मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1699

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध

मुंबई, दि. २८ सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन संबंधितांना अर्ज करता येईल.

सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, दूध इत्यादी विविध प्रकारच्या जीवनावश्यक सामग्रीच्या वाहतुकीस मान्यता देण्यात आली आहे. पण यासाठी वाहतूक सुरु करण्यापूर्वी संबंधित वाहनास प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. यासाठी सध्या पोलीस, आरटीओ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अशा वाहनांना पास देण्यात येत आहेत. आता याबरोबरच संबंधित वाहनधारकांना ऑनलाईन प्रणालीमार्फतही ई-पास देण्यात येणार आहेत यासाठी त्यांनी covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन अर्ज करुन आपला ई-पास प्राप्त करुन घ्यावा, असे  राज्य शासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. ऑनलाईन प्रणालीवरुन प्राप्त अर्जाची पोलिसांमार्फत पडताळणी केली जाईल. त्यानंतर वाहनधारकाला आपला ई-पास ऑनलाईन प्रणालीवरुनच डाऊनलोड करुन घेता येईल. हा पास प्राप्त झाल्यानंतर वाहनधारक वाहतूक करु शकेल. 

सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था, व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पाससाठी अर्ज करू शकतात. याठिकाणी सर्व आवश्यक माहिती भरुन अर्ज दाखल केल्यानंतर टोकन आयडी प्राप्त होतो. त्याचा वापर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करता येईल. पोलिस यंत्रणेच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करूता येईल. ई-पासमध्ये अर्जदाराची माहिती, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल. प्रवास करताना ई-पासची सॉफ्ट तसेच हार्ड कॉपी जवळ ठेवावी आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवावी, असे या पत्रकात म्हटले आहे. वैध तारखेनंतर त्याचा वापर किंवा अन्य प्रकारे गैरवापर केल्याचे आढळल्यास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.

जे.जे. समूह रुग्णालयातील कोरोना रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी म्हणून सनदी अधिकारी विनिता सिंघल यांची नेमणूक – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई,दि.27 :जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथेकोरोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे,अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज येथे दिली.

जे जे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात300खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि60खाटांचा आयसीयू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात250खाटांची स्वतंत्र व्यवस्था  आणि50  खाटांच्या आयसीयू विभागाची  व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत. मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या करोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे यापैकी100खाटा आयसीयूसाठी असतील अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट त्रिसूत्रीनुसार कोरोनाचा प्रतिबंध -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

· संवेदनशीलता दाखवत खासगी डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करावेत

·      बाधित19 रुग्णांना घरी सोडले

मुंबई,दि.27 : कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत. अशापरिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी,अशी सूचना करतानाच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग,टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून19रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या135रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे:

 राज्यात सधया135बाधीत रुग्ण आहेत. आतपर्यंत4228जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापेकी4017चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.135पॉझीटिव्ह आले.

 शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स,कर्माचारी वर्ग तसेच अन्य आपत्कालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहेत.

 कोरोना व्यतिरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरूराहणे आवश्यक आहेत. गरोदर महिला,लहान मुलांचे आजार,हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखानेबंदठेवू नका. संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील.

 राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही.केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये,हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीरे घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहान करण्यात येत आहे.

 ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे कोरोनाबाधि रुग्ण बरे होत आहेत.

 बाधित रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसींग नंतर त्यांची टेस्टींग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध,तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे.

 नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते,सामाजिक संघटना,मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

अजय जाधव..२७.३.२०२०

राज्यातील सर्व दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन, स्वच्छता किट घरपोच मिळणार; एक महिन्याची पेन्शन ॲडव्हान्स देण्याचा निर्णय

●बँकेतील व्यवहारही होणार रांगेशिवाय

●दिव्यांग बांधवांच्या काळजीसाठी हा निर्णय – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई,दि.27 : कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आली आहे.  कोरोनाच्या लढाईत सर्व दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार असून,यामध्ये धान्य,कडधान्य,डाळी,तांदूळ,तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर,मास्क,रुमाल,साबण,डेटॉल,फिनेल असे आरोग्यविषयक साहित्याचाही समावेश असणार आहे.

