मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 1640

‘दिलखुलास’कार्यक्रमात उद्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांची मुलाखत

   

मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात आरोग्य विभागाच्या संचालक तथा राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालक डॉ.साधना तायडे यांची  रक्तदान पवित्र दानया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर  २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत प्रसारित होईल. निवेदक आशुतोष सावे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

     

या मुलाखतीमध्ये रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानापूर्वी केल्या जाणाऱ्या तपासण्या, राज्याची रक्ताची गरज, रक्त संकलन केंद्र, रक्त व रक्तगटाचे जीवनमान, राज्य रक्तसंक्रमण परिषदेचा उद्देश याविषयावर सविस्तर माहिती डॉ.साधना तायडे यांनी दिली आहे.

४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी

मुंबई, दि. 10 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 50 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 अशी झाली आहे.

राज्यात पनवेल मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजेच 5 लाख 57 हजार 507 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 98 हजार 719 आहे तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 58 हजार 605 इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून 173 पुरुष आणि 10 महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण 576 नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण 5 लाख 58 हजार 083 मतदार आहेत.

राज्यात वडाळा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 2 लाख 03 हजार 776 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 06 हजार 219 आहे तर महिला मतदारांची संख्या 97 हजार 515 इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून 40 पुरुष आणि 2 महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण 224 नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण 2 लाख 04 हजार इतके मतदार आहेत. ००००

4 अक्टूबर तक 4 लाख 90 हजार नए मतदाताओं ने किया पंजीयन

मुंबई : मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय के मार्फत चलाए गए मतदाता पंजीयन अभियान में  4 अक्तूबर 2019 तक नए 4 लाख 90 हजार 050 मतदाताओं का पंजीयन हुआ हैं. अब राज्य में कुल मतदाताओं की संख्या 8 करोड़ 98 लाख 39 हजार 600 हुई हैं.

राज्य में पनवेल निर्वाचन क्षेत्र में सर्वाधिक है. पनवेल में 5 लाख 57 हजार 507 मतदाताओं का नाम मतदाता सूची में दर्ज किया हैं.  इसमें पुरुष मतदाताओं की संख्या 2 लाख 98 हजार 719 हैं जबकि महिला मतदाताओं की संख्या 2 लाख 58 हजार 605 हैं. सर्विस मतदाता के रूप में 173 पुरुष और 10 महिला मतदाताओ का पंजीयन किया गया है. मतदाता पंजीयन अभियान के बाद निर्वाचन क्षेत्र में कुल 576 नए मतदाताओं का पंजीयन पूर्ण हुआ है. इस निर्वाचन क्षेत्र में कुल 5 लाख 58 हजार 083 मतदाता हैं.

राज्य में वडाला निर्वाचन क्षेत्र में सर्वाधिक कम यानी 2 लाख 03 हजार 776 मतदाता हैं. इसमें पुरुष मतदाताओं की संख्या 1 लाख 06 हजार 219 है तथा महिला मतदाताओं की संख्या 97 हजार 515 तक हैं. सर्विस मतदाता के रूप में 40 पुरुष और 2 महिला मतदाताओं का पंजीयन किया गया हैं. मतदाता पंजीयन अभियान के बाद इस निर्वाचन क्षेत्र में  कुल 224 नए मतदाताओं का पंजीयन पूरा हुआ है. अब इस निर्वाचन क्षेत्र में  कुल 2 लाख 04 हजार मतदाता हैं.

००००

‘कम्युनिटी रेडिओं’नी मतदार जागृतीसाठी योगदान देण्याचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांचे आवाहन

पुणे येथे राज्यस्तरीय कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन

पुणे, दि. 10: निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सहभागपूर्ण लोकशाहीसाठी मतदार जागृतीच्या माध्यमातून समूह रेडिओनी (कम्युनिटी रेडिओ) आपले योगदान द्यावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी आज येथे केले.

पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यभरातील कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सिन्हा बोलत होते. याप्रसंगी निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव एस. के. मिश्रा, ‘स्मार्ट व्होटच्या अर्चना कपूर आदी उपस्थित होते.

