बुधवार, जुलै 2, 2025
Home Blog Page 1698

गरजू, गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास व भोजन व्यवस्था करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाचे निर्देश

मुंबई, दि. २९ – कोरोनाचा प्रभाव वाढू नये, यासाठी केलेल्या उपाय योजनांमुळे अडकलेल्या गरीब व गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे तसेच लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तसेच आपल्या मूळ गावी जाणाऱ्या राज्यातील व परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची ते जेथे असतील त्या जवळपास तात्पुरती निवारा केंद्रे स्थापून त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोवीड १९ चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अनेक कामगार हे आपल्या कामाच्या ठिकाणाहून मूळ गावी परत जाण्यासाठी निघाले आहेत. यामुळे सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लघंन होत आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती वाढत आहे. त्यामुळे अशा कामगारांची व गरीब गरजू नागरिकांची निवासाची व जेवणाची सोय करण्याचे आदेश केंद्र शासनाच्या गृह विभागाने परिपत्रकाद्वारे सर्व राज्यांना तसेच प्रत्येक शहराच्या जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांना दिले आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन करून कामगार, कष्टकरी व गरीब गरजूंसाठी तात्पुरती निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था करण्यास सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

त्यानुसार कामगारांसाठी ते ज्या भागात आहेत, त्या भागामध्ये राहण्याची तात्पुरती व्यवस्था तसेच गरीब व गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात यावी.

तसेच लॉकडाऊन काळात गावी जाण्यास निघालेल्या कामगार, नागरिकांची ते ज्या भागात आहेत, त्याच्या जवळच्या भागातील तात्पुरत्या निवारा केंद्रात त्यांची व्यवस्था करण्यात यावी. त्यापूर्वी त्यांची योग्य प्रकारे वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय नियमानुसार १४ दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचीही सोय करावी.

लॉकडाऊन काळात जरी काम बंद असले तरी, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, उद्योग येथील कामगारांचे त्या काळातील पगार हे कोणतेही वजावट न करता देण्याच्या सूचना सर्व संबंधित आस्थापनाना व मालकांना देण्यात यावेत. कामगार तसेच स्थलांतरित नागरिक हे जर भाड्याने घर घेऊन राहत असतील तर त्यांच्या घर मालकांनी त्यांच्याकडून एक महिन्याचे घरभाडे घेऊ नये. तसेच कोणत्याही घर मालकाने विद्यार्थी अथवा कामगारांना घर किंवा परिसर सोडण्यास सांगत असेल, तर अशा घर मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही या परिपत्रकात केल्या आहेत.

केंद्र शासनाने आदेशित केलेल्या वरीलपैकी कोणत्याही सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील ३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, नवीन २२ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. २९ : राज्यात आज कोरोनाच्या २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज २ कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती कोरोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला, तो मधुमेही होता. राज्यातील कोरोना बाधित एकूण मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील:-

मुंबई ८५, पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ३७, सांगली २५, मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३, नागपूर १४, यवतमाळ ४, अहमदनगर ५, सातारा २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलढाणा प्रत्येकी १, इतर राज्य- गुजरात १, एकूण २०३

राज्यात आज एकूण ३९४ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४२१० जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ३४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १७ हजार १५१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत ३५ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबई- १४, पुणे- ७, पिंपरी चिंचवड- ८, यवतमाळ-३, अहमदनगर- १, नागपूर- १, औरंगाबाद- १ या रुग्णांचा समावेश आहे.

———०००———

ऊसतोड मजुरांना निवास-भोजन व्यवस्थेसह आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याचे शासनाचे साखर कारखान्यांना आदेश

मुंबई, दि. २९ : राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासह त्यांना आरोग्यविषयक सुविधा आणि सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी उचलण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

साखर ही जीवनावश्यक वस्तुंच्या यादीत येत असल्याने साखर कारखाने सुरू ठेवणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल पुरविण्यासाठी वाहनांच्या आंतरराज्यीय व राज्यांतर्गत विनाअडथळा वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच साखर कारखान्यांना लागणारा ऊस तोडणी मजूर आणि त्यांच्या वाहनांची ने-आण करण्यास देखील मान्यता दिली आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे गाळप हंगाम संपले असून काही साखर कारखान्यांचे विशेषत:  कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांतील कारखान्यांचे हंगाम अजूनही सुरूच आहेत.

संपूर्ण देशभरात होत असलेला कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनाने औषधोपचाराबरोबरच अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात गाळप हंगाम संपलेल्या कारखान्यांसह हंगाम सुरू असलेल्या कारखान्यांनी त्या-त्या कारखान्यातील ऊसतोड मजुरांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हंगाम संपलेल्या कारखान्यांनी ऊसतोड मजुरांना हँड सॅनिटायझर पुरविणे, त्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, पाणी व्यवस्था करणे यासारख्या आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक केले आहे. मात्र, अद्याप हंगाम सुरू असणाऱ्या कारखान्यांनी ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेबरोबरच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांची सर्व प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. या सूचनांची अंमलबजावणी तातडीने आणि योग्यरितीने करण्याबाबतही साखर आयुक्तांमार्फत कारखान्यांना कळविण्यात आले आहे.

——–०००———

मुंबईतील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २८ : कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना बाधितांच्या उपचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व होम क्वारंटाईनच्या सुविधांचा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आढावा घेतला. तसेच प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ते उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास केल्या.

फोर्टमधील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. शेख म्हणाले की, जी.टी.हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल,सेंट जॉर्ज हॉस्पिटल या रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षाकरिता अनुक्रमे २५०, ५० व २०० बेड प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई शहर जिल्हा अंतर्गत विधानसभा मतदार संघनिहाय १० विभाग पथके निर्माण करण्यात आली असून त्यानुसार नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी व त्यांचे सहाय्यक , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या १० विभागांसाठी वॉर्डनिहाय आराखडा तयार करण्यात येत आहे. ज्यामध्ये हॉस्पिटल जीवनावश्यक वस्तू, रक्तपेढ्या,रुग्णवाहिका व पुरवठा वाहने यांची उपलब्धता आदी गोष्टींचा समावेश आहे.

