मंगळवार, जुलै 15, 2025
Home Blog Page 1784

राजधानीत वारली चित्रांचे अनोखे प्रदर्शन

नवी दिल्ली, दि. 11 : कला साधनेतून वारली या आदिवासींच्या समृध्द कलेला कॅनवासवर चित्रित करणारे अहमदनगर येथील चित्रकार अरविंद कुडिया यांच्या वारली चित्रांचे अनोखे प्रदर्शन राजधानी दिल्लीत देश-विदेशातील कला रसिकांचे आकर्षण ठरत आहे.

पालघर, मुरबाड, जव्हार भागातील आदिवासींच्या समृध्द सांस्कृतिक वैभवाचा गेल्या 22 वर्षांपासून अभ्यास करणारे अरविंद कुडिया यांनी प्रथमच वारली या लहान आकारातील चित्रांसाठी प्रसिध्द असलेल्या कलेला भव्य आकारात प्रदर्शित करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. येथील मंडीहाऊस परिसरात स्थित ललित कला अकादमीच्या कला दालनात ही प्रदर्शनी लावण्यात आली असून 6X6 ते 7X17 फूट अशा भव्य आकारातील तब्बल 12 चित्र याठिकाणी प्रदर्शन व विक्रीसाठी आहेत.

चित्रांच्या वैशिष्ट्यांवर दृष्टीक्षेप

या प्रदर्शनीच्या दर्शनी भागात ‘कुलदेवी’ ही आदिवासींची ग्रामदेवता या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित कलाकृती कला रसिकांना आकर्षीत करते. 6X6 फूट आकारातील या कलाकृतीमध्ये देवीची पूजा करण्यासाठी जाणारे आदिवासी, वारली जीवनशैली तसेच आदिवासी लोकं मुंगींची पूजा करतानाचा प्रसंग दर्शविला आहे.

‘वारली पाडा’ या 6X6 फूट आकाराच्या कलाकृतीत पालघाट येथील आदिवसींची कुलदेवता दर्शविण्यात आली आहे. देवचौक आणि त्यात चंद्र-सूर्य, धान्याची कोठी, तारपा आदी प्रतिक शोभून दिसतात. पावासामुळे आदिवासींच्या जीवनात आलेली समृध्दी विविध प्रतिकांच्या प्रभावी वापरातून या कलाकृतीमध्ये दर्शविण्यात आली आहे.

‘ध्यान’ ही मध्यवर्ती कल्पना मांडणारी 6X6 फुटाची कलाकृती ‘शून्यातून शून्याकडे’ जाण्याचा आध्यात्मिक प्रवास दर्शविते. या कलाकृतीत भगावान गौतम बुध्दांच्या ध्यानावस्थेतील 5 प्रतिमा बोलक्या आहेत. त्राटक ध्यानाच्या सकारात्मक वलयाने आदिवासी परिसर वेढल्याचा संदेश श्री. कुडिया यांनी या कलाकृतीत कौशल्याने मांडला आहे.

या प्रदर्शनीत 7X17 फुटांच्या भव्य तीन कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. ‘तारपा नृत्य’या कलाकृतीत आदिवासींचे पारंपरिक तारपानृत्य, त्याचे आदिवासींच्या जीवनातील महत्त्व लग्नप्रसंगी आणि भाताचे चांगले पीक झाल्यावर व्यक्त होणारा आनंद आदी प्रसंगांच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. ‘कृष्णलिला’ आणि ‘कल्पवृक्ष’ या भव्य कलाकृतींमध्ये भगवान  कृष्णाच्या कालिया मर्दन, पुतनावध आदी 10 प्रसंग आणि मोठ्या कल्पवृक्षाखाली ध्यानावस्थेत बसलेली व्यक्ती दर्शविली आहे.

याशिवाय भगवान गौतम बुध्दांच्या जन्मापासून ते बुध्दत्वापर्यंतचा प्रवास दर्शविणारी ‘बुध्द’ ही कलाकृती, समृध्द वारली परंपरेतून संन्यस्थाचा प्रवास दर्शविणारी ‘अंतस’ ही कलाकृती, ‘गोवर्धन’ ही भगवान कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग कलात्मकरित्या मांडणारी कलाकृती या ठिकाणी कलारसिकांचे आकर्षण ठरत आहेत. ही सर्व चित्र ॲक्रालिक रंगांची असून कॅनव्हासवर चित्रित करण्यात आली आहेत.