कम्युनिटी वाहिन्यांच्या स्वरूपात नव्याने रेडिओ हे माध्यम पुन्हा प्रभावीपणे उदयास आले आहे, असे सांगून श्री. सिन्हा म्हणाले की, लोकांशी जोडण्याचे हे सशक्त माध्यम ठरले आहे. लोकांना कोणताही दबाव, प्रभाव, प्रलोभनाला बळी न पडता नैतिक मूल्यांच्या आधारे मतदान करण्यासाठी जागृत करण्याचे काम कम्युनिटी रेडिओंनी करावे. त्यासाठी रेडिओंनी स्थानिक भाषा, संस्कृती लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण कार्यक्रम निर्माण करावेत. मतदार जागृतीचा कार्यक्रम निरंतर चालू ठेवायचा आहे.

रेडिओ माध्यमाचे महत्त्व लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाकडून स्वतःची वेब रेडिओ वाहिनी सुरू करण्यात येणार आहे. ही वाहिनी इंटरनेटच्या माध्यमातून जगातून कोठूनही लाभ घेता येईल. सर्व कम्युनिटी वाहिन्या या वेब रेडिओशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. आयोगाच्यावतीने देशात15 लाख साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार असून 6 लाख स्थापन झाले आहेत. राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःची कम्युनिटी रेडिओ वाहिनी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार म्हणाले की, निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणता उमेदवार निवडायचा याचा निर्णय घेण्याची भूमिका म्हणजेच एक प्रकारे न्यायाधीशाची भूमिका यामुळे सामान्य मतदाराला मिळते. सर्वसामान्य नागरिकांशी जोडण्याचे कम्युनिटी रेडिओ हे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे कम्युनिटी रेडिओंनी लोकांना या न्यायाधीशांच्या भूमिकेचे महत्त्व आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण बाबी लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचविण्यासाठी कल्पकतेने कार्यक्रम निर्माण करावेत.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, मतदानाचा हक्क, आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक प्रक्रियेविषयी सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने पोहोचविण्यासाठी कार्यक्रमांची निर्मिती करावी. तसेच युवक, महिला, वृद्ध आदी लक्ष्य गट ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम प्रसारणाची वेळ ठरवावी.

यावेळी श्री. सिन्हा यांच्या हस्ते मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने निर्मिती करण्यात आलेल्या निवडणूक विषयक जनजागृती ध्वनिचित्रफितींचे उद्घाटन करण्यात आले.

आभार अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मानले. यावेळी कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा स्वीप अधिकारी यांनीही प्रातिनिधिक स्वरूपात आपले अनुभव मांडले.

भारत निवडणूक आयोगाने’स्मार्टफौंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी मीडिया कम्युनिटी कन्सल्टंट रुक्मिणी वेमराजू उपस्थित होत्या. कार्यशाळेसाठी राज्यातील सुमारे 22 कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे 40 प्रतिनिधी उपस्थित आहेत.

राज्यात १ कोटीहून अधिक तरुण मतदार

मुंबई, दि. 9:राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45 लाख 81 हजार 884 युवती आहेत. 611 तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.

राज्यात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 8 कोटी 99 लाख 36 हजार 261  मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण 5 हजार 560 अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष 4 हजार 54 आहेत तर 1 हजार 506 अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.

ठाणे, पालघर जिल्ह्यात सव्वातीन हजार लिटरचा अवैध ताडीसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबई, दि. 9 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काल केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवणूक केलेला 3 हजार 300 लिटर ताडीसाठा जप्त केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क, ठाणे कार्यालयाचे अधीक्षक नितीन घुले, पालघर कार्यालयाचे अधीक्षक डॉ.व्ही. टी. भुकन आणि त्यांच्या पथकाने वसई तालुक्यातील भुईगाव, कळंब, नवापूर या ठिकाणी अवैध ताडीसाठ्यावर छापे घातले. यामध्ये राजू म्हात्रे या व्यक्तीच्या घराजवळ विनापरवाना सुमारे 2275 लिटर ताडीसाठ्याचे कॅन आढळून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन राजू म्हात्रे फरार झाला. त्यास दारुबंदी गुन्ह्यामध्ये फरार घोषित करण्यात आले. नाळा गावातील ताडीमालक विरेंद्र रवींद्र म्हात्रे हा छापा पडू नये म्हणून आपल्या घराजवळील ताडी टेम्पोमध्ये (क्र.एमएच-48-टी-4648) 35 लिटरचे 20 कॅन भरत असताना त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.