मुंबई शहरामध्ये स्थलांतरित झालेल्या रोजंदारी मजुरांकरिता विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कम्युनिटी किचनची व्यवस्था निर्माण केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई उपनगरातील माहूल येथे मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील काही हजार सदनिका विलगीकरण संकुल तयार करण्यासाठी उपयोगात आणणे शक्य आहे. असा अहवालदेखील विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

होम कॉरंटाईन व पथके :

मुंबई शहरात कालपर्यंत ३४७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. बृहन्मुंबईत एकूण ७२ पथके वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

क्वारंटाईन सुविधा :

१. शासकीय वसतिगृह उच्च शिक्षण मुंबई विभाग ७०० बेड

२. विसावा विश्रामगृह वरळी २० बेड

३. कार्यकारी अभियंता उत्तर मुंबई (सार्वजनिक बांधकाम विभाग, अंधेरी) ४१४ बेड

४. पश्चिम रेल्वे ९५ बेड

५. मध्य रेल्वे १८० बेड

६. एकूण ५ हॉटेल्समध्ये ३६७ रुमचे नियोजन केले आहे.

विलगीकरण सुविधा रुग्णालये

१. बृहन्मुंबई महानगरपालिका ९०८ बेड

२. खाजगी ३९९ बेड

३. शासकीय ६८५ बेड

राज्यपालांची राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा; नागरिकांचे स्थलांतर थांबविण्याचे निर्देश

मुंबई, दि. २८ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील कोरोना व्हायरस संक्रमण व लोकांचे स्थलांतर याबाबत माहिती घेतली.

कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली.

सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांनादेखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले.

राज्यपालांनी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकण व पुणे येथील विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बाल संगोपन संस्थांमधील बालकांची विशेष काळजी घेण्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश

मुंबई, दि. 28: कोरोना विषाणूच्या प्रसाराची परिस्थिती पाहता राज्यातील बाल संगोपन संस्थांमधील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष पुरविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार 554 बाल संगोपन संस्थांमधील सुमारे तेवीस हजार बालकांच्या आरोग्य स्थितीचे सनियंत्रण करण्यासाठी बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी नेमून दिली आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त राज्यात554 बाल संगोपन संस्था कार्यरत आहेत. यामधील बालकांना कोरोनाचा धोका उद्भवू नये म्हणून विशेष काळजी घेण्याचे निर्देश अॅड. ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार विभागाचे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सर्व बाल संगोपन केंद्रात जाऊन तेथील ताप,खोकला,सर्दी असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे ताप,खोकला,सर्दी असलेल्या बालकांना विलग करण्याचे व आवश्यकतेनुसार पुढील तपासण्यांची कार्यवाही करण्यात येत आहे.

या बाल संगोपन संस्थांमध्ये केवळ या संस्थांशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. तसेच येथील सर्व बालकांना मास्क, हँडवॉश तसेच सॅनिटायजर्स देण्यात आले आहेत. कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रबोधन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समुपदेशनाचे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.

000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.२८.३.२०२०

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-१९’ या नावाने स्वतंत्र बँक खाते; या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई दि. 28: कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करत आहेत; करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री  सहाय्यता निधी- कोविड-19हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

सढळ हाताने मदत करा

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19’ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोडSBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

असा होता आठवडा (दि. २२ मार्च ते २८ मार्च २०२० )

दि. 22मार्च, 2020·     मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे लाईव्ह प्रसारण- महत्वाचे मुद्दे– मध्यरात्रीपासून राज्यात144कलम लागू, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तिंना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहणार, जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य,भाजीपाला,औषधी,वीजपुरवठा करणारी केंद्रे सुरु राहणार,वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्था सुरु राहणार, शासकीय कार्यालयातील उपस्थिती केवळ 5 टक्के करणार. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध, ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत, त्यामुळे साठा करून ठेऊ नका, अजिबात घाबरून जाऊ नका,विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही,त्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहे.परदेशातून आलेल्या ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, त्यांनी दक्षता घ्यावी, बाहेर फिरु नये, आपल्या कुटुंबीयांपासून स्वत:ला दूर ठेवावे, ज्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत, त्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये, किमान15दिवस बाहेर जाऊ नये,ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्यांनी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटावे.

·     राज्यात करोना बाधित १० नवीन रुग्ण;राज्यातील एकूण रुग्ण संख्या७४,‘मीच माझा रक्षकसंदेशाचे पालन प्रत्येकाने करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

·     करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश, मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी 23 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नका, या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठवा, या कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करु नका, वीजचोरी व  बिलासंबंधीच्या तक्रारीला अनुसरून ग्राहकांच्या घरी भेटी देऊन तपासणी करू नका.

·     होम क्वारंटाईनच्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास महसूल आणि पोलीस यंत्रणेमार्फत कायदेशीर कारवाईचे शासनाचे निर्देश.

·     करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांची चाचणी करण्याकरता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे  केलेली नव्याने केंद्रांची मान्यता देण्याची विनंती केंद्र सरकारकडून मान्य, यानुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील  बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना तपासण्यांची क्षमता शंभरहून बावीसशे पर्यंत वाढवणार असल्याची, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.

