मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 1641

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ३ हजार २३९ उमेदवार

पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी उमेदवार निवडणूक लढणार- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई, दि. 7 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

दरम्यान शनिवारी झालेल्या छाननीअंती4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नंदूरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 38 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 100 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 59 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 68 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 109 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 146 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 42 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 38 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 71 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 88 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 135उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तर, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 33 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 53 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 79 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 128 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 148 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 53 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 214 उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघात 244 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 89 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 78 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 246 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 116 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 115 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 79, उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 50 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 73 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 32 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 23 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 106 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 68 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.

सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिणमध्ये तर सर्वात कमी चिपळूण मतदारसंघात

सर्वात कमी3 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघात तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयू) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे. अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा 30 मतदारसंघांमध्ये 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. राज्यात ईव्हीएमच्या अत्युच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा कमी उमेदवारांची संख्या असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात सर्वाधिक91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्जमाघारीनंतर केवळ 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात11 कोटी 39 लाख रुपयांची रोकड, 12 कोटी 47 लाख रुपयांची दारु, 15 कोटी 29 लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि 8 कोटी 87 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिणे असा सुमारे 48 कोटी 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात विविध कलमांखाली442 प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये भा.दं.वि.अंतर्गत विविध कलमांखाली 102, लोक प्रतिनिधीत्व अधिनियमाखाली 15, अंमली पदार्थ विषयक एनपीडीएस अधिनियमांतर्गत 72, मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत 228 तर मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत 25 प्रकरणांचा समावेश आहे, अशीही माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

राज्यात मतदार नोंदणी तसेच मतदार यादी अचूक होण्याच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये प्रारूप मतदार याद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच या मतदार याद्यातील त्रुटी दाखवून देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मदत करण्यास राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार1 लाख 10 हजार बीएलए नेमण्यात आले होते. या बीएलएच्या साहाय्याने मतदार यादी जास्तीत जास्त अचूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशीही माहिती सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना यावेळी दिली.

००००

सचिन गाढवे/श्रद्धा मेश्राम / वि.सं.अ. / दि.07.10.2019

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. ६ : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची काल (दि.५ ऑक्टोबर) राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

काल छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७६ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.

0000

विधानसभा चुनाव के लिए राज्य के ४ हजार ७४३ उम्मीदवारों के नामांकन पत्र वैध

अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी जानकारी

मुंबई :विधानसभा चुनाव के लिए उम्मीदवारों द्वारा दाखिल की नामांकन पत्रों की छंटनी आज राज्य में की गई. इसमें राज्य के सभी विधानसभा निर्वाचन क्षेत्रों में कुल ५ हजार ५४३ उम्मीदवारों में से ४ हजार ७४३ उम्मीदवारों के आवेदन वैध साबित हुए हैं. जबकि त्रुटियों के कारण त्रुटी 800 उम्मीदवारों के आवेदन अवैध हुए हैं,ऐसी जानकारी अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी.