जप्त करण्यात आलेली ताडी ही फार दिवसांची असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. दोन्ही आरोपी हे बऱ्याच दिवसांचा शिळा ताडीसाठा करुन मुंबई-ठाणे परिसरात बेकायदेशीर ताडीची विक्री करतात. त्यांच्यावर गुन्हे नोंद झाल्याने व विरेंद्र म्हात्रेला अटक झाल्यामुळे वसई परिसरात दसऱ्याच्या दिवशी सर्व बेकायदेशीर ताडीवाल्यांना कठोर कारवाईचा संदेश दिला गेला आहे.

नवापूर येथे प्रदीप डोंगरीकर याच्या घरीदेखील दारुबंदी गुन्ह्यांतर्गत छापा घातला असता 24 तासांपेक्षा जास्त कालावधीची 325 लि. ताडी आढळून आली. हा शिळी ताडी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जुहू, विलेपार्ले, अंधेरी, सांताक्रुझ व कांदिवली पोयसर आणि मुंबई शहर जिल्ह्यातील चौपाटी वाळकेश्वर येथील दुकानात पाठविण्यात येत असल्याबाबतची कागदपत्रे आढळून आली. त्यामुळे या पाच दुकानांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.

गतवर्षीही ताडी दुकानदारांवर केलेल्या कारवाईत 24 तासांपेक्षा अधिक शिळ्या ताडीचा साठा केलेल्या मुंबई आणि ठाणे येथील 13 दुकानदारांवर विभागीय गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये मुंबई उपनगरमधील ताडी दुकाने 15 दिवसांसाठी बंद केली होती.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.9.10.2019

राज्यात ३ लाख ९६ हजार दिव्यांग मतदारांची नोंदणी

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी दिव्यांग मतदार – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई,दि. 8 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 67 हजार 279 दिव्यांगांची नोंद झाली असून,ती राज्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात 24 हजार 197 व सांगलीमध्ये 21 हजार 742 जणांनी दिव्यांग म्हणून नोंदणी केली आहे. सर्वात कमी 2329 जणांनी हिंगोली जिल्ह्यात दिव्यांग असल्याची नोंद केली आहे.

दिव्यांगांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा करण्यात येणार आहे. दिव्यांगाना केंद्रापर्यंत सुलभपणे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात येतील. दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे,म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावे,यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

यंदाचे वर्ष हे सुलभ निवडणूक (ॲक्सेसेबल इलेक्शन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी,यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. पीडब्ल्यूडी ॲपद्वारे दिव्यांगांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/8.10.2019

0000

राज्य में 3 लाख 96 हजार दिव्यांग मततादाओं का हुआ पंजीकरण

पुणे जिले में सबसे अधिक और सबसे कम हिंगोली जिले में – मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे

मुंबई, दि. 8 : विधानसभा चुनाव के लिए राज्य में कुल 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदाताओं का पंजीकरण हुआ है। दिव्यांग मतदाताओं के लिए मतदान केन्द्रों पर विशेष सुविधा उपलब्ध कराने की सूचना दिए जाने की जानकारी अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी है।

जानकारी में बताया गया है की, पुणे जिले में 67 हजार 279 दिव्यांग व्यक्तियों का पंजीकरण हुआ है और यह राज्य में सर्वाधिक है। इसके बाद कोल्हापूर जिले में 24 हजार 197 और सांगली जिले में 21 हजार 742 लोगों ने दिव्यांग के रूप में पंजीकरण किया है। इसके अलावा सबसे कम यानि की 2329 लोगों ने हिंगोली जिले में दिव्यांग के रूप में पंजीकरण किया है।

        

श्री. शिंदे ने जानकारी में बताया है कि दिव्यांगों को मतदान करते समय कोई भी दिक्कत न हो, इसके लिए मतदान केंद्रों पर विलचेअर की सुविधा की जाएगी। दिव्यांगों को केंद्रों तक आसानी से पहुँचने के लिए रैम्प लगाए जाएंगे। दिव्यांग मतदाताओं को सुविधा हो सके, इसलिए पहले तथा दूसरे मंजिल के तकरीबन 5400 मतदान केंद्र भूतल पर स्थलांतरित किए गए है। उन्होंने बताया कि अधिक से अधिक दिव्यांग मतदाता मतदान कर सके, इसके लिए विशेष प्रयास किए जा रहे है। 