दि. 23मार्च, 2020

·     करोनाविषाणू(कोविड19)चाप्रसाररोखण्यासाठीच्याउपाययोजनांचाभागम्हणूनविविधकायद्यांतर्गतउपलब्धअसलेल्याअधिकारांचाउपयोगकरूनसंपूर्णमहाराष्ट्रात31मार्चपर्यंतबंदीआदेशलागूकरण्याचीअधिसूचना,मुख्यसचिवश्री.अजोयमेहतायांच्या मार्फतजारी.याअधिसूचनेनुसारअत्यावश्यकआणिनाशवंतवस्तूवगळताअन्यसर्ववस्तूंच्यादळणवळणासाठीराज्याच्यासर्वसीमाबंद,एसटीमहामंडळाच्याबसेसआणिमेट्रोयांसहएकाशहरातूनदुसऱ्याशहरालाजोडणाऱ्यासर्वसार्वजनिकवाहतूकसेवाबंद,चालकाव्यतिरिक्तअन्यदोनव्यक्तींसाठीटॅक्सीतरएकाप्रवाशासहऑटोरिक्षायांनाअधिसूचनेतनमूदकेलेल्याकारणांसाठीवाहतुकीला परवानगी,  अत्यावश्यकवैद्यकीयसेवेसाठीप्रवासीवाहतूककरण्यासमान्यता, अत्यावश्यकवस्तू,आरोग्यसेवाआणियाअधिसूचनेतनमूदबाबीयांकरितावाहनचालकांव्यतिरिक्तएकाव्यक्तीलाखासगीवाहनउपयोगातआणण्याची परवानगी,एकाराज्यातूनदुसऱ्याराज्यातजाणाऱ्याबससेवाआणिखासगीप्रवासीवाहतूकसेवायांनाबंदी,विलगीकरणातराहण्याचानिर्देशदेण्यातआलेल्याप्रत्येकव्यक्तीनेत्याचेपालनकरणेआवश्यकअन्यथात्यांच्यावरदंडात्मककारवाईकरुन त्याचेशासकीयविलगीकरणव्यवस्थेतस्थलांतर, अत्यावश्यक कामांसाठीबाहेरपडल्यानंतरत्यांनापरस्परांपासूनकिमानअंतरराखण्याचादंडकपाळणेआवश्यक,सार्वजनिकठिकाणीपाचपेक्षाजास्तव्यक्तींनीएकत्रयेण्यासबंदी,व्यावसायिकआस्थापने,कार्यालये,कारखाने,कार्यशाळा,गोदामेआदींसहसर्वदुकानांचेव्यवहारबंद,तथापि,वस्तूंचीनिर्मितीकरणारेवप्रक्रियासातत्य(कंट्युनिअसप्रोसेस)आवश्यकअसलेलेकारखाने,औषधविक्रीआदीसुरूठेवण्यासपरवानगी,डाळ,तांदूळ,अन्नधान्यविषयकबाबी,दूधविषयकपदार्थ,पशुखाद्यअशाअत्यावश्यकवस्तूंच्यानिर्मितीच्याकारखान्यांचीकामेसुरूठेवण्यासपरवानगी,शासकीयकार्यालयेआणिसुरूठेवण्यातयेणारीदुकानेआणिआस्थापनेयांनीकमीतकमीकर्मचारीवर्गअसण्याचीआणिपरस्परांपासूनकिमानअंतरराखण्याची(जसेचेकआऊटकाउंटरवरतीनफुटाचेअंतरराखण्यासाठीजमिनीवरखुणाकरणे)दक्षताबाळगणे आवश्यक, अत्यावश्यकवस्तूवसेवापुरविणाऱ्याखालीलदुकानेआणिआस्थापनेयांनावरीलनिर्बंधातूनसूट- 1.बॅंका/एटीएम,विमा,फिन्टेकसेवाआणिअन्यसंबंधितसेवा, 2.मुद्रितआणिइलेक्ट्रॉनिकमाध्यमे, 3.टेलिकॉम,टपाल,इंटरनेट,डेटासेवायांसहमाहितीतंत्रज्ञानआणिमाहितीतंत्रज्ञानसेवा, 4.अत्यावश्यकवस्तूंचीपुरवठासाखळीआणिवाहतूक, 5.शेतमालआणिअन्यवस्तूंचीनिर्यातआणिआयात, 6.खाद्यपदार्थ,औषधेआणिवैद्यकीयउपकरणेयांसहआत्यावश्यकवस्तूंचेई-कॉमर्सद्वारेवितरण, 7.खाद्यपदार्थ,किराणा,दूध,ब्रेड,फळे,भाजीपाला,अंडी,मांस,मासेयांचीविक्री,वाहतूकआणिसाठवण, 8.बेकरीआणिपाळीवप्राण्यांसाठीचेखाद्यपदार्थआणिपशुवैद्यकीयसेवा, 9.उपाहारगृहांमधूनघरपोचसेवा, 10.रूग्णालये,औषधालयेआणिचष्म्याचीदुकाने,औषधांचेकारखाने,विक्रेतेआणिवाहतूक, 11.पेट्रोलपंप,एलपीजीगॅस,ऑईलएजन्सीजत्यांचीसाठवणआणित्यांच्याशीसंबंधितवाहतूकव्यवस्था, 12.अत्यावश्यकसेवांकरिताखासगीसंस्थांमार्फतपुरविल्याजाणाऱ्यासुरक्षासेवेसहअन्यसेवादेणाऱ्यासंस्था, 13.अत्यावश्यकसेवांनाकिंवाकोविड19प्रतिबंधासाठीहोणाऱ्याप्रयत्नांनामदतकरणारीखासगीआस्थापने, 14.वरीलबाबींशीसंबंधितपुरवठासाखळी, 15.वरीलसर्वनिर्बंध,लोकांच्यावाहतुकीवरनिर्बंधघालण्यासाठीआहेत.वस्तूंच्यादळण-वळणावरनिर्बंधघालण्यासाठीनाहीत,हेसर्वअंमलबजावणीकार्यालयांनीलक्षातघेण्याची बाब,अधिसूचनेतस्पष्ट,राज्य शासनाचे  विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील, कोणत्याही संप्रदायांची सर्व धार्मिक स्थळे  सुयोग्य अशा प्रतिबंधात्मक आदेशान्वये बंद करण्यात येतील, बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तुंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, कोविड-19 च्या रूग्णांना योग्य त्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व  खाजगी आणि शासकीय रूग्णालयातील वैकल्पिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतील, गरज भासल्यास, आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी, सर्व विभागीय आयुक्त, महानगर पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना रूग्णालयाच्या आसपास उपलब्ध जागांचा शोध घेण्याचे निर्देश, सध्या करोना विषाणू मुक्त असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्यांच्या जिल्ह्यात बाहेरून वाहने येण्यास प्रतिबंध करणारे आदेश काढू शकतील. या जिल्ह्यांमध्ये वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा आदेश अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठी लागू नाही, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त आणि इतर संबंधित संस्था, आस्थापना यांचे सक्षम प्राधिकारी यांना, मानवीय व न्यायपूर्ण पद्धतीने वरील सर्व उपाययोजना  व तरतूद यांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार, कोणतीही व्यक्ती, संस्था या तरतुदींचा भंग करतील त्यांच्यावर साथ रोग कायदा – 1897 , आपत्ती व्यवस्थापना कायदा – 2005 आणि इतर कायदे व विनियमने यानुसार कारवाई अथवा सद्हेतुने कारवाई करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध वा तसा हेतू असणाऱ्या व्यक्तींविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.