आज छंटनी नंदुरबार जिले में ४ निर्वाचन क्षेत्र में ३६ उम्मीदवारों के अर्ज वैध साबित हुए. धुलिया जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में ५६ उम्मीदवार,जलगांव जिले में ११ निर्वाचन क्षेत्रों में १५४ उम्मीदवार,बुलढाणा जिले में ७ निर्वाचन क्षेत्रों में ७५ उम्मीदवार,अकोला जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में १०१ उम्मीदवार,वाशिम जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ६० उम्मीदवार,अमरावती जिले में ८ निर्वाचन क्षेत्रों में १५१ उम्मीदवार,वर्धा जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ५९ उम्मीदवार,नागपूर जिले में १२ निर्वाचन क्षेत्रों में १८१ उम्मीदवार,भंडारा जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ६६ उम्मीदवार,गोंदीया जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ७१ उम्मीदवार,गडचिरोली जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ४४ उम्मीदवार,चंद्रपूर जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में ९० उम्मीदवार,यवतमाल जिले में ७ निर्वाचन क्षेत्रों में १२५ उम्मीदवार,नांदेड जिले में ९ निर्वाचन क्षेत्रों में ३२७ उम्मीदवार,हिंगोली जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ५४ उम्मीदवार,परभणी जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ८१ उम्मीदवार,जालना जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में १३३ उम्मीदवार,औरंगाबाद जिले में ९ निर्वाचन क्षेत्रों में २०८ उम्मीदवार,नाशिक जिले में १५ निर्वाचन क्षेत्रों में २१२ उम्मीदवार,पालघर जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में ६९ उम्मीदवार,ठाणे जिले में १८ निर्वाचन क्षेत्रों में २५१ उम्मीदवार,मुंबई उपनगर जिले में २५ निर्वाचन क्षेत्रों में २७६ उम्मीदवार (वांद्रे पश्चिम निर्वाचन क्षेत्र की जानकारी देर रात तक अप्राप्त),मुंबई शहर जिले में १० निर्वाचन क्षेत्रों में ८४ उम्मीदवार,रायगड जिले में ७ निर्वाचन क्षेत्रों में ११२ उम्मीदवार,पुणे जिले में २१ निर्वाचन क्षेत्रों में ३७२ उम्मीदवार,अहमदनगर जिले में १२ निर्वाचन क्षेत्रों में १८२ उम्मीदवार,बीड जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में २०२ उम्मीदवार,लातूर जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में १२० उम्मीदवार,उस्मानाबाद जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ८२ उम्मीदवार,सोलापूर जिले में ११ निर्वाचन क्षेत्रों में २३७ उम्मीदवार,सातारा जिले में ८ निर्वाचन क्षेत्रों में १०८ उम्मीदवार,रत्नागिरी जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में ४० उम्मीदवार,सिंधुदूर्ग जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में २७ उम्मीदवार,कोल्हापूर जिले में १० निर्वाचन क्षेत्रों में १८६ उम्मीदवार,सांगली जिले में ८ निर्वाचन क्षेत्रों में १११ उम्मीदवारों के नामनिर्देशनपत्र वैध साबित हुए हैं.

0000

Application form of 4,743 candidates valid for assembly elections in the state

Information by Additional Chief Electoral Officer Dilip Shinde

Mumbai, 6.Oct.19: “Nomination papers filed by candidates for the assembly elections were scrutinized today across the state. Of them, out of the total 5,543 candidates filed in all the constituencies in the state, the applications of 4,743 candidates have been valid. Applications of 800 candidates were rejected due to errors” informed Additional Chief Electoral Officer Dilip Shinde.

Today, after the scrutiny, the nomination forms of 36 candidates were valid in 4 constituencies in Nandurbar district while in Dhule district 56 candidates in 5 constituencies, 154 candidate in 11 constituencies in Jalgaon district, 75 candidate in 7 constituencies in Buldhana district, 101 candidate in 5 constituency in Akola district, 60 candidate in 3 constituencies in Washim district. 151 candidates in 8 constituencies in the Amravati district, 59 candidates in 4 constituencies in the Wardha district, 181 candidates in 12 constituencies in the Nagpur district, In Bhandara district, 66 candidate in 3 constituencies, 71 candidates in 4 constituencies in Gondia district, 44 candidates in 3 constituencies in Gadchiroli district, 90 candidates in 6 constituencies in Chandrapur district, 125 candidates in 7 constituencies in Yavatmal district. 327 candidates in 9 constituencies in the Nanded, 54 candidates in 3 constituencies in the Hingoli district, 81 candidates in 4 constituencies in Parbhani district, 133 candidates in 5 constituencies in Jalna district, 208 candidates in 9 constituencies in Aurangabad district, 212 candidates in 15 constituencies in Nashik district, 69 candidates in 6 constituencies in Palghar district, 251 candidates in 18 constituencies in Thane district, 276 candidates in 25 constituencies in Mumbai (subrub),   84 candidates in 10 constituencies in Mumbai (City), 112 candidates in 7 constituencies in Raigad district,  21 candidates in the 372 constituencies in Pune district, In Ahmednagar district, 182 candidates in 12 constituencies ,  202 candidate in 6 constituencies in Beed district, 120 candidate in 6 constituencies in Latur district, 82 candidate in 4 constituencies in Osmanabad district, 237 candidate in 11 constituencies in Solapur district, 108 candidates in 8 constituency in Satara district, 40 candidates in 5 constituencies of Ratnagiri district, 27 candidates in 3 constituencies in the Sindhudurga district, 186 candidates in 10 constituencies  in Kolhapur district, 111 candidates in 8 constituencies in Sangli district have been valid.

