मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1700

दि.२५ मार्च २०२० ची सुधारित अधिसूचना : राज्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

त्यावश्यक वस्तू  सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट

मुंबई, दि. 25 : कोविड 19 (कोरोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणूनकेंद्र सरकारच्या निर्देशानुसारसंपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020 पर्यंतलॉकडाऊनकरण्याचीअधिसूचनाशासनामार्फत जारी करण्यात आली आहे.

या कालावधीतराज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील.सर्व शैक्षणिक, प्रशिक्षण, संशोधन आणि मार्गदर्शक संस्था बंद राहतील.अत्यावश्यक वस्तूवसेवापुरविणाऱ्यादुकानेआणिआस्थापनायांनापुढीलनिर्बंधातूनसूटदेण्यातआलीआहे.

·     पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन आणि अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि कारागृह, मंत्रालय, जिल्हा प्रशासन, लेखा व कोषागार, वीज, पाणी आणि स्वच्छता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा व स्वच्छता याच्याशी संबंधित कर्मचारी, वाणिज्य दूतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासन या कार्यालयांमधील अत्यावश्यक सेवा.

·     मंत्रालय,शासकीयकार्यालयेतसेचसुरूठेवण्यातयेणारीदुकानेआणिआस्थापनायांनीकिमानकर्मचारीवर्गअसण्याचीआणिपरस्परांपासूनकिमानअंतरराखण्याची(जसेचेकआऊटकाउंटरवरतीनफुटाचेअंतरराखण्यासाठीजमिनीवरखुणाकरणे)दक्षताघ्यावी.त्याचबरोबर स्वच्छता राखली जाईल याचीही दक्षता घ्यावी.

·     इतर कार्यालये वर्क फ्रॉम होम सुरू ठेवू शकतील. अधिकारी आणि कर्मचारी यांनी आकस्मिक सेवेसाठी ऑन कॉल उपस्थित राहावे.

·     अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

·     एसटीमहामंडळाच्याबसेसआणिमेट्रोयांसहएकाशहरातूनदुसऱ्याशहरालाजोडणाऱ्यासर्वसार्वजनिकवाहतूकसेवाबंदअसतील. चालकाव्यतिरिक्तअन्यदोनव्यक्तींसाठीटॅक्सीतरएकाप्रवाशासहऑटोरिक्षायांनाअधिसूचनेतनमूदकेलेल्याकारणांसाठीवाहतूककरतायेईल.अत्यावश्यकवैद्यकीयसेवेसाठीप्रवासीवाहतूककरण्यासअधिसूचनेतमान्यतादेण्यातआलीआहे.अत्यावश्यकवस्तू,आरोग्यसेवाआणियाअधिसूचनेतनमूदकरण्यातआलेल्याबाबीयांकरितावाहनचालकांव्यतिरिक्तएकाव्यक्तीलाखासगीवाहनउपयोगातआणतायेईल.

·     रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक.

·     टेलिकम्युनिकेशन,इंटरनेट,डेटासेवायांसहमाहितीतंत्रज्ञानआणिमाहितीतंत्रज्ञानसेवा.

·     शीतगृहे आणिकोठारगृहांची सेवा.

·     मुद्रितआणिइलेक्ट्रॉनिकमाध्यमे.

·     अत्यावश्यकवस्तूंचीपुरवठासाखळीआणिवाहतूक.

·     शेतमालआणिअन्यवस्तूंचीनिर्यातआणिआयात.

·     खाद्यपदार्थ,औषधेआणिवैद्यकीयउपकरणेयांसहअत्यावश्यकवस्तूंचेई-कॉमर्सद्वारेवितरण.

·     पेट्रोलपंप,एलपीजीगॅस, ऑईलएजन्सीजत्यांचीसाठवणआणित्यांच्याशीसंबंधितवाहतूकव्यवस्था

·     अत्यावश्यकसेवांकरिताखासगीसंस्थांमार्फतपुरविल्याजाणाऱ्यासुरक्षासेवेसहअन्यसेवादेणाऱ्यासंस्था.

·     टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा.

·     पावसाळ्यापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे.

·     किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा  (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्युअल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या.

·     बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ, कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा.

·     वीज निर्मिती, वहन आणि वितरण केंद्र आणि सेवा.

·     शिधावाटप आणि इतर अत्यावश्यक खाद्य पदार्थांच्या दुकानांसहबेकरीआणिपाळीवप्राण्यांसाठीचेखाद्यपदार्थआणिपशुवैद्यकीयसेवा.

·     व्यावसायिकआस्थापने,कार्यालये,कारखाने,कार्यशाळा,गोदामेआदींसहसर्वदुकानांचेव्यवहारबंदअसतील.तथापि,वस्तूंचीनिर्मितीकरणाऱेवप्रक्रियासातत्य(कंट्युनिअसप्रोसेस)आवश्यकअसलेलेकारखाने,औषधविक्रीआदीसुरूठेवण्यासपरवानगीअसेल.

·     अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणे तसेच आग, कायदा व सुव्यवस्था आदींव्यतिरिक्त हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

·     तत्वतःवरीलसर्वनिर्बंध,लोकांच्यावाहतुकीवरनिर्बंधघालण्यासाठीआहेत.वस्तूंच्यादळण-वळणावरनिर्बंधघालण्यासाठीनाहीत,हेसर्वअंमलबजावणीकार्यालयांनीलक्षातघ्यावे,असेहीअधिसूचनेतम्हटलेआहे.

·     कोणत्याही संप्रदायांची सर्व धार्मिक स्थळेलोकांसाठीबंदराहतील.

·     लोक एकत्र जमतील अशा सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी राहील.

·     आदरातिथ्याशी संबंधित सेवा स्थगित राहतील. तथापि, बंदी (लॉकडाऊन) मुळे अडकलेले पर्यटक, व्यक्ती, वैद्यकीय, अत्यावश्यक व आणिबाणीच्या सेवेतील कर्मचारी, हवाई आणि सागरी सेवेतील व्यक्तींच्या राहण्यासाठी उपयोगात आणले जाणारे हॉटेल्स, होम स्टे, लॉजेस आणि मॉटेल्स यांना व विलगीकरण (कॉरंटाईन) साठी वापरण्यात येणाऱ्या वास्तू (इस्टॅब्लीशमेंट) यांना यातून सूट देण्यात आली आहे.

·     अंत्यविधीसारख्या प्रसंगी वीस पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी दिली जाणार नाही.

·     बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तुंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही,यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.

·     कोविड-19च्या रूग्णांना योग्य त्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व  खाजगी आणि शासकीय रूग्णालयातील वैकल्पिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतील.

·     गरज भासल्यास,आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी,सर्व विभागीय आयुक्त,महानगर पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना रूग्णालयाच्या आसपास उपलब्ध जागांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

·     15 फेब्रुवारी नंतर भारतात आलेल्या आणिविलगीकरणातराहण्याचानिर्देशदेण्यातआलेल्याप्रत्येकव्यक्तीनेयानिर्देशांचेपालनकरणेआवश्यकआहे.अन्यथात्यांच्यावरदंडात्मककारवाईकरण्यातयेईलआणित्यालाशासकीयविलगीकरणव्यवस्थेतस्थलांतरितकेलेजाईल.

·     सर्वरहिवाशांनीघरातचथांबावे.केवळपरवानगी देण्यात आलेल्या कारणांसाठीच  त्यांनाबाहेरपडतायेईल.तथापि,बाहेरपडल्यानंतरत्यांनापरस्परांपासूनकिमानअंतरराखण्याचादंडकपाळणेआवश्यकअसेल.तसेच संबंधित संस्था/ कर्मचारी यांनी कोविड 19 संबंधी आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक राहील.

·     सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक , पोलीस आयुक्त  महानगरपालिकांचे आयुक्त आणि इतर  संबंधित संस्था, आस्थापना यांचे सक्षम प्राधिकारी यांना, मानवीय व न्यायपूर्ण पद्धतीने वरील सर्व उपाययोजना  व तरतूद यांचीअंमलबजावणी करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत.

·     कोणतीही व्यक्ती, संस्था या तरतुदींचा भंग करतील त्यांच्यावर साथ रोग कायदा – 1897 , आपत्ती व्यवस्थापना कायदा – 2005 आणि इतर कायदे व विनियमने यानुसार कार्यवाही करण्यात येईल अथवा सद्हेतुने कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध वा तसा हेतू असणाऱ्या व्यक्तींविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.

·     अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असल्याचे संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात येईल.