·     शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांच्यामार्फत मंत्रालयात शहीद भगत सिंग,राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

·     ‘करोना’संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण संचारबंदीचा विचार’, रस्त्यावर गर्दी  करणाऱ्यांची गय नाही, निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

·     मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा, सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,महानगरपालिकांचे अधिकारी,पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई,सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,उपस्थित. महत्वाचे मुद्दे- ट्रॅकिंग ॲण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करा, विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किटस,मास्क,व्हेंटिलेटर,रुग्णालयाची सुसज्जता याकडे लक्ष द्या,मोठ्याप्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करा, अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घ्या, गावपातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडीसारखी यंत्रणा सज्ज ठेवा, त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्या, मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका, एक माणूस एक काम या पद्धतीने जिल्हास्तरावर कामाची विभागणी करा,सक्षमपणे यंत्रणा कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घ्या, औषधे तयार करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या यंत्रणा चालू राहतील याची काळजी घ्या, जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची व्यवस्था उभी करा, कुठल्याही जाती-धर्माच्या प्रार्थनास्थळावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, प्रत्येक जिल्ह्याचा वाहतूक नियोजन (ट्रान्सपोर्ट प्लॅन) तयार करा, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी- अधिकारी यांना कामावर कसे येता येईल याची माहिती त्यांना द्या, ज्या खाजगी रुग्णालयात विलगीकरण वॉर्ड तयार करता येऊ शकतील त्यांना असे वॉर्ड तयार करण्याच्या सूचना द्या, त्यांची यादी मंत्रालयात पाठवा, विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा-श्री अजित पवार, जनजागृती वाढावी- श्री बाळासाहेब थोरात, ब्लड कॅम्प आयोजित करण्याची गरज- राजेश टोपे, जीवनावश्यक वस्तु पुरवठा सुरळित ठेवा- सुभाष देसाई

·     भायखळायेथीलजे.जे.  रुग्णालयातनिर्माणकरण्यातआलेल्याचाचणीकेंद्रआणिकरोनाबाधितरूग्णांसाठीतयारकरण्यात आलेल्याविलगीकरणकक्षाची,वैद्यकीयशिक्षणमंत्रीश्रीअमितदेशमुखयांच्यामार्फतपाहणी.

·     मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा जनतेशी लाईव्ह संवाद-       महत्वाचे मुद्दे-जनतेच्या हितासाठी कर्तव्यभावनेने राज्यात संचारबंदी लागू, विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय, महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या सीमा सील,जिथे विषाणुचा अजून प्रादुर्भाव झालेला नाही, तिथे विषाणू पोहोचू नये, हा त्यामागचा उद्देश, जीवनावश्यक वस्तू,औषधे,औषधे निर्माण करणारे कारखाने,दूध,बेकरी, कृषी उद्योगांशी संबंधित दुकाने,पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने आणि दवाखाने सुरु राहणार, कृषी उद्योगाशी संबंधित वाहतूक सुरु राहणार, अत्यावश्यक सेवेमध्ये खाजगी वाहने रस्त्यांवर उतरतील, टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी, फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल, आरोग्य व्यवस्थेला सज्ज राहण्याच्या सूचना, अंगणवाडी सेविका,आशा,होमगार्ड यांना प्रशिक्षण.

·     सर्व इएमआय,इन्स्टॉलमेंट्सची वसुली तात्पुरती थांबवण्याची,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे मागणी.

·     राज्यात 15 नवीन करोना बाधित रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 89 असल्याची ,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

      

दि. 24मार्च, 2020

·     करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ‘नियंत्रण कक्षांची’ स्थापना.

·     उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन- मुद्दे…राज्यप्रवेशबंदी,जिल्हा प्रवेशबंदी,संचारबंदीची कठोर अंमलबजावणी,पोलिसांना अंमलबजावणीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य, नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावे, खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये, भाजीपाला,फळे,अन्नधान्य जीवनावश्यक पुरवठा सुरळीत ठेवणार, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही सरकारची जबाबदारी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवणार, भाजीपाला,फळ उत्पादक शेतकऱ्यांचा माल बाजारात येणार,त्यांचे नुकसान होणार नाही, आरोग्य अधिकारी,कर्मचारी,पोलिस चांगले काम करत आहेत, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरु,व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु. मास्क,सॅनिटायझर,औषधे,जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा,काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकणार.

·     राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी,जनतेला गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा, अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन.

·     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, संयम,स्वंयशिस्त आणि सहकार्यातून संकटावर मात करण्याची जिद्द मनात बाळगावी,यातून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्ताने करण्याचे आवाहन.