७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही भागात वादळी पाऊस; शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

मुंबई, दि ६ : ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नाशिक सह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखेपर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखे पर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल.

वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

0000

7 से 12 अक्टूबर तक राज्य के कुछ क्षेत्रों में तेज आंधी के साथ बारिश

खेत में निकालकर रखी हुई फसल को सुरक्षित रखें किसान

मुंबई: 7 से 12 अक्टूबर के दौरान विदर्भ, मराठवाडा और मध्य-महाराष्ट्र के कुछ क्षेत्रों में दोपहर के बाद बादलनुमा हवामान के साथ आंधी तूफान के साथ बारिश का अनुमान हवामान विशेषज्ञों ने जताया है. नाशिक के साथ खान्देश और औरंगाबाद जिले में 8 तारीख तक कुछ पैमाने में बादलनुमा हवामान और तेज आंधी के साथ बारिश की संभावना है, तथा  नगर, पुणे, सांगली,  सातारा, कोल्हापुर और सोलापुर जिलों के कुछ क्षेत्रों में 12 तारीख तक मेघ गर्जना के साथ बारिश की संभावना है. लातूर, बीड, उस्मानाबाद और नांदेड जिलेसमेत शेष मराठवाड़ा में हवामान की यह स्थिति 11 तारीख तक रहेगी.  चंद्रपुर, यवतमाल, वर्धा, नागपुर, भंडारा और गोंदिया जिले के कुछ भागों में 12 तारीख तक कुछ पैमाने में बादलनुमा हवामान और मेघ गर्जना के साथ बारिश होगी. 

आंधी के साथ बारिश की तीव्रता, कालावधि और क्षेत्र अधिक न होने के कारण किसानों को घबराने की जरूरत नहीं है. इस हवामान की स्थिति के अनुसार किसानों द्वारा खेती का नियोजन करने और निकालकर रखे हुए फसलों को सुरक्षित रखने का आवाहन, कृषि विभाग की ओर से किया गया है. इस कालावधि में किसानों को दोपहर के बाद आवेवाले आंधी औऱ बिजली से खुद की सुरक्षा करने का आवाहन किया है. आंधी आने पर लोगोंको पेड़ के नीचे, खुली जगह पर, टिन के शेड के नीचे, बिजली प्रवाह के तारों तथा विद्युत ट्रांसफार्मर ने समीप न रुकने का आवाहन भी किया गया है.  

एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका

मुंबई, दि.6 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 1 लाख 17 हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान असलेल्या मतदात्यांची (सर्व्हिस वोटर्स) नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम’द्वारे (ईटीपीबीएस) ऑनलाईनरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या साहाय्याने ‘इटीपीबीएस’यंत्रणा विकसित केली आहे. लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोगाने ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.

2016 मध्ये पुद्दुचेरी विधानसभेच्या नेल्लीथोप मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा इटीपीबीएसचा वापर करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात इटीपीबीएस यंत्रणेचा वापर करण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका ऑनलाइनरित्या सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचवल्या जातात. लष्करी दले अथवा अन्य सर्विस वोटर्स असलेल्या सेवांमधील नोडल अधिकारी सर्व्हिस वोटर्सचे इटीपीबीएस साठीचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे (डीईओ) पाठवितात. डीईओंनी जिल्ह्यातील सर्व्हिस वोटर्सची यादी संबंधित मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे (इआरओ) पाठविल्यानंतर इआरओ या अर्जावर निर्णय घेतात.