यह साल सुलभ चुनाव (ॲक्सेसेबल इलेक्शन) के रूप में घोषित किया गया है। इसलिए अधिकतर दिव्यांग नागरिक मतदाता के रुप में अपना पंजीकरण करे, इसके लिए मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय की ओर से विशेष प्रयास किए गए है। पीडब्ल्यूडी ॲप के द्वारा दिव्यांगों का पंजीकरण करने का आवाहन किया गया है।

००००

Registration of 3.96 lakhs handicapped voters in the state

Most in Pune district; lowest in the Hingoli district – Dilip Shinde, Additional Chief Electoral Officer

Mumbai, 8.Oct.19 : “Total 3, 96, 673 handicapped voters have registered their names for the assembly elections in the state. Instructions for providing special facilities for voters with disabilities at polling booths” informed Additional Chief Electoral Officer Dilip Shinde.

He further stated that Pune district has recorded 67,279 handicaps which is the highest in the state. Following this, 24,197 disable voters are in Kolhapur district while 21,742 are in Sangli. Lowest number of handicapped voters 2329 are in Hingoli district.

“Facility of wheelchairs at the polling booths should be provided as handicapped people should not face any problem while exercising their franchise. Ramps will be set up for easy access to the disable people to the polling booths. About 5400 polling booths on the first and second floor have been relocated to the ground floor to facilitate the handicapped voters.  Special efforts are being made to increase the number of handicapped voters said Mr. Shinde

This year has been declared as an easy election. Therefore special efforts were made by the Chief Electoral office for maximum number of persons with disabilities should register as voters.

Mr. Shinde appealed to handicapped people to register their name through PWD App for the coming assembly elections in the state.

0000

राज्यात आचारसंहिता कालावधीत ४७७ गुन्हे दाखल

मुंबई, दि.8 :निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे,सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक 21 सप्टेंबरपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे,सार्वजनिक शांतता,सुरक्षितता भंग करणे, बेकायदेशीररित्या जमाव करणे, तलवारी,बंदुका आदी शस्त्रे,स्फोटक पदार्थ बाळगणे आदी स्वरुपाच्या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार113गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार16गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ बाळगणे,विक्रीसाठी वाहतूक करणे आदी स्वरुपाच्या78प्रकरणात एनपीडीएस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. स्फोटके कायद्यानुसार3प्रकरणात,महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत234प्रकरणात,मालमत्तेचे विद्रुपीकरण अधिनियमांतर्गत25प्रकरणात तर अन्य विविध अधिनिमांतर्गत8प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात आजपर्यंत परवाना नसलेली 626 शस्त्रे, 260 काडतूसे आणि 46 जिलेटीन आदी  स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांकडून 32 हजार 937 शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत. 24 प्रकरणात परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तर 166 शस्त्रपरवाने रद्द करण्यात आले आहेत.

फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची 41 हजार 638 प्रकरणे विचारात घेण्यात आली असून 15 हजार 838 प्रकरणात अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या 9 हजार 117 प्रकरणात अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. 27 हजार 457 प्रकरणात अजामीनपत्र वॉरंट बजावण्यात आली असून 15 हजार 711 प्रकरणात ही कार्यवाही सुरू आहे.राज्यात10हजार605तपासणी नाके कार्यरत असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

०००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.8.10.2019

0 0 0 0

राज्यमेंआचारसहिंताकेचलते४७७अपराधदर्ज

मुंबई, 8अक्टूबर:-चुनावआचारसंहिताकेलागूहोनेसेलेकरअबतकराज्यमेंचुनावआचारसंहिताकाभंगकरनेतथाबिनाअनुमतिकेहथियाररखने,अवैधशराबतथासामाजिकशांतताकोबाधापहुंचानेकेमामलोंमें477अपराधदर्जकिएगएहैं.यहजानकारीअतिरिक्तमुख्यनिर्वाचनअधिकारीदिलीपशिंदेनेदी.