नाशिक येथील मंजू चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन

ललित कला अकादमीच्याच कला दालनात नाशिक येथील श्रीमती मंजू चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन पहावयास मिळते. महाराष्ट्राची संस्कृती या मध्यवर्ती कल्पनेवर आधारीत  1X1.5 फूट ते 3 X4 फूट आकारातील एकूण 37 चित्र या ठिकाणी प्रदर्शीत करण्यात आली आहेत. यात वाडासंस्कृती, लोकजीवन, नागरी जीवन, लेण्या, मंदिर आदींचा समावेश आहे.

ही प्रदर्शनी 13 डिसेंबर 2019 पर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध राहणार आहे.

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.266/  दिनांक  ११.१२.२०१९

ओबीसी, धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. 11 : राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील समाजाने आपले प्रश्न योग्य व न्यायिक मार्गाने सोडवावेत. समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिष्टमंडळाला दिला.

ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळाने यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. याप्रसंगी मंत्री सुभाष देसाई, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाश शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी आणि धनगर समाजाने प्रथम एकत्र येऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. केवळ रस्त्यावर येऊन आंदोलन करुन प्रश्न सुटणार नाही तर आपले प्रश्न सनदशीर मार्गाने सुटतील, असा विश्वास त्यांनी शिष्टमंडळाला दिला.

यावेळी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अपघात व अपघाती मृत्यू टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे आवाहन

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी ‘हायवे मॅनर्स’ अभियानाचा आरंभ

मुंबई, दि. 11 : राज्यातील महामार्गावरील अपघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महामार्ग हायवे पोलीस आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हायवे मॅनर्स’ (महामार्ग सुरक्षा) अभियान राबवित असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर यांनी दिली.

महामार्ग पोलीस आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने पिपल वॉलनेट ही संस्था रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत यासाठी ‘#हायवे मॅनर्स’ हे अभियान राबविणार आहे. या अभियानाचा आरंभपर कार्यक्रमाचे आयोजन आज मुंबई येथील पोलीस जिमखान्यात करण्यात आले होते. यावेळी श्री.कारगांवकर बोलत होते.

श्री. कारगांवकर म्हणाले, महामार्गावरील अपघातात मृत्यु होणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वात अधिक आहे. भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून, देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ मानवी चुकांमुळे महामार्गावर 83 टक्के अपघात होत आहे. हे प्रमाण कमी करता यावे यासाठी महामार्ग पोलीस आणि इंडियन ऑइल यांच्या पुढाकाराने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभर शाश्वत असे‘#हायवे मॅनर’अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री.कारगांवकर यांनी यावेळी दिली.

हे अभियान मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई – गोवा हायवे येथे पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. दुचाकी, व्यावसायिक वाहन, बस, कृषी सामानांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहनचालकांमध्ये हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करणे, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वेग मर्यादा, जड वाहनांना शहरातून दिवसा बंदी, ट्रान्सपोर्टचे वाहन आणि शेतकऱ्यांच्या वाहनांना परावर्तक इत्यादी संदर्भात वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी होर्डिंग, बॅनर, पेट्रोल पंप येथे माहितीपत्रक, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, वॉलपेंटींग, स्टँडीज, सोशल मीडिया याद्वारे अभियानाची प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती श्री.कारगांवकर यांनी दिली.