मतदानाच्या साधारणतः 10 दिवसापूर्वी सर्व्हिस वोटर्सना इटीपीबी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात. मतपत्रिकांचा पारंपरिक पद्धतीने पोस्टाद्वारे होणारा मतदारांपर्यंतचा एका बाजूचा प्रवास वाचण्यासह निवडणूक प्रशासनावरील बराचसा ताण कमी होतो. या मतपत्रिका डाऊनलोड आणि प्रिंट काढून मतपत्रिकेवर आपले मत नोंदविल्यानंतर विहित पद्धतीने पोस्टाने पाठविणे आवश्यक असते. टपाली मतपत्रिका पाठविण्यासाठी कोणतेही टपाल तिकीट लावण्याची आवश्यकता नसते.

इटीपीबीएस कुणासाठी

▪ सेवेनिमित्त आपल्या मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान

▪ केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवान.

▪ निवडणूक कालावधीत राज्याबाहेर कर्तव्यावर असलेले राज्य शासनाच्या सशस्त्र पोलीस बलामधील जवान

▪ जवानांबरोबर निवास करत असलेल्या त्यांच्या पत्नी

▪ परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचारी (ओव्हरसीज वोटर्स)

वैशिष्ट्यपूर्ण ईटीपीबीएस

▪ ईटीपीबीएस यंत्रणेला द्विस्तरीय सुरक्षितता लाभलेली आहे.

▪ इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट डाउनलोड करण्यासाठी ओटीपी आणि पिन नंबर आवश्यक.

▪ युनिक क्यूआर कोडमुळे पोस्टल मतपत्रिकेची सुरक्षितता राखली जाण्यासह नक्कल (डुप्लिकेशन) होणे शक्य नाही.

राज्यात सर्वाधिक सर्व्हिस वोटर्स सातारा जिल्ह्यात

यावर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात 1 लाख 17 हजार 581 इतके सर्व्हिस वोटर्स आहेत. अंतिम मतदार यादीनुसार 1 लाख 14 हजार 496 पुरुष तर 3 हजार 85 महिला सर्व्हिस वोटर्स आहेत. सर्वाधिक 12 हजार 658 इतके सर्व्हिस वोटर्स सातारा जिल्ह्यात असून सर्वात कमी 310 इतके पालघर जिल्ह्यात आहेत.

अंतिम मतदार यादीनुसार जिल्हानिहाय सर्व्हिस वोटर्सची संख्या :

नंदूरबार- 401,धुळे- 2621,जळगाव- 7878,बुलढाणा- 4588,अकोला- 3180,वाशिम- 1260,अमरावती- 3282,वर्धा- 867,नागपूर- 2770,भंडारा- 1654,गोंदिया- 1799,गडचिरोली- 515,चंद्रपूर- 1708,यवतमाळ- 1378,नांदेड-2790,हिंगोली-732,परभणी-1137,जालना-1530,औरंगाबाद-2489,नाशिक-8966,पालघर-310,ठाणे-1532,मुंबई उपनगर-983,मुंबई शहर-393,रायगड-1200,पुणे-5797,अहमदनगर-10258,बीड-4512,लातूर-2902,उस्मानाबाद-2684,सोलापूर-4537,सातारा-12658,रत्नागिरी-842,सिंधुदूर्ग-808,कोल्हापूर-8753,सांगली-7867अशी सर्व्हिस वोटर्सची संख्या आहे.

0000

विधानसभा निवडणुकीसाठी ‘म्हैसूर शाईच्या’ ३ लाखांहून अधिक बाटल्या

मुंबई, दि. 5 : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात’म्हैसूर शाईच्यातीन लाख बाटल्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे.

मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच१५सेकंदांमध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे कितीही  प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर येथील’म्हैसूर पेंटस्  अ‍ॅण्ड वॉर्निश लिमिटेड कंपनीमध्ये तयार केली जाते. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कार्यरत असून भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे एकमेव कंत्राट याच कंपनीला दिले आहे. त्यामुळे या शाईला म्हैसूरची शाईम्हणून ओळखले जाते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांत 96 हजार 661 मतदान केंद्र असतील. या सर्व केंद्रावर म्हैसूर शाईच्या बाटल्या पोहोचविण्याचे काम सुरु आहे.