·     उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा,’करोना संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी उत्साह राखून ठेवा’,‘कोरोना’च्या पार्श्वभूमिवर गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करण्याचे श्री पवार यांचे आवाहन.

·     अखंडित वीजपुरवठ्यामुळेच जनतेला कोरोना विषाणू पादुर्भावाच्या काळात घरात थांबवणे झाले शक्य, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रतिपादन, डॉ. राऊत यांनी केले वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक.

·     अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एसटी व बेस्टसेवा सुरु ठेवण्याचा निर्णय. वेळापत्रक – मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली व कल्याण(सकाळी ८:००,८:१५) येथून तसेच पश्‍चिम रेल्वेमार्गावरील नालासोपारा व विरार (सकाळी ७:००,७:१५) येथून थेट मंत्रालयासाठी बसेसची सोय, बेस्ट मार्फत.… बोरीवली स्टेशन – मंत्रालय (८:००,८:३०),शासकीय वसाहत बांद्रा- मंत्रालय (८:३०,९:००), पनवेल एसटी स्टँड -मंत्रालय (७:३०,८:३०) ठाणे कॅडबरी जंक्शन- मंत्रालय (८:००,८:३०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर- मंत्रालय (८:३०,९:००) विक्रोळी डेपो- मंत्रालय(८:३०,९:००)पि.के.खुराणा चौक वरळी-मंत्रालय (८:४५,९:००), बृहन्मुंबई महापालिका,शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर,परिचारिका,औषध दुकानदार,पोलीस,विविध बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी इत्यादी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल,पालघर,आसनगाव,विरार, कल्याण,बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली,वाशी दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत (तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.) एसटीच्या बसेस दर5मिनिटांला या प्रमाणे सुरू, या बसेस 1. डोंबिवली-ठाणे,2. पनवेल-दादर,3. पालघर-बोरिवली,4. विरार- बोरिवली,           5. टिटवाळा-ठाणे, 6. आसनगाव- ठाणे,7. कल्याण- ठाणे,8. कल्याण-दादर,9 बदलापूर-ठाणे,10. नालासोपारा-बोरिवली या मार्गावर धावतील,

·     सर्वधर्मगुरूंनी‘आरोग्यदूत’बनून जनजागृती करावी,‘मी घरी थांबणार,कोरोनाला हरवणार’, गुढीपाडव्यानिमित्त संकल्प करण्याचे,- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

·     मॉरिशसमध्ये अडकून पडलेल्या नांदेडच्या सहा विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना पत्र.

·     विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, धान खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्याची, अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची  घोषणा.

·     करोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन विधानपरिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला मुदतवाढ .

·     राज्यात18नवीन करोना बाधित रुग्ण, एकूण रुग्ण संख्या107झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

·     लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा जनतेशी संवाद –महत्वाचे मुद्दे– संकटात संधी शोधू नका,साठेबाजांना इशारा, जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक सुरु राहण्याची ग्वाही, जीएसटी रिर्टन दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याबद्दल तसेच विषाणुच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद, अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध, त्याची वाहतूक आणि वितरण व्यवस्था सुरळित ठेवण्याच्या सूचना, शेतकरी,शेतमजूर यांना शेतात जाण्यास,काम करण्यास मनाई नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक थांबवलेली नाही. शेतमालाची वाहतूक करण्यास बंदी नाही. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राहावा यासाठी ही उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर,कंपन्यांवर बंदी नाही. ज्या कंपन्या अशाप्रकारे जीवनावश्यक वस्तुंचे उत्पादन करतात त्यांनी आपल्या वाहनांवर कंपनीचे नाव,उत्पादन,कर्मचारी यांची माहिती देणारे ओळखपत्र लावावे,त्यांना वाहतुकीत अडवले जाणार नाही, सध्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा मंडळाने पुढे येऊन रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासारखा अनोखा कार्यक्रम केला, अशाप्रकारे योग्य काळजी घेऊन इतर संस्थांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे, या विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यांच्या सीमा सील, आतापर्यंत जिथे विषाणुचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो पोहोचू नये,म्हणून हा निर्णय, जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक,कंपन्या,कारखाने,बँका बंद नाहीत. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांनी100नंबरवर फोन करून पोलीसांची मदत घ्यावी.  

·     कोविड19(करोनाविषाणू)याचाप्रसाररोखण्यासाठीच्याउपाययोजनांचाभागम्हणूनविविधकायद्यांतर्गतउपलब्धअसलेल्याअधिकारांचाउपयोगकरूनसंपूर्णमहाराष्ट्रातयेत्या31मार्चपर्यंतबंदीआदेशलागूकरण्याचीअधिसूचनाशासनामार्फतजारी, या अधिसूचनेनुसार अत्यावश्यकवस्तूवसेवापुरविणाऱ्यादुकानेआणिआस्थापनायांनापुढीलनिर्बंधातूनसूट- किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये, किमान मनुष्यबळासहबॅंका/एटीएम,भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा(स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्युअल फंडस, स्टॉक ब्रोकर्स)अन्यसंबंधितसेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि  कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या,मुद्रितआणिइलेक्ट्रॉनिकमाध्यमे,टेलिकॉम,टपाल,इंटरनेट,डेटासेवायांसहमाहितीतंत्रज्ञानआणिमाहितीतंत्रज्ञानसेवा, अत्यावश्यकवस्तूंचीपुरवठासाखळीआणिवाहतूक,शेतमालआणिअन्यवस्तूंचीनिर्यातआणिआयात, बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ,कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा,खाद्यपदार्थ,औषधेआणिवैद्यकीयउपकरणेयांसहअत्यावश्यकवस्तूंचेई-कॉमर्सद्वारेवितरण,खाद्यपदार्थ,किराणा,दूध,ब्रेड,फळे,भाजीपाला,अंडी,मांस,मासेयांचीविक्री,वाहतूकआणिसाठवण,बेकरीआणिपाळीवप्राण्यांसाठीचेखाद्यपदार्थआणिपशुवैद्यकीयसेवा,उपाहारगृहांमधूनघरपोचसेवा, औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखादय, चारा निर्मिती घटक, इत्यादी,रूग्णालये,औषधालयेआणिचष्म्याचीदुकाने,औषधांचेकारखाने,विक्रेतेआणिवाहतूक,पेट्रोलपंप,एलपीजीगॅस,ऑईलएजन्सीजत्यांचीसाठवणआणित्यांच्याशीसंबंधितवाहतूकव्यवस्था, टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा, पावसाळयापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे, अत्यावश्यकसेवांकरिताखासगीसंस्थांमार्फतपुरविल्याजाणाऱ्यासुरक्षासेवेसहअन्यसेवादेणाऱ्यासंस्था, अत्यावश्यकसेवांनाकिंवाकोविड19-प्रतिबंधासाठीहोणाऱ्याप्रयत्नांनामदतकरणारीखासगीआस्थापने,वरीलबाबींशीसंबंधितपुरवठासाखळी, अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक.