हे आरोग्यविषयक साहित्य त्या-त्या जिल्ह्याच्या स्थानिक दिव्यांग कल्याण निधीतून पुरविण्यात यावे असेही सूचित करण्यात आले आहे. राज्य दिव्यांग कल्याण मंडळाच्या आयुक्तांनी याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले  आहेत.

इतर दिव्यांग व्यक्तींना हे साहित्य नजीकच्या रेशन दुकानातून उपलब्ध करून देण्यात यावे व दिव्यांग व्यक्ती स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती विना रांग हे साहित्य घेऊ शकणार आहे.

याशिवाय ज्या-ज्या ठिकाणी’कम्युनिटी किचन’किंवा तत्सम सुविधा सुरू आहेत किंवा प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी गरजू दिव्यांग व्यक्तींना घरपोच जेवण/नाष्टा डबे पुरविण्यात येणार आहेत.

दिव्यांग व्यक्तींना बँका,पतसंस्था किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांमध्ये विनारांग सुविधा देण्यात याव्यात असेही या निर्णयाद्वारे निर्देशित करण्यात आले आहे.

मनोरुग्ण,बेवारस किंवा निराश्रित असलेल्या व्यक्तींची सोय स्थानिकच्या शेल्टर होम,आश्रम किंवा बालगृहात करण्यात यावी असेही निर्देश या निर्णयाद्वारे देण्यात आले असून पेन्शन लाभार्थी दिव्यांगांना एक महिन्याची पेन्शन ॲडव्हान्स देण्यात यावी असाही निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाद्वारे प्रत्येक जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिव्यांगांना एक हेल्पलाईन नंबर टोल फ्री स्वरूपात प्राप्त करून द्यावा व त्याबाबत सर्व दिव्यांगांना विविध माध्यमातून माहिती देण्यात यावी,जेणेकरून या सर्व सुविधा मिळवण्याबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही,असेही निर्देश देण्यात आले आहेत.

या आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील सर्व दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू व आरोग्य विषयक सुविधा सामान्य माणसाप्रमाणे मिळाव्यात व कोणत्याही अतिदिव्यांग,बेवारस आदी व्यक्तींचे हाल होऊ नयेत असा आमचा प्रयत्न असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान या निर्णयासोबतच दिव्यांगांसाठी लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी राज्यातील सर्वमहत्त्वाच्या शासकीय कार्यालये,पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांकांची यादीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मासे,मत्स्यबीज व मत्स्यखाद्याच्या वाहतुकीस परवानगी- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई,दि.27: केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे,कोळंबी,मत्स्यबीज व मत्स्यखाद्य यांचा समावेश अत्यावश्यक बाबींमध्ये करण्याच्या सूचना राज्यांना पत्राद्वारे केलेल्या असून केंद्राकडून आलेल्या पत्राची त्वरीत दखल घेत राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने मासे,मत्स्यबीज व मत्स्यखाद्य यांचा समावेश अत्यावश्यक बाबींमध्ये करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनादिल्या असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. या निर्णयामुळे संचारबंदी काळातही मासे,मत्स्यबीज व मत्स्यखाद्य यांची वाहतूक करता येणार आहे.

संचारबंदी काळात आंतरराज्य व राज्यांतर्गत वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आल्याने वसई,उत्तन,मढ,वर्सोवा,सातपाटी भाऊचा धक्का,ससुन डॉक येथील बंदरांवर शेकडो टन मासळी गेले कित्येक दिवस मासेमारी नौकांमध्येच पडून आहे. केंद्र सरकारने माशांचा अत्यावश्यक बाबीमध्ये समावेश केल्याने गुजरात,कर्नाटक तसेच राज्यातील परदेशात मासळी निर्यात करणाऱ्या कंपन्या थेट बंदरांवरुन मासळी उचलू शकणार आतहेत. शिवाय स्थानिक बाजारपेठांमध्येही हा मासा पोहचू शकेल. राज्यसरकारच्या या निर्णयामुळे मत्स्यशेती करणाऱ्या,समुद्री मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना तसेच मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

श्री. शेख म्हणाले की,सरकार मच्छीमारांच्या बाजूने ठामपणे उभे आहे. सरकारने मत्स्यवाहतुकीला परवानगी दिली असली तरी लोकांनी मासे खरेदीविक्रीच्या वेळी गर्दी करु नये व सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे.