मतदानापूर्वी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर त्याची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदान अधिकारी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर लावलेल्या शाईची तपासणी करतात. डाव्या तर्जनीची तपासणी करु न देणारी व्यक्ती मतदानासाठी  अपात्र ठरु शकते.  जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

००००

विधानसभा चुनाव के लिएम्हैसूर स्याही

3 लाख से अधिक स्याही की बोतलें

मुंबई : विधानसभा चुनाव के लिए मतदाताओं की बाए हाथ की तर्जनी पर स्याही लगाने के लिए महाराष्ट्र में’म्हैसूर स्याहीकी तीन लाख बोतलों का वितरण जिलाधिकारियों को किया जा रहा हैं. 

मतदान के दिन यह स्याही उंगली पर लगाने के बाद15 सेकंड में उसका गीलापन नष्ट होता है.  इसलिए यह स्याही जितना पोछें नहीं नकलती. यह स्याही म्हैसूर स्थित म्हैसूर पेंटस्एन्ड वॉर्निश लिमिटेड कंपनीमें तैयार की गई है. यह कंपनी कर्नाटक सरकार के अंतर्गत कार्यरत है. भारतीय चुनाव  आयोग ने चुनाव के लिए स्याही आपूर्ति का ठेका इसी एकमात्र कंपनी को दिया है. इसलिए इस स्याही को मैसूर की स्याहीके रूप में पहचाना जाता है.

2019 के विधानसभा चुनाव के लिए 288 निर्वाचन क्षेत्रों में 96 हजार 661 मतदान केंद्र हैं, इन मतदान केंद्रोंपर म्हैसूर स्याही को बोतलें पहुंचने का काम शुरू है.

चुनाव से पहले मतदाताओं के बाए हाथ की तर्जनी पर न निकलने वाली स्याही लगाई जाती है. उसके बाद मतदाता के हस्ताक्षर या अंगूठा लिया जाता है. चुनाव अधिकारी मतदाता के बाई तर्जनी पर लगाई गई स्याही की जांच कर तर्जनी जांच न करनेवाले व्यक्ति को मतदान के लिए अपात्र घोषित किया जा सकता है. अगर एखाद मतदाता को बाई हाथ की तर्जनी नहीं है तो उस व्यक्ति को दाए हांथ कस किसी भी उंगली को स्याही लगाई जा सकती है.

००००

 

More than 3 lakhs bottles of Mysore ink for Assembly elections

Mumbai, 5.Oct.19: Three lakh bottles of ‘Mysore ink’ are being distributed to collectors in Maharashtra to put ink on the left-hand margin (pointer finger of the left hand) of voters for the assembly elections.

Applying this ink on the day of voting, its moisture disappears within 15 seconds. So no matter how hard people try, it doesn’t wipe out. This ink is made at Mysore Paints and Varnish Limited Company in Mysore. The company is operating under the Karnataka government and the Election Commission of India has given the only contract to supply ink for the election. Therefore, this ink is known as ‘Mysore ink’.

There will be 96, 661 polling booths in 288 constituencies for the 2019 assembly elections. Work is on to deliver the bottles of Mysore ink to all these centers.

Non-wiping ink is placed on the left margin of the voter before the vote. Then his signature or thumb is taken before voting. Polling officers inspect ink on the left margin of the voter. A person who refuses to check the left finger can be disqualified for voting. If a voter does not have pointer finger of the left hand then ink can apply on any finger on the person’s left hand.

0000

दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवारी, मंगळवारी ‘महात्मा गांधी यांचे विचार व कार्य’ या विषयावर मुलाखत

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात ज्येष्ठ  विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांचा सहभाग असलेली महात्मा गांधीजी यांचे  विचार व कार्यया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून दिलखुलासकार्यक्रमात सोमवार दि.७ ऑक्टोबर आणि मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

विश्वाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार आणि मूल्य, महात्मा गांधीजींच्या जीवनातील तत्त्वे, साहित्यिक गांधी, सत्य, अहिंसा आणि असहकार या विषयीचे विचार या विषयाची माहिती श्री.मोरे यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

००००

विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

मुंबई, दि.5 :  विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 21 ऑक्टोबर 2019 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.5.10.2019

सैन्यदलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी; पूर्वतयारीसाठी मुंबई शहर जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत सोमवारी मुलाखती

मुंबई, दि. 4 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवांराना एसएसबी प्रशिक्षण वर्ग छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक,युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखतपत्रे मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांना एसएसबी मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक10 ते 19 ऑक्टोबर 2019 असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दिनांक 7 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर राहावे असे कळविण्यात आले आहे.