श्री. डाकवले म्हणाले, ‘इंडियन ऑइल’ अतिशय ज्वलनशिल पदार्थांची वाहतूक करते. यामुळे वाहन चालकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून आणि नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून, हे अभियान लोकचळवळ झाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.पाटील म्हणाले, रस्ते अपघात वेगमर्यादा न पाळणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे यामुळे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निष्कर्षास आले आहे. राज्यात 2018 मध्ये रस्ते अपघातात साधारण 13 हजार 261 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर, दर दिवशी साधारण 36 लोक याप्रमाणे दोन तासात तीन लोकांचा मृत्यू होत असल्याचे प्रमाण आहे. सर्वात जास्त नाशिक, धुळे, पालघर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि त्यानंतर वर्धा या जिल्ह्यात अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे 36 टक्के आणि राज्य महामार्गावर 33 टक्के प्रमाण आहे. जर प्रवाशांनी सीट बेल्ट वापरले तर 40 ते 65 टक्के अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. हेल्मेटचा वापर केल्यास 40 टक्के अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक (मुख्यालय) विजय पाटील, इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक सुबोध डाकवले, महाव्यवस्थापक (ब्रँडींग) संदीप शर्मा, प्रभारी मुरली श्रीनिवास, ठाणे प्रादेशिकचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, मिलिंद मोहीते, संजय शिंत्रे आदीसह अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील रस्ते अपघात- 2018 या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. ‘#हायवे मॅनर’अभियानाच्या ॲपद्वारे नागरिकांना रूग्णवाहिका, रूग्णालय, ट्रॅफिक आदींची माहिती करून घेता येणार आहे. यावेळी वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात उपस्थिताना शपथ देण्यात आली.

०००

श्रद्धा मेश्राम/11.12.19

उद्योगात देशाला अग्रस्थानी पोहचविण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचेही योगदान महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशनचा वर्धापन दिन

मुंबई, दि. 11 : उद्योग क्षेत्रात देशाची प्रगती होत आहे, पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जगात या क्षेत्रात आपल्या देशाला अग्रस्थान मिळविण्यासाठी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सांगितले. ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आयमा असोसिएशनचे. डॉ. अविनाश दलाल, जयेश बारोट, प्रा. शिवा प्रसाद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, प्राचिन काळापासून आपल्या देशात उद्यमशिलतेला महत्त्व देण्यात आले आहे. युक्ती, बुद्धी आणि परिश्रम यांची सांगड घालूनच कोणत्याही उद्योगात यश संपादन करता येते . देशाच्या एकूण सकल उत्पादनात तीस टक्के वाटा हा एमएसएमई उद्योगांचा आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाअभावी बरेच एमएसएमई उद्योग हे बॅंकेचे कर्ज परतफेड न करता आल्याने नॉन परफॉर्मिंग सेट होतात. अशा बंद पडलेल्या छोट्या उद्योगांमुळे राष्ट्राचीही हानी होते. यावर या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी विचार विनिमय करून तोडगा सुचवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सवलतींचा लाभ घेत असतानाच वीज, पाणी यासारख्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे हे प्रत्येक उद्योजकाचे कर्तव्य असल्याचे श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना एकाच छत्राखाली आणून सर्वांच्या औद्योगिक उन्नतीसाठी ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशन ही संस्था कार्य करते. यंदा या संस्थेला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी उद्योग क्षेत्रातील काही मान्यवरांना संस्थेचे मानद सदस्यत्व देऊन सन्मानित करण्यात आले.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/11.12.19

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 10 : शेतकरी हितासाठी अविरत संघर्ष करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असताना ते शेतकऱ्यांना योग्य न्याय देतील, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केला.

विधानभवन येथे आज मुंबई दौऱ्यावर असलेल्या श्री.गेहलोत यांचे विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. गहलोत यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल श्री.पटोले यांचे अभिनंदन केले.

यावेळी राजस्थान सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्री.गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने काम करीत आहे त्यासंदर्भात श्री.पटोले यांनी माहिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ.सतिश गवई आणि विधिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

राजस्थान के मुख्यमंत्री अशोक गहलोत की

विधानसभा अध्यक्ष से सदिच्छा भेट

मुंबई, दि. 10 : किसानों के लाभ के लिए निरंतर संघर्ष करना नाना पटोले के स्वभाव में है, वे विधानसभा अध्यक्ष की जिम्मेदारी निभाते हुए किसानों को उचित न्याय देंगे, ऐसा राजस्थान के मुख्यमंत्री अशोक गहलोत ने विश्वास व्यक्त किया है।