·     उपरोक्त निर्देशांचे पालन होण्याकरिता जेव्हा कधी आवश्यकता भासेल तेव्हा जिल्हा न्यायाधीश कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक करतील.

·     दवाखान्यांच्या पायाभूत सुविधा तसेच विस्तारीकरणाच्या कामासाठी होणाऱ्या साधनसामग्रीच्या वाहतुकीमध्ये बाधा येणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी.

·     अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता संबंधित जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्यांनी घ्यावी.

·     या आधी वेगवेगळ्या प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आदेश हे या आदेशांशी सुसंगती राखून अंमलबजावणी संस्था लागू करतील.

मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

दादर,भायखळा भाजीपाला मार्केट सुरू;नागरिकांना दिलासा

मुंबई,दि.25:-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहे. मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी आज मुंबईतील दादर आणि भायखळा मार्केट सुरू करण्यात आले असून उद्यापासून वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला,अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात असून आज मुंबईतील दादर व भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. तसेच उद्यापासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील  सर्व कामकाज नियमित करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार आहे.

भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना अडवू नये

शासनाच्या वतीने भाजीपाला,अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात येत असून भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना पोलिसांनी अडवू नये त्यांना मार्गस्थ करण्यात यावे असे आदेश श्री. भुजबळ यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी मुंबई व नाशिक पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून माल घेऊन जाणारी आणि त्यानंतर परतणारी रिकामे वाहने पोलिसांनी तात्काळ सोडावी असे आदेश दिले आहेत. शेतकरी व भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करून द्यावा असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले आहे.

अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई,दि.24 :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे कार्य होणे शक्य नाही. यास्तव शासनाला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मी सर्व नागरिकांना करीत आहे.

गुढी पाडव्याचा मंगल सण आपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. ‘घरी राहा आणि सुरक्षित राहा ! नवे वर्ष सर्वांकरिता सुख, समाधान,आरोग्य व संपन्नता घेऊन येवो’ अशा सर्वांना शुभेच्छा देतो. युगादि, चेती चाँद तसेच संवर पाडवो निमित्‍ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

000

Greetings to people on Gudhi Padwa, New Year

Governor appeals to people to celebrate Gudhi Padwa staying at home

Governor Bhagat Singh Koshyari has appealed to the people to celebrate Gudhi Padwa and welcome New Year staying at home in view of the unprecedented situation prevailing in the state and the country.

“Even as we are readying to celebrate Gudhi Padwa and welcome the New Year, the State is passing through an unprecedented situation. The Government is doing all that is required to tackle the situation. However the success of the efforts by the government depends on the complete cooperation from the people. I therefore appeal to the people to extend full cooperation to the Government in tackling the situation.”

“Stay at home and be safe !  May the New Year bring happiness, contentment, good health and prosperity to all. I also take this opportunity to extend my warm greetings to the people on Ugadi, Cheti Chand and Samsar Padvo,” Governor Koshyari has said in his message.

000

‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

‘कोरोना’ संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी उत्साह राखून ठेवा

मुंबई,दि. 24 :-  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा. कुणीही घराबाहेर पडू नये. रस्त्यावर येऊ नये. गर्दी टाळावी,असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा,असेही आवाहन त्यांनी  केले आहे.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन,शोभायात्रांचं आयोजन करुन सामूहिक पद्धतीने करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील,परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामूहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी यंदा ‘कोरोना’विरोधात लढण्याची,जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी,असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

अखंडित वीजपुरवठ्यामुळेच जनतेला घरात थांबविणे शक्य – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

ऊर्जामंत्र्यांनी केले वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

मुंबई, दि. 24 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स,नर्सेस व पोलीस कर्मचारी यांचे नागरिकांकडून कौतुक होत असताना वीज पुरवठा करणारे वीज क्षेत्रातील इंजिनिअर्स,तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी व अधिकारी यांचेही योगदान प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे,असे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. वीज कंपन्यांनी अखंडित वीजपुरवठा केल्यामुळेच सरकारला जनतेला घरात थांबविणे शक्य झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या कामगिरीबद्दल ऊर्जामंत्र्यांनी महावितरण,महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तोंडभरुन कौतुक करत वीज कर्मचारी प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे.