एसएसबी प्रवेश वर्गासाठी खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व ह्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत आणणे आवश्यक आहे.

1) कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

2) एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.

3) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

4) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रं. 0253-2451031 2451032 वर कार्यालयीन वेळेत (स. 10.00 ते सायं. 5.30) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात दर शनिवारी निवडणूक वार्तापत्र

मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विधानसभा निवडणूक- २०१९  या विशेष वार्तापत्राची निर्मिती केली आहे. हे वार्तापत्र आकाशवाणीवरील दिलखुलासकार्यक्रमात दर शनिवारी  सकाळी ७.२५ ते ७.४५ या कालावधीत प्रसारित केले जाणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील २२ आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित केले जाईल.

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांची माहिती

मुंबई, दि. ४ : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्‍ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स या एफएल-II अनुज्ञप्तीविरुध्द कठोर पावले उचलून या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या वैशाली वाईन्स या अनुज्ञप्तीसोबत अवैध मद्याचा पुरवठा होणाऱ्या हॉटेल किनारा या एफएल-III अनुज्ञप्तीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत अटी व शर्थींचे पालन न करणाऱ्या शशी लंच होम, हॉटेल स्वस्तिक या एफएल-III अनुज्ञप्ती निवडणूक कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. २४ लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना हॉटेल एफएल – III अनुज्ञप्ती ह्या ०८ ते १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशान्वये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.

निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एफएल-II, एफएल-III व सीएल –III इ. मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्रीची माहिती भरणे, विहित वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशीने पाळणे, मद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्ययावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

अवैध मद्यविक्रीविरोधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

नागरिकांनी अवैध मद्यविक्री विरोधातील तक्रारीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्र. 18008333333 व व्हॉटसॲप क्रमांक-8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी केले आहे. तसेच सर्व अनुज्ञप्तीधारकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या SCM (E) BOOK या अप्लिकेशनचा वापर करुन दैनंदिन मद्यविक्रीची माहिती भरण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

००००

अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले

मुंबई के छह लाइसेंसधारकों का लाइसेंस रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा की जानकारी

मुंबई : विधानसभा चुनाव निर्भीड और खुले वतावरण में हो, इसके लिए राज्य उत्पादन शुल्क विभाग की ओर से मुंबई में कुछ लाइसेंसधारक शराब विक्रताओं के खिलाफ अवैध शराब आपूर्ति किए जाने से कड़ी कारवाई की गई है. छह लाइसेंसधारकों के लाइसेंस कार्रवाई कर रद्द किए गए हैं. आगे भी अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले या नियमों का भंग करनेवाले लाइसेंस धारक शराब दुकानदारों के खिलाफ लाइसेंस रद्द या निलंबन की कड़ी कार्रवाई करने का इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा ने दिया है. सभी राज्य राज्य उत्पादन शुल्क अधिकारी और कर्मियों को इसके संदर्भ में सतर्के रहने के निर्देश दिए गए हैं.

चुनाव आचारसंहिता नियम तथा मुंबई विदेशी शराब नियमावली1953 अंतर्गत नियमों का भंग करनेवाले और अवैध तरीके से शराब बिक्री करनेवाले मुंबई उपनगर जिलवली के वैशाली वाईन्स, वरायटी वाईन्स एफएल-II दुकानदारों के खिलाफ कड़ी कार्रवाई कर लाइसेंस रद्द किए गए है. अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले वैशाली वाईन्स इस दुकानदार के साथ अवैध शराब की आपूर्ति हो रहे होटल  किनारा एफएल-IIIका भी लाइसेंस रद्द किया है.  साथ ही मुंबई विदेशी शराब नियमावली 1953 अंतर्गत नियम और शर्तों का पालन न करनेवाले शशी लंच होम, होटल स्वस्तिक इन एफएल-III के लाइसेंस चुनाव कालावधि खत्म होने तक निलंबित की है. 24 लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना होटल एफएल – III के लाइसेंस 08 से 15 दिनों तक निलंबित किए गए है.  मुंबई उपनगर जिलाधिकारी मिलिंद बोरीकर के आदेश के बाद मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी के मार्फ़त यह कार्रवाई की गई.