आमविधानसभाचुनावघोषितहोनेकेसाथहीआचारसंहिताराज्यमेंलागूकीगईहै,जिसकाकढ़ाईकेसाथप्रशासनकीओरसेपालनकियाजारहाहै. 21सितंबरसेआजतक,कानूनएवंसुव्यवस्थाकोलेकरराज्यभरमेंपुलिसविभागतथाउत्पादनशुल्कविभागकीओरसेकार्रवाईकीजारहीहै.सरकारीकाममेंबाधाउत्पन्नकरना,सार्वजनिकशानतथाभंगकरना,सुरक्षाकोनुकसानपहुंचा,गैरकानूनीतरीकेसेभीड़इकट्ठाकरना,तलवारतथापिस्तौलआदिजैसेघातकहथियारऔरविस्फोटकपदार्थरखनेकेआरोपमेंभारतीयदंडसंहिताकीविभिन्नधाराओंकेअनुसार113अपराधदर्जकिएगएहैं.

 लोकप्रतिनिधीकानूनकेअनुसार16अपराधदर्जकिएगएहैं.नशीलेपदार्थरखनातथाबिक्रीकेलिएउसकीयातायातकरनेजैसे78मामलेएनडीपीएसकानूनकेतहतदर्जकिएगएहैं.विस्फोटककानूनकेतहततीनमामले,महाराष्ट्रपुलिसअधिनियमकेतहत234मामले,संपत्तिकोनुकसानपहुंचानेके25केसतथाअन्यधाराओंकाउल्लंघनकरनेपरआठमामलेदर्जकिएगएहैं.

 राज्यमेंअबतकबिनालाइसेंसके626हथियार, 260कारतूसतथा46जिलेटिनजैसेविस्फोटकपदार्थजप्तकिएगएहैं.लाइसेंसधारक32हजार937हथियारजमाकराएगएहैं. 24मामलोंमेंकानूनकाभंगकरनेकोलेकरहथियारजब्तकिएगएहैं,जबकि166लाइसेंसरद्दकरदिएगएहैं.दंडप्रक्रियासंहिताअर्थातसीआरपीसीजैसेप्रतिबंधात्मककार्रवाईकेतहत41हजार638प्रकरणविचाराधीनथे,जिनमेंसे15हजार838मामलोंमेंअंतरिमबांडलिएगएजबकिसीआरपीसीकेतहतनौहजार117मामलोंमेंअंतिमबांडलिएगएहैं. 27हजार457मामलोंमेंगैरजमानतीवारंटजारीकिएगएहैंऔरअन्य15हजार711मामलोंमेंकार्रवाईजारीहै.राज्यमें10हजार605चेकपोस्टभीकार्यरतहोनेकीजानकारीश्रीशिंदेनेदी.

 0000

477 cases filed in state during Model Code of Conduct

Mumbai, October 8:-A total of 477 offences related to illegal arms, possession of illicit liquor, breaching of peace and other such violation were registered in the entire state after the Model Code of Conduct (MCC) came in force in the state for the Assembly Elections. This information was given by additional Chief Election Officer Dilip Shinde.

The MCC came into force since announcement of assembly elections in the state and it has been implemented strictly by the election administration. The police department and excise departments had initiated strict action in the state since September 21st for maintaining the situation of law and order.

Under various sections of Indian penal code, 113 offences had been registered in the state. These include deterring public servant from discharging the duty, breaching of public peace, breach of security, illegal assembling of people, illegal processing of swords and firearms and explosives. Under the Representation of Peoples Act (RPA), 16 cases have been registered. Possessing of drugs, transportation of drugs and like 78 cases have been registered under the Narcotics, Drugs and Psychotropic  substances Act (NDPS). Three cases under explosives act, 34 cases under Maharashtra Police Act, 25 cases for defacement of the public property and 8 other cases under various sections are registered during the period of model code of conduct.

626 weapons, 260 cartridge and 46 explosives like gelatine sticks had been seized in the state so far. 32 thousand 937 license arms were surrendered, 24 licence arms have also been impounded. 166 arms license had been cancelled because of violation of laws.

Under the Criminal Procedure Code (CrPC) prohibitory action, 41 thousand 638 cases are taken into consideration and interim Bond were taken in 15 thousand 838 cases and final bonds were taken in nine thousand 117 cases under CRPC. Non bailable warrant (NBW) were issued in 27 thousand 457 cases and the process of issuing NBW is on in 15 thousand 711 other cases. 10 thousand 605 check posts are pressed into service, added Mr Shinde.

0000

विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 7 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला विजयादशमी तथा दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा हा उत्सव देशात विविध रुपांनी साजरा केला जातो.  हा सण  दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सर्वांना सन्मार्गाने वाटचाल करण्यास प्रेरित करणारा हा उत्सव आहे. या सणानिमित्त मी सर्वांना शांती, प्रगती व भरभराटीसाठी शुभेच्छा देतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Governor Koshyari greets people on Vijayadashmi

Mumbai, 7th Oct :The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people on the occasion of Vijayadashmi (Dassera).