कोरोना आजाराचे उपचार करणारे डॉक्टर्स व नर्सेस यांना या आजाराची लागण झाल्याच्या घटना चीन व इतर देशात घडल्यामुळे आरोग्य सेवेच्या क्षेत्रात धोके असल्याची जाणीव आपल्याला आहे. परंतु वीज क्षेत्रात वीज पुरवठा सुरळीत ठेवणारे कर्मचारी हे रोजच जोखीम पत्करून वीज पुरवठा सुरळीत ठेवतात. बऱ्याच वेळा वीज अपघातांना त्यांना सामोरे जावे लागते. अपघातामुळे जीव जाणे व अपंगत्व येण्याचा घटना घडत असतात. आपल्या घरातील वीज गेली की आपण अस्वस्थ होतो. परंतु वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र,ऊन-पाऊस व थंडीत खांबांवर चढून काम करणे सोपे नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी आपण सगळे आज घरात बसले आहोत. परंतु यावेळी घराबाहेर जाऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम किती जोखमीचे आहे,याची जाणीव त्यांना असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात कलम144लागू झाले असून बाजारपेठा व कार्यालये बंद झाली आहेत. कामासाठी कार्यालयात जाता येत नसल्याने ‘वर्क फ्रॉम होम’साठी वीजपुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे. तो सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण विशेष खबरदारी घेत आहे. यासाठी महावितरणद्वारे नियोजन करण्यात आलेले आहे.

गरजेनुसार वीजेचा पुरवठा करण्यासाठी महानिर्मितीच्या वेगवेगळ्या वीज निर्मिती केंद्रात इंजिनिअर्स आणि कामगार यांनी योग्य प्रकारचे नियोजन केले असून वीजचे उत्पादन करीत आहेत. तसेच वीज केंद्रात निर्माण झालेल्या वीजेचे पारेषण करून महावितरणच्या वीज उपकेंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम महापारेषणद्वारे उत्तमरित्या पार पाडत असल्याने आज आपण घरबसल्या कामे करू शकतो,अशी भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे.

000

डॉ. राजू पाटोदकर/वि.सं.अ./24/03/2020

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आता एसटीची लालपरी आणि बेस्ट बसेस

मुंबई, दि. 24 : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यातील संचार बंदी घालण्यात आली असून,मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दळणवळणाची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने एसटी महामंडळ व बेस्ट प्रशासनाला अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्देशानुसार एसटीने मंत्रांलयीन कर्मचाऱ्यांची ने – आण करण्यासाठी मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली व कल्याण(सकाळी ८:००,८:१५) येथून तसेच पश्‍चिम रेल्वेमार्गावरील नालासोपारा व विरार (सकाळी ७:००,७:१५) येथून थेट मंत्रालयासाठी बसेसची सोय केली आहे.तसेच बेस्ट मार्फत…. बोरीवली स्टेशन -मंत्रालय (८:००,८:३०),शासकीय वसाहत बांद्रा- मंत्रालय(८:३०,९:००) पनवेल एसटी स्टँड -मंत्रालय (७:३०,८:३०)ठाणे कॅडबरी जंक्शन- मंत्रालय (८:००,८:३०)डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर- मंत्रालय(८:३०,९:००) विक्रोळी डेपो- मंत्रालय(८:३०,९:००)पि.के.खुराणा चौक वरळी-मंत्रालय(८:४५,९:००) येथून बसेस सुटतील.

याबरोबरच बृहन्मुंबई महापालिका,शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर,परिचारिका,औषध दुकानदार,पोलीस,विविध बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी इत्यादी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल,पालघर,आसनगाव,विरार, कल्याण,बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली,वाशी दादर व ठाणे (खोपट)या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत (तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.) एसटीच्या बसेस दर ५ मिनिटांला या प्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.

या बसेस 1. डोंबिवली-ठाणे,2. पनवेल-दादर,3. पालघर-बोरिवली,4. विरार- बोरिवली,           5. टिटवाळा-ठाणे, 6. आसनगाव- ठाणे,7. कल्याण- ठाणे,8. कल्याण-दादर,9 बदलापूर-ठाणे,          10. नालासोपारा-बोरिवली या मार्गावर धावत आहेत.

त्याबरोबरच अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाशी,ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी ” बेस्ट” बसेसची सेवा एसटीच्या बसेसना पूरक पद्धतीने जोडण्यात आली आहे.