·     करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात  श्री. सुनील भारद्वाज, पोलीस अधिक्षक तथा सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली, दक्षता नियंत्रण कक्ष स्थापन,1800222365,दूरध्वनी क्र022-26592362/63,

दि. 25मार्च, 2020

·     गुढी पाडव्यानिमित्त मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांचे आवाहन – घरी राहा,सुरक्षित राहा, हरवलेले कुटुंब सुख अनुभवा, एसीचा वापर टाळा.

·     मुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे साधेपणाने गुढीपाडवा साजरा,देशातील पहिले दोन रुग्ण‘करोना’मुक्त झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आनंद; ‘करोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे मानले आभार.

·     आरोग्याशी निगडीत वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर, मास्क,व्हेंटीलेटर्स,नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करण्याचे, आवाहन उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांचे आवाहन, यासाठी समन्वयक म्हणून मराठी भाषा सचिव श्रीमती प्राजक्ता लवंगारे (sec.marathi@maharashtra.gov.in) याशिवाय उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी(psec.industry@maharashtra.gov.in), उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे(didci@maharashtra.gov.in),एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्वलगन(ceo@maharashtra.gov.in), मंत्रालयात सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील समन्वयक प्रधान सचिव भूषण गगराणी(ccrmaharashtra.aid@maharashtra.gov.in), अन्न व औषध प्रशासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी(psec.mededu@maharashtra.gov.in) यांच्याशी संपर्क करावा, याशिवाय min.industry@maharashtra.gov.in या इमेलवर संपर्क करण्याची श्री देसाई यांची विनंती.

·     सुरक्षेसाठी असलेले पोलीस आणि वाहन, पोलीस विभागाला वापरण्यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची परवानगी.

·     करोना विरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता, या ठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय शक्य असल्याची, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती.  

·     राज्यातील करोना बाधित पहिले दोन रुग्ण पूर्णपणे बरे, नमुने निगेटिव्ह आल्यानंतर घरी परत, उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्याद्वारे अभिनंदन.

·      दि. 25 मार्च 2020 ची सुधारित अधिसूचना, राज्यात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन, अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्यादुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट, अत्यावश्यक वस्तूवसेवापुरविणाऱ्यादुकानेआणिआस्थापनायांनापुढीलनिर्बंधातूनसूट-पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन आणि अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि कारागृह, मंत्रालय, जिल्हा प्रशासन, लेखा व कोषागार, वीज, पाणी आणि स्वच्छता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा व स्वच्छता याच्याशी संबंधित कर्मचारी, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासन या कार्यालयांमधील अत्यावश्यक सेवा.मंत्रालय,शासकीयकार्यालयेतसेचसुरूठेवण्यातयेणारीदुकानेआणिआस्थापनायांनीकिमानकर्मचारीवर्गअसण्याचीआणिपरस्परांपासूनकिमानअंतरराखण्याची(जसेचेकआऊटकाउंटरवरतीनफुटाचेअंतरराखण्यासाठीजमिनीवरखुणाकरणे)दक्षताघ्यावी.स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घ्यावी,किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा  (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्युअल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या, आदरातिथ्याशी संबंधित सेवा स्थगित राहतील. तथापि, बंदी (लॉकडाऊन) मुळे अडकलेले पर्यटक, व्यक्ती, वैद्यकीय, अत्यावश्यक व आणिबाणीच्या सेवेतील कर्मचारी, हवाई आणि सागरी सेवेतील व्यक्तींच्या राहण्यासाठी उपयोगात आणले जाणारे हॉटेल्स, होम स्टे, लॉजेस आणि मॉटेल्स यांना व विलगीकरण (क्वारंटाईन) साठी वापरण्यात येणाऱ्या वास्तू (इस्टॅब्लीशमेंट) यांना यातून सूट, अंत्यविधीसारख्या प्रसंगी वीस पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही, 15 फेब्रुवारी नंतर भारतात आलेल्या आणिविलगीकरणातराहण्याचानिर्देशदेण्यातआलेल्याप्रत्येकव्यक्तीनेयानिर्देशांचेपालनकरणेआवश्यक,अन्यथात्यांच्यावरदंडात्मककारवाई,आणित्यालाशासकीयविलगीकरणव्यवस्थेतस्थलांतरित, उपरोक्त निर्देशांचे पालन होण्याकरिता जेव्हा कधी आवश्यकता भासेल तेव्हा जिल्हा न्यायाधीशांमार्फत कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक, दवाखान्यांच्या पायाभूत सुविधा तसेच विस्तारीकरणाच्या कामासाठी होणाऱ्या साधनसामग्रीच्या वाहतुकीमध्ये बाधा येणार नाही याची जिल्हा प्रशासनाकडून दक्षता.