In his message, the Governor has said:

“The festival of Vijaya Dashmi or Dussehra is celebrated in differenct forms in the country. The festival commemorates the victory of good over evil. The festival inspires all to tread the path of Truth.  I wish the people peace, progress and prosperity on the joyous occasion of Vijaya Dashmi.”

००००

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट

नवी दिल्ली, दि. 07 : गोव्यात आयोजित होणाऱ्या 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे.

इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 76 देशांचे एकूण 200 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार असून इंडियन पॅनोरमा या मानाच्या विभागात 5 फिचर आणि 1 नॉन फिचर असे एकूण 6 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

इंडियन पॅनोरमात भारतीय भाषांतील 26 फिचर आणि 15 नॉन फिचर असे एकूण 41 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या भारतीय चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे.

आनंदी गोपाळ’, ‘भोंगाअशा दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी

फिचर चित्रपटांमध्ये समीर विद्वंस दिग्दर्शित‘आनंदी गोपाळहा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्त्री-शिक्षण आणि परदेशगमन या गोष्टींचा विचारही झाला नव्हता, अशा काळात गोपाळ विनायक जोशी या पोस्टमास्तराची 18 वर्षांची पत्नी आनंदी जोशी इंग्रजी भाषा शिकते. एवढेच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला जाते. नेटाने अभ्यासक्रम पूर्ण करते. हेच देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी या कर्तृत्ववान स्त्रीचे चरित्र या चित्रपटात दर्शविण्यात आले आहे.

शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित‘भोंगाचित्रपट हा फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे.  धर्म जीवनापेक्षा मोठा असतो की जीवन धर्मापेक्षा मोठे या सामाजिक विषयावर हा चित्रपट आधारित आहे.

माई घाट : क्राईम नंबर 103/2005हा अनंत महादेवन दिग्दर्शित चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे. एका आईने पोलीस यंत्रणेविरूध्द दिलेल्या लढ्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. यासोबतच आदित्य राठी व गायत्री पाटील दिग्दर्शित फोटो प्रेमआणि तुझ्या आयलाहा संजय ढाकणे दिग्दर्शित चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे.

गणेश शेलार दिग्दर्शित‘गढूळहा मराठी चित्रपट नॉन फिचर श्रेणीमध्ये प्रदर्शित होणार आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे आई आणि मुलाच्या नात्याला आलेले दु:खदायक वळण व या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा सामना असे या चित्रपटाचे कथानक आहे.

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट ठरलेला‘हेल्लारोहा गुजराती  चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमामध्ये फिचर चित्रपटांतील तर नुरेहहा नॉन फिचर चित्रपटांतील स्वागताचा चित्रपट असणार आहे.

०००००

रितेश भुयार /वृत विशेष क्र.228 / दि.7.10.2019

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची मुलाखत

दिलखुलासकार्यक्रमात बुधवारी, गुरुवारी मुलाखतीचे प्रसारण

मुंबई,दि.7 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित‘जय महाराष्ट्र’व’दिलखुलास’कार्यक्रमात प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची’लोकशाही बळकटीकरणासाठी,करुया मतदान” या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक8ऑक्टोबर2019रोजी रात्री9वाजता प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि.9आणि गुरुवार दि.10ऑक्टोबर2019रोजी सकाळी7.25ते7.40या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीमध्ये पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम,नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र. एच. ठाकरे,औरंगाबाद जिल्हाधिकारी उदय चौधरी,मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे,मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मतदार जागृती कार्यक्रमांची जिल्हानिहाय माहिती दिलेली आहे. 

निवडणुकांत मतदान वाढावे याकरिता सुरु असलेले प्रयत्न,मतदार जागृतीसाठी आयोगामार्फत राबविण्यात आलेले विविध उपक्रम,विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीवर देण्यात येणारा भर,मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम,सदिच्छादूतांचा सहभाग,स्वीप या उपक्रमाचे यश या विषयांची माहिती  श्री.बलदेव सिंह यांनी’जय महाराष्ट्र’आणि  ‘दिलखुलास’कार्यक्रमातून दिली आहे.

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...