000

जनसंपर्क अधिकारी

एसटी महामंडळ

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा; सुरक्षितता आणि आरोग्याची गुढी उभारण्याचे आवाहन

मुंबई, दि.24:उद्या हिंदु नव वर्षाचा प्रारंभ होत असून या दिवशी घरोघरी आरोग्याची आणि सुरक्षिततेची गुढी उभारली जावी. संयम,स्वयंशिस्त आणि सहकार्यातून संकटावर मात करण्याची जिद्द मनात बाळगावी. यातून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्ताने करावा,असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेतले तर दुष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळवलेल्या विजयाचा हा दिवस असल्याचे दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,यश आणि विजयाचे प्रतीक असलेली ही गुढी त्यामुळेच उंच उभारली जाते. हे संकल्पाच्या सिद्धीचेही प्रतीक आहे. यातून प्रेरणा घेऊन आपणही‘कोरोना’रुपी संकटावर मात करू,गर्दी न करता घरगुती स्वरूपात हा उत्सव साजरा करू. आपण सर्वजण सहकार्य करत आहातच,यापुढेही शासनाच्या उपाययोजनांना कृतिशील साथ द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’ गुढीपाडव्यानिमित्त संकल्प करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

सर्वधर्मगुरूंनीआरोग्यदूतबनून जनजागृती करावी

मुंबई, दि. 24 : कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत. या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्वधर्मगुरूंनी आरोग्यदूतबनून जनजागृती करावी, असे आवाहन करतानाच राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’, असा संकल्प करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनता आणि माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला.

आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात आतापर्यंत 107 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे 15 रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत, ही समाधानाची बाब आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडताहेत, ही गंभीर बाब आहे. राज्य शासनाच्या सूचनांचं पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

      

सध्या मुंबई, पुण्याहून मुळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र अशा लोकांना गावी प्रवेश दिला जात नाही आहे. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या त्यांना अडवू नका, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. बाधीत रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागतानाच माणुसकी सोडून नका असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

      

उद्या असलेल्या गुढी पाडव्याच्या सणानिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच नववर्षांची सुरूवात कोरोनाला दूर सारण्याच्या दृढ निश्चयाने करा. या विषाणूवर विजय मिळविण्याचा संकल्प करा. स्वयंशिस्त पाळून घरी थांबा, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी (ओपीडी) बंद ठेवली आहे. वास्तविक संचारबंदीतून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नये, असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले.

000

अजय जाधव/वि.सं.अ./24.03.2020

विदर्भातील धान खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ – अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा..

मुंबई, दि.24 : विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी 31 मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ही मुदत 31 मे पर्यंत वाढवून देण्यास केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या मुदतीमुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

      

विदर्भात यंदाच्या वर्षी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. त्याचप्रमाणे राज्य शासनाने धानासाठी 1800 रुपये हमीभाव आणि त्यावर 700 रुपये बोनस दिला. शासकीय खरेदी केंद्रावर चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडे पाठ फिरवली होती. शेतकरी मोठ्या प्रमाणात धान शासनाच्या खरेदी केंद्रावर घेऊन येत होते. मात्र कोरोनामुळे त्यांची गैरसोय झाली होती.

शासनाकडून सुरू असलेली धान खरेदी दि. 31 मार्च 2020 पर्यंत सुरू राहणार होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान उपलब्ध असल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही मुदत अधिक वाढवून मिळावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडून धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे मागणी केली होती.

      

त्यानुसार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत विदर्भातील धान खरेदीसाठी 31 मार्च पर्यंत असलेली मुदत दोन महिन्यांनी वाढवून देत ती 31 मे पर्यंत सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे श्री. भुजबळ यांनी खासदार शदर पवार व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आभार मानले आहे.

000

दत्ता कोकरे/वि.सं.अ./24.03.2020

धुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोटनिवडणूक पुढे ढकलली

 मुंबई दि. 24:  सध्या कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने आज याबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे या पोटनिवडणुकीला मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी  भारत निवडणूक आयोगाकडे पाठवला होता.  या प्रस्तावाच्या अनुषंगाने  ही पोट निवडणूक ही अधिसूचना निर्गमित झाल्यापासून 60 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

000

ताज्या बातम्या

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज

0
नवी दिल्ली, दि. ३०: राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र...

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय...

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार – मुख्य सचिव राजेश कुमार

0
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम...

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...