चुनाव के दौरान जिले में अनुचित प्रकार न हो इसके लिए एफएल-II, एफएल-III व सीएल –III आदि शराब बिक्री करनेवाले लाइसेन्सधारक दुकानदारों को सीसीटीव्ही कैमरा लगाने के निर्देश दिए गए है.  ऑनलाईन पध्दति से शराब बिक्री की जानकारी देना, निर्धारित से समय में दुकान खोलने और बंद करने के समय का पालन, शराब बिक्री का पंजीयन, और शराब का स्टॉक अपडेट रखना आदि के बारे में सभी लाइसेंस धारकों को निर्देश दिए गएBअद्यावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

अवैध शराब बिक्री के विरोध में शिकायत के लिए टोल फ्री नंबर

नागरिकों को अवैध शराब बिक्री के विरोध में शिकायत करने के लिए राज्य उत्पादन शुल्क विभाग के टोल फ्री नंबर18008333333 और वाट्सएप नंबर –8422001133 पर संपर्क करने का आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा ने किया है. साथ ही सभी लाइसेंस धारकों को राज्य उत्पादन शुल्क विभाग के मार्फत शुरू किए गए SCM (E) BOOK इस एप्लिकेशन का उपयोग कर रोजाना की जानेवाली शराब बिक्री की जानकारी दी जाने की सूचना की गई है. 

००००

Distribution of liquor by illegal way resulted in to cancellation of license of six license holders in Mumbai

Information by State Excise Commissioner Prajakta Lavangare – Verma

Mumbai, 4.Oct.19:” In order to conduct the assembly elections in a fearless and open environment, strict action was taken against some rules violators by the State Excise Department. License of Six of license holders have been revoked, in Mumbai. Even further, license will be cancelled who involved in illegal provision of liquor and any other rules violation” warned State Excise Commissioner, Prajakta Lavangare-Verma.

She instructed to all State Excise Officers and employees to remain vigilant during election period.

The licenses of FL-II Vaishali wines and Variety wines from suburban area of Mumbai have been revoked under the violation of election code of conduct as well as Mumbai Foreign Alcohol Regulation 1953.  License of Hotel Kinara (FL-III) has been cancelled due to its involvement in illegal liquor distribution along with Vaishali Wines. Also, the Shashi Lunch Home, Hotel Swastika of FL-III, which does not comply with the terms and conditions of the Mumbai Foreign Alcohol Rules 1953, has been suspended till the end of the election period. License of 24 Lounge Bar, Platinum Bar, Shivila Bar, Jarna Hotel of FL-III have been suspended for eight to fifteen days. The proceedings were carried out under the orders of Mumbai Suburban District Collector Milind Borikar through the superintendent of the Mumbai suburban district, Snehalta Shrikar, Inspector Manoj Chaudhary.

Orders have been given to install CCTV camera at the liquor shops of license holders of    FL-II, FL-III and CL -III, in the district during the elections. All licensed holders in the district have been instructed to fill online liquor information, open the liquor license in a timely manner and to comply with the time of closure, keeping liquor sales registers and updating the liquor stock.

Toll free number for complaint against illegal selling of alcohol

The toll free number of the state excise department for citizens to raise the complaint against illegal selling of alcohol. State Excise Commissioner, Prajakta Lavangare-Verma, has appealed to citizen to contact on toll free no. 18008333333 and WhatsApp No. 8422001133 to launch the complaint in this concern. Also, all the license holders have been advised to fill up daily liquor selling information using SCM (E) BOOK application launched by the State Excise Department.

0000

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...