·     मुंबईतील दादर,भायखळा भाजीपाला मार्केट सुरू;नागरिकांना दिलासा, मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा.

  दि. 26 मार्च, 2020

·     केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी यंत्रणेला सूचना देण्यात आल्याची  मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची माहिती.

·     सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी वर्षा निवासस्थान येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित. महत्वाचे मुद्दे– खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे, इतर आजारांच्या उपचारासाठी रुग्ण येतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरच अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र, त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी यांचा समावेश, परदेशातून गेल्या १५ दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची माहिती घेऊन, या व्यक्तींची तपासणी करावी, करून, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील, औषधे लोकांना मिळतील याची काळजी घ्यावी, इतर राज्यांतून महाराष्ट्रात येऊन थांबलेल्या नागरिकांची काळजी घ्या, जीवनावश्यक वस्तूंसाठी उपयोगात आणली जाणारी वाहतूक पोलीस अडवणार नाहीत, पण अशा वाहनांमधून या कामाशी संबंधित नसलेले लोक प्रवास करताना आढळले तर कारवाई, प्रत्येक जिल्ह्यात किती रुग्ण क्वारंटाईन करू शकतो तसेच कोरोनासाठी किती वॉर्ड किंवा रुग्णालय राखून ठेवू शकतो त्याचे व्यवस्थित नियोजन करा.

·     करोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध, झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी,अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी.

·     राज्यात करोना बाधित ३ नवीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्या १२५ झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

·     करोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा,राजभवनातील कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार.

·     भाजीपाला,फळे व जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत सुरू राहील. ग्राहकांनी मार्केटमध्ये, दुकानात गर्दी करू नये, असे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन.

·     शेतकरी,नोकरदार,कंत्राटी कर्मचारी,कामगार, व्यापारी,उद्योजक आदींना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व कर्जांचे देय हप्ते,ईएमआय,कॅश क्रेडीट व ओव्हर ड्राफ्टवरील व्याज,क्रेडीट कार्डांची बिले तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावी,अशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची फेरमागणी.

·     करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागपुरातील किराणा दुकानदार देणार घरपोच सेवा, महापालिका क्षेत्रात नागरिकांसाठी व्यवस्था.

·     सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने,किराणा मालाची दुकाने,औषधांची दुकाने ही २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात असल्याची येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  घोषणा.

·     इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च  यासंस्थेची देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता, यापैकी सर्वाधिक ८ प्रयोगशाळा महाराष्ट्रातील असल्याची, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती. यामध्ये थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड,नवी मुंबई,सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड,मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड,मुंबई,सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल,नवी मुंबई,एस. आर. एल. लिमिटेड,मुंबई,ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड,पुणे,कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी,मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे यांचा समावेश.

·     केंद्र सरकारच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत;संकटाचे वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे पॅकेज हवे, पॅकेजचे लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन.

·     करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी, यामुळे मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही,असा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,गृह मंत्री अनिल देशमुख उपस्थित. महत्वाचे निर्णय – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ट्रॅक्टर,हार्वेस्ट्रर आदी वाहनांना पुरेसे पेट्रोल,डिझेल उपलब्ध करुन  देणार, शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,गरीब नागरिक,रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने‘कम्युनिटी लंगर’सुविधा सुरु केली आहे, त्याच धर्तीवर खाजगी कंपन्या,स्वयंसेवी संस्था,संघटनांच्या सहकार्याने अन्य शहरात देखील कम्युनिटी किचन सुरु करणार, नागरिकांना‘रेडी टू इट’किंवा‘रेडी टू कूक’अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणार.

·     करोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

·     डॉक्टर,आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक,हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई करण्याचा शासनाचा निर्णय

·     करोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार असल्याची, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती.

·     ‘जीवनावश्यक वस्तू घरपोच सोसायटीपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन व्हावे’, डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत;लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन.

दि. २७ मार्च २०२०

·      देशातील बँका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी,असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत त्यामुळे  त्यांना रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश देण्याची उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री श्री अजित पवार यांची मागणी

·     राज्यात अंडी,कोंबडी,मटण,गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. कोकणातील आंबे,नाशिकची द्राक्षे,नागपूरची संत्री,केळी,कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत, दूध,भाजीपाला,फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही, अशी  उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची माहिती.

·     आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा फेसबूकद्वारे नागरिकांसोबत संवाद- महत्वाचे मुद्दे-करोनाचे संकट असताना खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नयेत, संवेदनशीलता दाखवून रुग्णालये सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी,संचारबंदी काळात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे, नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, करोनाच्या प्रतिबंधासाठी ट्रेसिंग,टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार राज्यशासनाचे कार्य, १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले, सध्या १३५ रुग्ण आढळून आले आहेत, आतपर्यंत ४२२८ जणांच्या करोनासाठी चाचण्या, त्यापेकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह, १३५ पॉझीटिव्ह, ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे करोनाबधीत रुग्ण बरे होत आहेत, नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये, सर्वपक्षीय कार्यकर्ते,सामाजिक संघटना,मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

·     लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न.

