हावेशारिरीक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावेवृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमताकामाचा हक्कशिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. ०९ जुलै २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतूदीनुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” (International Day of Older Person) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत पाटगाव (जि.कोल्हापूर) ला राष्ट्रीय स्तरावर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र

नवी दिल्लीदि.27 : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट व पर्यटन विभागाच्या सचिव व्ही. विद्यावती यांच्या हस्ते  देण्यात आलेला हा पुरस्कार पर्यटन विभागाच्या पुणे विभागीय उपसंचालक शमा पवारमहात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशीपाटगावचे सरपंच विलास देसाईमधपाळ वसंत रासकर यांनी स्वीकारला.

शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिकनैसर्गिकआर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. यापैकी 5 गावांना सुवर्ण10 गावांना रौप्य तर 20 गावांना कांस्य प्रमाणपत्र मिळाले आहे.

युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑरगनायझेशनयुनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमजी -20केंद्रीय पर्यटन मंत्रालय व केंद्रीय वन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या गावांचा वर्षभर विकास करण्यात येणार आहे. रुरल टुरिझम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया ही देशपातळीवरील संस्था देशातील या 35 गावांचा विकास करणार आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येवून याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने पाटगाव मध्ये मधाचे गाव पाटगाव’ हा उपक्रम राबविण्यात येत असून याव्दारे ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रोत्साहन देत निधी उपलब्ध करुन दिला आहे. मध विक्री व मध पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीपासून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य केले. मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून सूक्ष्म नियोजन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील तसेच नाबार्डखादी व ग्रामोद्योग विभागमहसूलग्रामविकासपर्यटन विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले आहे. नाबार्डच्या सहकार्यातून पाटगाव मधउत्पादक शेतकरी कंपनी’ स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून मध उत्पादकविक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व मध निर्मिती व विक्री उद्योगाला चालना देण्यात येत आहे. 

पाटगावच्या मधाचे ब्रँडींगपॅकेजिंगलेबलिंग व मार्केटींगसाठी प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन सुरु आहे. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणेमधपाळांना मधपेट्या देणेआवश्यक कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पाटगावसह शिवडावअंतुर्लीमठगाव,  तांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

या उपक्रमांतर्गत पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्यावतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्थास्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्यामधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळ येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

0 0 0 0 0

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त प्राध्यापक केशव सांगळे यांची ‘दिलखुलास’ मध्ये दि. २, ३, ४ ऑक्टोबरला मुलाखत

मुंबई, दि. २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय), मुंबई येथील उच्च शिक्षण विभागातील प्रा. केशव सांगळे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या देशभरातील शिक्षकांची यादी जाहीर झाली असून यामध्ये व्हीजेटीआय मुंबई येथील उच्च शिक्षण विभागातील प्रा. सांगळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने प्रा. सांगळे यांनी आपल्या वाटचालीबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन व योगदानाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. २, मंगळवार दि. ३, आणि बुधवार दि. ४ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

नाशिक जिल्हा बँकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी समिती गठित करून कृती आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईदि. 27 : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नाबार्डकडून बँकिंग परवाना रद्द करण्याबाबतची अंतिम नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा पायाशेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या या बँकेला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी बँकेची भांडवल पर्याप्तता वाढविण्यासह इतरही विविध उपाययोजना कराव्या लागतील. यासंदर्भात अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासह कृती आराखडा तयार करण्यासाठी समिती गठित करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणींबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळसहकार मंत्री दिलीप वळसे पाटीलआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितआमदार सर्वश्री ॲड. माणिकराव कोकाटेदिलीप बनकरनितीन पवारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरसहकार  विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मासहकार आयुक्त अनिल कवडे (व्हीसीद्वारे)विभागीय सहनिबंधक संतोष पाटील, ‘नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक गोवर्धनसिंह रावतमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष (प्रशासक) विद्याधर अनास्कर (व्हीसीद्वारे)नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीनाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांसह शेतकरीविविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नाशिक जिल्हा बँकेला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे बँकेची सद्य:स्थिती तपासूनविविध पर्यायांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासह त्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यासाठी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी. या समितीने नाबार्डकडून बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत आलेल्या नोटीस संदर्भात कृती आराखडा तयार करावा आणि सविस्तर प्रस्ताव नाबार्डला सादर करावाअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत

मुंबईदि. 27 : राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ हा उपक्रम राबिण्यात येत आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावाअसे आवाहन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.

देशात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे.  स्वच्छता मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्वच्छता हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे, यासाठी जन सहभाग अत्यंत गरजेचा आहे. त्याअनुषंगानेच राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी एक तारीख- एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम काय आहेयाचे नियोजन व अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहेयाबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांनी दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार दि.29 आणि शनिवार दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवारदि. 30 सप्टेंबर2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७अर्ज प्राप्त

मुंबईदि. 27 : सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करून भरती करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत प्रयत्नरत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू झाली. याबाबत त्यांनी विविध बैठकाही घेतल्या. ही भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत घेतलेल्या बैठकीत निर्देशही दिले आहेत. तसेच याबाबत विभागाने कंपनी प्रतिनिधीसोबत नियतकालिक आढावा बैठक घेऊन भरती प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार विभागातील रिक्त पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया गतीने पुढे सरकत आहे.

आरोग्य विभागाच्या गट ’ व ’ मधील भरतीसाठी 2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त झाले आहेत.  गट मधील एकूण 55 संवर्गातील 6 हजार 949 रिक्त पदे असून ’ गटातील 4 हजार 10 रिक्त पदे आहेत. अशाप्रकारे एकूण 10 हजार 949 पदांसाठी आरोग्य विभगाने जाहिरात प्रसिद्धीस दिली. या जाहिरातीस प्रतिसाद मिळत तब्बल 2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये गट ’ मधील रिक्त पदांसाठी 1 लाख 42 हजार 206 आणि ’ गटातील रिक्त पदांकरीता 11 हजार 649 अर्जांचा समावेश आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे 8 परिमंडळ क्षेत्रात विभागलेली आहेत. गट चे नियुक्ती प्राधिकारी उपसंचालकआरोग्य सेवा आहेत.

आरोग्य विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी विभागाने 28 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 22 सप्टेंबर 2023 होती. भरती प्रक्रियेत अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आता संपला असून लवकरच पुढील कार्यवाही होणार आहे. भरतीमुळे आरोग्य विभागातील विविध रुग्णालयांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामुळे मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होणार आहे. नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागांवर मनुष्यबळ नियुक्त करण्याचे काम लवकरात लवकर केले जाणार आहे. या भरतीमुळे आरोग्य यंत्रणा निश्चितच अधिक बळकट होणार आहे.

निलेश तायडे/विसंअ/

दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 27 : दिवेआगार ता.श्रीवर्धन, जि. रायगड येथील सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता देऊन यासाठी 5 कोटी 64 लाख 31 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मंत्रालयात आज दिवेआगार ता.श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र, गिरणे, ता.तळा येथे खार भूमी संशोधन केंद्र आणि किल्ला, ता.रोहा येथील काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री.मुंडे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी विद्यापीठाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, दिवेआगार येथे 5 एकर जागेत सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास त्वरीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पाच कोटी 64 लाख 31 हजार रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. किल्ला, ता.रोहा येथील काढणीपश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा आराखडा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी सादर करावा. तसेच विद्यापीठाला गिरणे, ता. तळा येथे दिलेल्या जागेत उभारण्याच्या खारभूमी संशोधन केंद्राचा आराखडा तयार करुन मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी दिले.