विदर्भ मराठवाड्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य

• अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई,दि.27 :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एप्रिल,मे आणि जून2020 या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात विदर्भ व मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना प्रतिमाणसी5 किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न,नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली आहे.

देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या कालवधीत राज्यातील जनतेला अन्न,धान्य मुबलक व सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध योजना आखल्या जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील14जिल्ह्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्याचा निणर्य घेण्यात आला असून  त्यांना सवलतीच्या दरात गहू,तांदूळ प्रतिमाणसी पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद,जालना,नांदेड,बीड,परभणी उस्मानाबाद,लातूर,हिंगोली,अमरावती विभागातील अमरावती,वाशिम,अकोला,बुलढाणा,यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या14जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या दि.24जुलै2015च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या उपरोक्त14जिल्ह्यांतील एपीएल  (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना या योजनेद्वारे एप्रिल,मे आणि जून2020या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.  या निर्णयामुळे विदर्भ मराठवाड्यातील14जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

जगाला मानवतेचा संदेश देणारा दुवा निखळला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि. 27 : प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देण्याचे काम संस्थेच्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने जगाला मानवतेचा संदेश देणारा दुवा निखळला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या माध्यमातून दादी जानकी यांनी भारतासह अनेक देशात कार्य केले. जगाला सुखी, समाधानी करण्यासाठी त्यांनी मानवतेचा मंत्र दिला. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी होते. स्वच्छ भारत मिशनच्या ब्रॅण्ड ॲम्बॅसिडर म्हणून त्यांनी काम केले. आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेसह त्यांच्या अनुयायांच्या मार्गदर्शक हरपल्या असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई,दि27: कोणत्याही परिस्थितीत गरीब,कष्टकरी,हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांना दिले आहेत. केंद्राने नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे तसेच राज्य शासनाच्या यंत्रणेतील रेशनवरील धान्य त्यांना तात्काळ मिळेल. त्यांची अजिबात उपासमार होणार नाही हे पाहण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते आज वर्षा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्तांशी संवाद साधत होते. आज पार पडलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर राज्यातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधताना ते म्हणाले की,लॉकडाऊनमुळे आपल्याला अडकावे लागले आहे,हि परिस्थिती नाईलाजाने उद्भवली आहे. आपण कोरोना निगेटिव्ह असले पाहिजे मात्र घरातले वातावरण पॉझिटिव्ह ठेवा.

शिवभोजन उद्दिष्ट्य वाढवले

या संकटात राज्यभरातून शिवभोजन केंद्रांनी गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवावी,त्यांचे उद्दिष्ट्यही आम्ही1लाख वाढवत आहोत . त्याचा लाभ घ्यावा मात्र त्यासाठी गर्दी करून आरोग्याला धोका होईल असे करू नका.

रिटेल सप्लाय चेन आणि होम डिलिव्हरी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्ही निर्देश दिले आहेत. पोलीस,महसूल,सहकार,पणन  आणि कामगार विभाग याना यादृष्टीने सर्व सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा हा व्यवस्थित होत राहील याची खात्री बाळगा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून,टँकर्स,कंटेनर यामधून कोणत्याही परिस्थितीत लोकांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यातून एखादा अपघात घडल्यास दुर्दैवी प्रसंग ओढवू शकतो.

ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्या असे साखर कारखान्यांना सांगितले आहे. हे कामगार आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे हे लक्षात ठेवा.

दूध संकलन व्यवस्थित होईल

ग्रामीण भागातून दूध संकलन व्यवस्थित होईल जेणे करून शेतकरी आणि ग्राहक या दोघांची कुचंबणा होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही दिले आहेत.

परराज्यातून आपल्या राज्यात मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत,कुणी इथे काम करणारे कामगार आणि श्रमिक आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी प्रशासन घेईल. काही स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र त्यांनी देखील गर्दी न करता व आपल्या मदतीचे योग्य नियोजन करून मदत कार्य करावे.

खासगी डॉक्टर्सवर देखील मोठी जबाबदारी

खासगी डॉक्टर्सवर देखील मोठी जबाबदारी आहे. या लढाईत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी आपले दवाखाने सुरु ठेवले पाहिजेत. त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची जबादारी आमची आहे.

रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन

राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावी मात्र अनावश्यक गर्दी होऊ देऊ नये असे मी आवाहन करतो.

कुठल्याही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होणार हि जबाबदारी नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे. पोलिसाना सहकार्य देखील आम्ही सूचना दिल्या आहेत.

शिर्डी संस्थानाने51कोटी रुपये सहायता निधीसाठी दिले आहेत,सिद्धीविनायकने देखील5कोटी देऊ केले आहेत अशी माहिती देताना ते म्हणाले कि वेळीच उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो. मात्र योग्य उपचार झाले पाहिजेत असेही ते म्हणाले. 0000

मुख्यमंत्री ने राज्य में गरीबों, मेहनतकश लोगों को खाद्य सामग्री देने के लिए प्रशासन को निर्देश दिये*    मुंबई, दि.27: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने खाद्य और नागरिक आपूर्ति विभाग और जिला प्रशासन को निर्देश दिए हैं कि वे यह सुनिश्चित करने के लिए सावधानी बरतें कि किसी भी परिस्थिति में गरीब, मेहनतकश और रोज कमाने-खाने  वाला व्यक्ति भूखा न सोने पाए।  उन्हें केंद्र के साथ-साथ राज्य सरकार प्रणाली के माध्यम से घोषित पैकेज के अनुसार तत्काल अनाज मिलेगा।  मुख्यमंत्री आज वर्षा से वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से विभागीय आयुक्तों के साथ बातचीत कर रहे थे।  इस अवसर पर उप मुख्यमंत्री अजीत पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने महत्वपूर्ण सुझाव दिए।वीडियो कॉन्फ्रेंस के बाद सोशल मीडिया के माध्यम से राज्य के नागरिकों को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि लाॅकडाउन की वजह से यह स्थिति पैदा हुई है।  आप  कोरोना निगेटिव बने रहें लेकिन अपने घर में ( पाॅजिटिव) सकारात्मक माहौल बनाये रखें। शिव भोजन लक्ष्य बढ़ाइस संकट के समय में, राज्य भर में शिव भोजन केंद्रों को जरूरतमंद और भूखे लोगों को भोजन खिलाना चाहिए।  इसके लिए लक्ष्य में एक लाख की वृद्धि की गई है।  इसका लाभ उठाएं लेकिन इसके लिए अव्यवस्था  न करें और अपने स्वास्थ्य को खतरे में न डालें।हमने खुदरा आपूर्ति श्रृंखला और होम डिलीवरी सुचारू रूप से करने के निर्देश दिए हैं।  सभी सुझाव और निर्देश पुलिस, राजस्व, सहकार, विपणन और श्रम विभाग को दिए गए हैं।  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि आवश्यक  वस्तुओं की आपूर्ति नियमित रहेगी।पुलिस को यह सावधानी रखने के लिए निर्देशित किया गया है कि किसी भी परिस्थिति में आवश्यक माल वाहनों, टैंकरों और कंटेनरों के माध्यम से लोगों का परिवहन न हो।चीनी कारखानों से कहा गया है कि वे अपने मजदूरों और उनके परिवारों की देखभाल करें।  याद रखें कि ये मजदूर आपके परिवार का हिस्सा हैं। दूध संग्रह उचित तरीके से होगाग्रामीण क्षेत्रों से दूध संग्रह व्यवस्थित  तरीके से होगा ताकि किसान और उपभोक्ता दोनों परेशान न हों।दूसरे राज्यों के नागरिक बड़ी संख्या में राज्य में फंसे हुए हैं। अधिकतर  वे मजदूर हैं।  प्रशासन उनकी उचित देखभाल करेगा।  कुछ स्वयंसेवी संगठन उनकी मदद के लिए आगे आ रहे हैं।  हालाँकि, उन्हें भी बिना कोई अव्यवस्था  पैदा किए काम करना चाहिए और मदद के काम को नियोजित ढंग से करना चाहिए। निजी डॉक्टरों पर  बड़ी जिम्मेदारीनिजी डॉक्टरों की भी बड़ी जिम्मेदारी है।  इस लड़ाई में उनकी भूमिका महत्वपूर्ण है।  उन्हें अपने क्लीनिक चालू रखने चाहिए।  उनकी और कर्मचारियों की सुरक्षा और भलाई की  जिम्मेदारी हम सबकी है। रक्तदान शिविरों का आयोजन राज्य में खून की कमी है।  मैं गैर सरकारी संगठनों से रक्तदान शिविर आयोजित करने का आग्रह करता हूं, लेकिन यह ध्यान रखा जाए कि अनावश्यक भीड़ न हो। नागरिकों के रूप में, यह देखना हमारी ज़िम्मेदारी है कि किसी भी प्रकार की कानून-व्यवस्था बिगड़ने की स्थिति उत्पन्न न हो। यह कहते हुए कि शिरडी संस्थान ने राहत कोष के लिए 51 करोड़ रुपये दिए हैं, सिद्धिविनायक ने भी 5 करोड़ रुपये देने की पेशकश की है, उन्होंने कहा, “यदि समय पर उपचार किया जाए है तो कोरोना ठीक हो सकता है।      