·     सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेले निर्णय– करोना विषाणूच्या संकटकाळी दिव्यांगांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष उपाययोजना, हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे स्वस्त धान्य व आरोग्यविषयक किटचे घरपोच वाटप, यामध्ये धान्य,कडधान्य,डाळी,तांदूळ,तेल, सॅनिटायझर,मास्क,रुमाल,साबण,डेटॉल,फिनेल असे आरोग्यविषयक साहित्याचा समावेश, दिव्यांग व्यक्तींना हे साहित्य नजीकच्या रेशन दुकानातून उपलब्ध करून देण्यात येणार, ज्या ठिकाणी’कम्युनिटी किचन’किंवा तत्सम सुविधा सुरू आहेत किंवा प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी गरजू दिव्यांग व्यक्तींना घरपोच जेवण/नाष्टा डबे पुरविण्यात येणार, दिव्यांग व्यक्तींना बँका,पतसंस्था किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांमध्ये विनारांग सुविधा देण्यात येणार, मनोरुग्ण,बेवारस किंवा निराश्रित असलेल्या व्यक्तींची सोय स्थानिक शेल्टर होम,आश्रम किंवा बालगृहात करणार, पात्र दिव्यांगांना एक महिन्याचे निवृत्तीवेतन आगाउ(ॲडव्हान्स)देण्यात देणार, प्रत्येक जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिव्यांगांसाठी एक हेल्पलाईन नंबर, टोल फ्री स्वरूपात प्राप्त सुरु करणार. या निर्णयासोबतच दिव्यांगांसाठी लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी सर्व महत्वाच्या शासकीय कार्यालये,पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांकांची यादीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीसाठी खालीक लिंकवर क्लिक करा : https://twitter.com/dhananjay_munde/status/1243224267996585984?s=19

·     जे जे समूह रुग्णालयातील करोना रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर म्हणून विनिता सिंघल यांची नेमणूक केल्याची, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती.

·     ऱिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व कर्जांच्या ईएमआयला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची घोषणा केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला, मात्र बॅंकांकडून या घोषणेची अंमलबजावणी करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा करून त्यांच्यावर दबाव ठेवण्यात यावा,अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मागणी.

·     राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमात समाविष्ट न झालेल्या विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना एप्रिल,मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची, अन्न,नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा.

·     राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांसह करोना विषाणू आजारासंबंधी विविध विषयांवर सर्व राज्यांचे राज्यपाल,नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजभवन येथून चर्चेत सहभाग.

·     ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रमुख दादी जानकी यांच्या निधनाबद्दलराज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनातीव्र दुःख.

·     राज्यातील २४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,नवीन २८ रुग्णांची नोंद,एकूण रुग्ण संख्या १५३,राज्यातील करोनाचा ५ वा मृत्यू.

·     मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे विभागीय आयुक्तांशी संवाद- महत्वाचे निर्देश– कोणत्याही परिस्थितीत गरीब,कष्टकरी,हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घ्या, केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे तसेच स्वस्त धान्य दुकानातील धान्य त्यांना तत्काळ उपलब्ध करुन द्या, गरिबांची अजिबात उपासमार होणार नाही,याची काळजी घ्या. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख,आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित.

·     मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा नागरिकांशी समाजमाध्यमांद्वारे संवाद- महत्वाचे मुद्दे- आपण कोरोना निगेटिव्ह असले पाहिजे,मात्र घरातले वातावरण पॉझिटिव्ह ठेवा, शिवभोजन केंद्रांना गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवता येणे शक्य व्हावे यासाठी त्यांचे उद्दिष्ट्य  1लाख वाढवत आहोत, मात्र त्यासाठी गर्दी करून आरोग्याला धोका होईल असे वागू नका,जीवनाश्यक वस्तुचा पुरवठा व्यवस्थित होत राहील याची खात्री बाळगा, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून,टँकर्स,कंटेनर यामधून कोणत्याही परिस्थितीत लोकांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्या, ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्या, हे कामगार आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे हे लक्षात ठेवा, ग्रामीण भागातून दूध संकलन व्यवस्थित होईल याची काळजी घ्या, परराज्यातील अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी येणाऱ्या संस्थानी गर्दी न करता मदत कार्य करा, खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु ठेवावेत, राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत  मात्र अनावश्यक गर्दी  करु नका, कुठल्याही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, वेळीच उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो, मात्र योग्य उपचार करुन घ्या.

दि.28मार्च2020

·     राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा;नागरिकांचे स्थलांतर थांबविण्याचे निर्देश.

·     मुंबईतील’कोरोना’विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच करोना बाधितांच्या उपचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व होम क्वारंटाईनच्या सुविधांचा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याद्वारे आढावा. मुंबई शहरात कालपर्यंत 347व्यक्ती  होम कॉरंटाईनमध्ये, बृहन्मुंबईत एकूण72वैद्यकीय पथके  कार्यरत, क्वारंटाईन सुविधा – शासकीय वस्तीगृह उच्च शिक्षण मुंबई विभाग700बेड, विसावा विश्रामगृह वरळी20बेड, कार्यकारी अभियंता उत्तर मुंबई (सार्वजनिक बांधकाम विभाग,अंधेरी)414बेड, पश्चिम रेल्वे95बेड, मध्य रेल्वे180बेड, एकूण5हॉटेल्समध्ये367खोल्या. विलगीकरण सुविधा रुग्णालये– बृहन्मुंबई महानगरपालीका908बेड,  खाजगी399बेड, शासकीय685बेड

·     मुख्य सचिव श्री अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ

०००

मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट

मुंबई, दि. 28 -सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या28झाल्याने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरज येथील शासकीय रुग्णालयास भेट देऊन उपचाराबाबत माहिती घेतली.

त्यांनी त्यावेळी सर्व डॉक्टर्स व अधिकारी यांची तातडीने बैठक घेतली.

बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून नवीन125खाटांचा स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी  यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

मजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार

मुंबई, दि. 28: कोरोनाप्रसाराच्या पार्श्वभूमीवर मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

या मजुरांच्या आरोग्याची काळजी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन सक्षम आहे, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

श्री. ठाकरे म्हणाले, मजूर, कामगारांचे आरोग्य, जेवण तसेच आहे त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये. मदतीची आवश्यकता असल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग  कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषद इतर कामकाज

0
अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक - मंत्री नरहरी झिरवाळ मुंबई, दि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा...

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...

‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून

0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....