हे आराखडे तयार करताना कोकणातील नारळ, सुपारी, आंबा या फळपिकांसोबतच विविध प्रकारच्या मसाला पिकांचाही  संशोधनात समावेश करावा, तसेच श्रीवर्धन रोठा सुपारीला जीआय मानांकन मिळविण्यासाठी कार्यवाहीला गती देण्यात यावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

छत्रपती संभाजीनगर महानगरात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि.27, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर महानगरातील गॅस पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अहमदनगर, नेवासा फाटा, गंगापूर, वाळूज मार्गे महानगरात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम 1 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज दिले. गॅस पाईपलाईनच्या कामातील अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.कराड यांनी गॅस पाईपलाईन कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोंखडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, भारत पेट्रोलिअमचे श्री.सचदेव यांच्यासह गॅस पाईपलाईन यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉ.कराड म्हणाले, आपल्या महानगरात गॅस लाईन लवकरच येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह पुरी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ होणार आहे. पाईपलाईनद्वारे मिळणारा गॅस सध्याच्या सिलेंडरमध्ये मिळणाऱ्या गॅसच्या दरापेक्षा कमी दरात मिळणार आहे. हा गॅस पर्यावरणपूरक आहे. तसेच गॅस लीक झाला तर तात्काळ हवेत विरघळतो. हा गॅस 30 ते 35 टक्क्यांपर्यत स्वस्त असणार आहे. गॅस पाईपलाईनची महत्वाकांक्षी योजना पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासन, महानगर पालिका, पीडब्लुडी, नॅशनल हायवे, महावितरण यासह संबंधित यंत्रणांनी गतीने काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

आपल्या महानगरात लवकरात लवकर गॅस यावा ही जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना आपल्या कामात गती घ्यावी लागणार आहे. 1 डिसेंबरच्या आत काम पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे.  कामात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच गॅस पाईपलाईन कामकाजाबाबत आपण दर 15 दिवसाला आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोदावरी नदीपात्रात एचडीडी मशीनच्या माध्यमातून गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. 1300 मीटर क्रॉसिंगचे हे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी श्री.पाण्डेय यांनी छत्रपती संभाजीनगर व जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी अहमदनगर जिल्ह्यात गॅस पाईपलाईन कामाबाबत माहिती दिली. गॅस पाईपलाईनचे काम वेळेपूर्वी पूर्ण होण्यासाठी सातत्याने आढावा घेणार असल्याचे सांगितले.

लोकशाहीच्या बळकटीसाठी नवमतदारांनी नोंदणी करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि.27 :  लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना दिलेल्या मतदानाचा हक्क बजावणे  आवश्यक आहे. त्यासाठी 17 व 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुण नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज केले.

            ‘सेवा महिना’ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मतदार नोंदणी, आधारकार्ड, पॅन कार्ड काढणे व दुरुस्ती करणे आदी विविध सेवांसाठी आयोजित विशेष शिबिराचे उद्घाटन डॉ. पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क प्रत्येकाला दिला आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी व देशाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थींनींना मतदानाचे महत्व पटवून देत मतदार नोंदणीबाबत व्यापक जनजागृती करावी. विभागातील प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नाव समाविष्ट होण्यासाठी विहित नमूना महसूल विभागाला सादर करावा, असे आवाहन डॉ. पाण्डेय यांनी केले.

            मतदार नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाव्दारे मोहिम राबविण्यात येत असून वेळोवेळी शिबीरांचेही आयोजन करण्यात येते. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. आज आयोजित नोंदणी शिबीरात जिल्हा प्रशासनाकडून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थ्यांची नवमतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. भारतीय निवडणूक आयोगाव्दारे मतदार नोंदणी व मतदार कार्ड मिळण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत इतरांनाही मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी केले.

            या शिबिरात 300 विद्यार्थी उपस्थित होते. पैकी 210 लाभार्थ्यांची मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले  असून,  50 जणांचे आधारकार्ड व पॅनकार्ड संबंधी नोंदणी करण्यात आली.

यावेळी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नियमितपणे मतदान करणारे शंभर वर्षीय दत्तात्रय लोमटे तसेच नवमतदार आराध्य गायकवाड व कु. मेहर गुप्ता आदींचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिंदे यांनी प्रास्ताविकातून मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय अधिकारी श्री. भटकर यांनी आभार मानले. या शिबिरात शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...