0000Chief Minister Directs Administration to Supply Food and Groceries to Poor, Hard working People in State  Mumbai, 27 : Chief Minister Uddhav Thackeray has given directions to the Food and Civil Supplies Department and the district administration to take precautions to ensure that the poor, hard working and hand to mouth person does not starve under any circumstances.  They will get immediate grains according to the package announced by the Centre as well as through the state government system.  The Chief Minister  was interacting with the Divisional Commissioners through video conference from Varsha today.  On this occasion  Deputy Chief Minister Ajit Pawar, Home Minister Anil Deshmukh, Health Minister Rajesh Tope made important suggestions.  Addressing the citizens of the state via social media after the video conference, he said that the situation has come to a standstill because of the lockdown.  You should have the Corona negative, but keep positive atmosphere  in your house. Shiv Bhojan Target Increased  In the time of  crisis, Shiv Bhojna centres across the state should feed the needy and hungry people. For this the target is increased by one lakh.  Take advantage of it but do not rush to it and endanger your health. We have given instructions to facilitate retail supply chain and home delivery smoothly.  All suggestions and instructions have been given to the Police, Revenue, Co-operation, Marketing and Labour Department.  Chief Minister Uddhav Thackeray said that the supply of goods will continue to be stable.  The police have been directed to be careful that there is no transportation of people through essential goods vehicles, tankers and containers under any circumstances. Sugar factories have been told to take care of  labourers and their families.  Remember that these workers are part of your family.  Milk collection will be in proper way Milk collection from rural areas will be in organized manner so that both farmers and consumers are not disturbed.  Large numbers of citizens from other states are trapped in the state. They are workers and labourers.  The administration will take care of them properly.  Some NGOs are coming forward to help them.  However, they too should do the work without creating rush and by planning their helping work properly.  Greater Responsibility Even on Private Doctors Private doctors also have a big responsibility.  Their role in this battle is crucial .  They should keep their clinics functioning. We have a responsibility to the safety and well-being of them and the staff.  Organize Blood Donation Camps  There is a blood shortage in the state.  I urge NGOs to organize blood donation camps but unnecessary rush must not be allowed.  As citizens, it is our responsibility to see that  any kind of law and order situation does not occur.   Stating that Shirdi Sansthan has given Rs 51 crore for the relief fund, Siddhivinayak has also offered Rs 5 crore, he said, “Corona can be cured if treatment is done on time.  However, he said there should be proper treatment.

राज्यातील २४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी; नवीन २८ रुग्णांची नोंद

एकूरुग्णसंख्या153,राज्यात करोनाचा5वा मृत्यू

मुंबई दि.27-आजराज्यातआणखी28कोविड19रुग्णांचीनोंदझालीत्यामुळेएकूण कोरोनाबाधितरुग्णांचीसंख्या153झालीआहे.यानवीनरुग्णांमध्ये इस्लामपूर सांगली मधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील15व्यक्तींचा तर नागपूर मधील काल बाधित आलेल्या रुग्णांच्या4सहवासितांचा समावेश आहे.  या शिवाय प्रत्येकी2रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर,कोल्हापूर,गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी1रुग्ण आढळला आहे तर1रुग्ण गुजरात राज्यातील आहे.  आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात65वर्षाच्या एका वृध्देचा करोना मुळे मृत्यू झाला.हा करोनामुळे झालेला राज्यातील पाचवा मृत्यू आहे.  आज मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात एका85वर्षीय डॉक्टरांचा संशयित करोना आजाराने मृत्यू झाला.त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतले आहेत.या रुग्णाला मधुमेह होता तसेच त्यांना पेसमेकरही होता.त्यांचे निदान खाजगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. 

  राज्यातीलजिल्हाआणिमनपानिहायरुग्णांचातपशीलपुढीलप्रमाणेआहे

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधितरुग्ण मृत्यू
पिंपरीचिंचवडमनपा 13
पुणेमनपा 18
मुंबई 51 4
सांगली 24
नवीमुंबई,कल्याणडोंबिवली प्रत्येकी6 1*
नागपूर 9
ठाणे 5
यवतमाळ  4
अहमदनगर          3
सातारा,पनवेल प्रत्येकी2
१० उल्हासनगर,औरंगाबाद,रत्नागिरी,वसईविरार,पुणेग्रामीण,सिंधुदुर्ग,पालघर,कोल्हापूर,गोंदिया,गुजरात प्रत्येकी1
एकूण 153 5

*मुंबईकार्यक्षेत्रातीलमृत्यू

राज्यातआजएकूण250जणविविधरुग्णालयातभरतीझालेआहेत.   18जानेवारीपासूनताप,सर्दी,खोकलाअशीलक्षणेआढळल्यानेवेगवेगळ्याविलगीकरणकक्षातआजपर्यंत3493जणांनाभरतीकरण्यातआलेआहे.आजपर्यंतभरतीकरण्यातआलेल्यापैकी3059जणांचेप्रयोगशाळानमुनेकरोनाकरतानिगेटिव्हआलेआहेततर153जणपॉझिटिव्हआलेआहेत.  आतापर्यंत22करोनाबाधितरुग्णांनातेबरेझाल्यानंतररुग्णालयातूनघरीसोडण्यातआलेआहे.सध्याराज्यात16,513व्यक्तीघरगुतीअलगीकरणातअसून1045जणसंस्थात्मकक्वारंटाईनमध्येआहेत.नवीनकरोनाविषाणूआजारप्रतिबंधवनियंत्रणपूर्वतयारीम्हणूनराज्यातसर्वजिल्हारुग्णालयेतसेचशासकीयवैद्यकीयमहाविद्यालयांमध्येविलगीकरणस्थापनकरण्यातआलेआहेत.

राज्यनियंत्रणकक्ष ०२०/२६१२७३९४  टोलफ्री  क्रमांक१०४

00000

निजी डॉक्टरों ने संवेदनशीलता के साथ अस्पतालों को शुरू करना चाहिए,

ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट इस त्रिसुत्री के तहत कोरोना पर लगाएंगे प्रतिबंध

१९ कोरोनाबाधित मरीजों को घर छोड़ा गया

                            स्वास्थ्यमंत्री राजेश टोपे ने दी जानकारी

मुंबई, दि. २७: कोरोना का संकट रहते हुए राज्य के निजी डॉक्टरों ने डर रखते हुए अस्पतालों को बंद नहीं रखना चाहिए, ऐसी स्थिति में संवेदनशीलता दिखाते हुए डॉक्टरों ने अस्पतालों को शुरू रखते हुए नागरिकों को सेवा देना चाहिए, यह सूचना करते हुए संचारबंदी के दिनों में राज्य में रक्तदान शिविर लेने के लिए जिला प्रशासन संस्थाओं को सहयोग करें। नागरिकों ने रक्तदान के लिए आगे आने का आवाहन भी स्वास्थ्यमंत्री राजेश टोपे ने आज यहाँ पर किया। उन्होंने बताया कि कोरोना के प्रतिबंध के लिए राज्य सरकार इन दिनों ट्रेसिंग, टेस्टींग और ट्रीटमेंट इस त्रिसुत्री के अनुसार काम कर रही है।

दरमियान राज्य के कोरोना बाधित मरीज़ ठीक हो रहे है और अब तक १९ मरीज़ों को घर छोड़े जाने की बात बताते हुए राज्य में इन दिनों १३५ मरीज़ निदर्शन में आने की जानकारी स्वास्थ्य मंत्री ने फेसबुक लाईव माध्यम से संवाद साधते हुए दी।

स्वास्थ्यमंत्री के संवाद के महत्वपूर्ण बिंदु इस तरह है –

•        राज्य में इन दिनों १३५ बाधित मरीज है और अब तक ४२२८ लोगों के कोरोना का परीक्षण किया गया है, उनमें से ४०१७ लोगों की परीक्षण रिपोर्ट निगेटिव आयी है, वहीं इसमें १३५ पॉझिटिव है।

•        सरकारी स्वास्थ्य सेवा के डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग एवं अन्य आपदा की सेवा के कर्मचारी अपनी जान खतरे में डालते हुए काम कर रहे है, सेवा दे रहे है। उन सभी का अभिनंदन…, सेवा दे रहे लोगों को प्रोत्साहन पर भत्ता देने के संदर्भ में भी राज्य सरकर विचार कर रही है।

•        कोरोना के व्यक्तिरिक्त अन्य बीमारी के इलाज के लिए निजी अस्पतालों का शुरू रहना जरूरी है। गर्भवती महिलाएं, छोटे बच्चों की बीमारी, हृदयविकार के मरीजों को भी समय पर ही इलाज की आवश्यकता है। इससे राज्यभर के निजी डॉक्टरों ने अस्पताल शुरू रखना चाहिए। कोरोना के डर में अपने अस्पतालों को बंद न रखे। संचारबंदी के दिनों में पुलिस की ओर से आवश्यक वह सहयोग किया जाएगा।

•        राज्य में इन दिनों खून की कमी हो रही है। खून का संग्रहण अधिक समय तक नहीं किया जा सकता। कोविड कोरोना के मरीजों के लिए नहीं, बल्कि कई चिकित्सक इलाज में, हिमोफेलीया के मरीज़ों के लिए भी खून की आवश्यकता होती है। ऐसे में सामाजिक संस्थाओं ने संचारबंदी के दिनों में सूचनाओं का पालन करते हुए रक्तदान शिविरों का आयोजन करना चाहिए। जिला प्रशासन ने उन्हें सहयोग करने के निर्देश भी दिए गए है। रक्तदान शिविर का आयोजन करते समय सोशल डिस्टंसिंग रखने का आवाहन भी किया गया है।

•        जिनकी प्रतिकार शक्ति अच्छी है और इलाज़ का व्यवस्थापन योग्य पद्धति से किया जा रहा है, ऐसे कोरोना बाधित मरीज ठीक हो रहे है।

•        बाधित मरीजों से करीबी व्यक्ति को संक्रमन होने का खतरा बना रहता है, इस बात को ध्यान में रखते हुए राज्य सरकार इन दिनों ऐसे व्यक्तियों के ट्रेसींग के बाद उनकी टेस्टींग और ट्रीटमेंट यानि की जांच, परीक्षण और इलाज इन त्रिसुत्री के तहत काम कर रही है।

•        नागरिकों ने सोशल डिस्टंसिंग का नियम नहीं तोड़ना चाहिए। सर्वदलीय कार्यकर्ता, सामाजिक संगठना, मंडल के कार्यकर्ताओं ने जरूरतमंदों को घरतक सेवा देने के लिए आगे आना चाहिए।

०००

राष्ट्रपतींची राज्यपालांशी कोरोनाबाबत चर्चा; राज्यपाल कोश्यारी मुंबई येथून सहभागी

 मुंबई दि.२७ –राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांसह कोरोना व्हायरस आजारासंबंधी विविध विषयांवर देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल,नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथून चर्चेत सहभाग घेतला. 0000

President, Vice President interact with Governors on COVID-19; Governor Koshyari joins from Mumbai

President of India Ram Nath Kovind alongwith Vice President M Venkaiah Naidu interacted with Governors, Lt. Governors and Administrators of all States and Union Territories regarding various issues relating to COVID –19 on Friday (27th). Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari participated in the interaction conducted through video conferencing.

ताज्या बातम्या

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...

‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून

0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....

विधानसभा लक्षवेधी 

0
डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई - मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. १: डहाणू तालुक्यातील सुकड आंबा शिरसून पाडा येथे जलजीवन...