आज विधान भवन में मुंबई दौरे पर आए श्री. गहलोत का विधानसभा अध्यक्ष ने  पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। श्री. गहलोत ने श्री पटोले को विधानसभा अध्यक्ष चुने जाने पर बधाई दी।

इस दौरान श्री पटोले ने किसानों की समस्याओं को हल करने के लिए श्री गहलोत के नेतृत्व में राजस्थान सरकार के काम करने के तरीके के बारे में जानकारी ली। साथ ही किसानों की स्थिति पर भी चर्चा की। इस अवसर पर पूर्व विधायक कैप्टन अभिजीत अडसुल, विधानमंडल सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र लोक सेवा आयोग के अध्यक्ष डॉ. सतीश गवई और विधीमंडल अधिकारी उपस्थित थे।

००००

 

Rajasthan CM Ashok Gehlot visited the Assembly Speaker

Mumbai, date. 10th: Rajasthan CM Ashok Gehlot expressed his belief that Assembly Speaker Nana Patole will give justice to the farmers as fighting for farmers’ cause is his innate nature.

Shri. Gehlot is on Mumbai visit today. Assembly Speaker welcomed Shri. Gehlot at Vidhan Bhavan with a flower bouquet. Shri. Gehlot congratulated Shri. Patole on being appointed as the Assembly Speaker.

Shri. Patole took information about the methodology Rajasthan government under the leadership of Shri. Gehlot is using to solve farmers problems.  They also discussed about the situation of farmers. Former MLA Captain Abhijit Adsul, Legislature Secretary Rajendra Bhagwat, President of MPSC Dr. Satish Gawai, and legislature office-bearers were present at that time.

0000

फिरते पोटविकार केंद्र राज्यातील गरीब, गरजू रूग्णांना मोफत अद्ययावत सेवा देईल – मुख्यमंत्री

एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स– भारतातील पहिल्या फिरत्या पोटविकार केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 10 : पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार मोफत देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विधानमंडळाच्या प्रांगणात आज महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट ऑफ डायजेस्टीव्ह सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पद्मश्री डॉ.अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेले एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सकेंद्र हे भारतातील पहिले केंद्र असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. संपूर्ण राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब, गरजूंना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी हे फिरते वैद्यकीय केंद्र महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे.

समाजाचे आपण देणेलागतो, त्यासाठी काहीतरी केले पाहिजे. या विचाराने सुरू झालेली ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. या फिरत्या केंद्रात अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आहे. या गाडीत उपस्थित असणारे 2 तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशिअन रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील. एच-पायलोरी, कॅन्सरचं लवकर निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचं निदान, ॲसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल. रूग्णांच्या आजाराचे निदान तात्काळ व्हावे आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा त्यांना मोफत मिळाव्यात या दृष्टीने एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स‘ची सुरूवात करण्यात आली असून वर्षभर ही व्हॅन राज्यभर फिरणार असल्याचे डॉ.मायदेव यांनी सांगितले.

ही सुविधा चालू करण्यासाठी श्री नरेंद्र कुमार बलदोटा व परिवार यांनी यासाठी देणगी देऊन पुढाकार घेतला आहे. या केंद्रातील संपूर्ण सुविधा विनामूल्य असणार आहे. त्यामुळे पोटविकार होण्याची कारणे व त्यावरील उपाय आणि उपचार याबाबत लोकांमध्ये या केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. एखाद्या प्रकरणात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास डॉ.मायदेव स्वत: गाडीवर उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करतील. या गाडीचे प्रभारी म्हणून ग्लोबल रुग्णालयाचे संचालक डॉ.अमित मायदेव सर्व कामकाज पाहणार आहेत.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार आदित्य ठाकरे, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बीआयडीएस केंद्राचे संचालक पद्मश्री डॉ.अमित मायदेव आदींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभाग उभारणार डीएनए प्रयोगशाळा

प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला

मुंबई, दि. 10 : वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने स्वत:ची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे. यासाठी आवश्यक असलेला३ कोटी ९६ लाखरुपयांचा निधी उद्यान व्यवस्थापनाला उपलब्ध झाला असून ही प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया  सुरु झाल्याचे उद्यानाचे मुख्य वन संरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितले.

मानव वन्यजीव संघर्षात विशेषत: जेव्हा यात मनुष्य मृत्यूच्या घटना घडतात तेव्हा घटनेच्यावेळी कारणीभूत प्राण्याला ओळखून त्याला जेरबंद करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.  आतापर्यंतअशा वन्य प्राण्यांची ओळख पटविण्यासाठी पायांचे ठसे किंवा शरीरावरील ठिपके/पट्टयांचा वापर केला जात होता. आता प्राण्यांची तंतोतंत ओळख होण्याकरिता प्राण्यांची डीएनए चाचणी करणे आवश्यक ठरत असल्याची बाब लक्षात घेऊन वन विभाग स्वत:ची प्रयोगशाळा उभारणार आहे.

सद्यस्थितीत डी.एन.ए चाचणी करण्यासाठीचे नमुने  हैदराबाद व भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून यांच्याकडे पाठविले जातात. या चाचणीचे परिणाम मिळण्याकरिता अनेक महिने वाट पाहावी लागते. दरम्यान मानव वन्यजीव संघर्षात कारणीभूत ठरलेल्या प्राण्याची तंतोतंत ओळख निश्चित न झाल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम१९७२ चे कलम ११ वराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्राण्याला जेरबंद करण्याचे आदेश काढण्यास अडचण निर्माण होते. डीएनए चाचणीचे परिणाम लवकर प्राप्त व्हावेत याकरिता वन विभागात स्वतंत्र डी.एन.ए चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणे अत्यंत आवश्यक होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी इमारत उपलब्ध आहे. मुंबई शहरात उपलब्ध असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ, वाहतुकीची सोय लक्षात घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ही प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे.  राज्यात दुर्देवाने कुठे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्या तर कोणत्या वन्यजीवाकडून हे कृत्य घडले याची अचूक ओळख पटवणे या डीएनए चाचणीमुळे शक्य होईल, असेही श्री.अहमद यांनी सांगितले.

००००

डॉ.सुरेखा मुळे/विसंअ/10.12.19

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 10 : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

महिलांवरील अत्याचारबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.

निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा मागील काही कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. ह्या निधीचा तात्काळ कशा पद्धतीने त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा संदेश श्री. ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.

       सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. पोलिसांमुळे नागरिकांचे सण-उत्सव आनंदात पार पडतात, असेही गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

       पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू.

       मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क राहावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

       या बैठकीत व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. प्रारंभी श्री. जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.10.12.2019

विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि. 10 : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार यांच्यासह विधिमंडळ सदस्य व विधानमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

कर्तव्य समजून मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

          

मुंबई, दि. 10 : नागरिकांनी मानवी हक्काचे संरक्षण हे कर्तव्य समजून केले पाहिजे. तसेच गरीब, दुर्बल आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व विकास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे केले.

          

सह्याद्री अतिथीगृह येथे आज मानवी हक्क दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

        

यावेळी मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष एम.ए.सईद म्हणाले, तरुणांनी स्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा या संबंधातील हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे. आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी तरुणांनी काम केले पाहिजे. नागरिकांनी आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याचेही पालन केले पाहिजे.

यावेळी महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी ‘मानवी हक्क चळवळ व सायबर कायदा’ याविषयी माहिती देऊन व्यक्तींनी मानवी हक्काबरोबरच कर्तव्यालाही महत्त्व दिले पाहिजे, असे सांगितले.

          

यावेळी राज्य मानवी हक्क आयोगाचे अतिरिक्त मुख्य सचिव व्ही.के.गौतम, आय.जे.एम. साऊथ एशियाचे संजय माकवान, मुंबई विद्यापीठाच्या प्रा.रश्मी ओझा तसेच मानवी हक्क चळवळीत काम करणारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावर्षीचे मानवी हक्क चळवळीचे ब्रीद वाक्य‘स्टँड अप फॉर ह्युमन राईटस्असे आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/वि.सं.अ./10.12.19

ताज्या बातम्या

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक...

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

0
यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत...